नंदवाळमध्ये अवतरले पंढरपूर

नंदवाळमध्ये अवतरले पंढरपूर
नंदवाळमध्ये अवतरले पंढरपूर

कोल्हापूर : प्रतिपंढरपूर समजल्या जाणाऱ्या नंदवाळ (ता. करवीर) येथे अपूर्व उत्साहात सोमवारी (ता. २३) आषाढी एकादशी सोहळा झाला. माउली...माउली...नामाचा अखंड जयघोषात नंदवाळला जाणाऱ्या दिंडीचा पुईखडीवर गोल रिंगण सोहळा पार पडला. हा सोहळा पाहण्यासाठी हजारो भाविकांनी पुईखडी येथे उपस्थिती होती. ज्ञानेश्वर माउली पालखी सोहळा भक्त मंडळच्या वतीने नंदवाळ येथे आषाढी एकादशीनिमित्त पायी दिंडीचे आयोजन करण्यात येते. आषाढी एकादशीनिमित्त विठ्ठल मंदिरात पहाटेपासूनच भाविकांनी दर्शनासाठी गर्दी केली होती.

प्रतिपंढरपूर समजल्या जाणाऱ्या नंदवाळ येथे विठ्ठल मंदिरात आषाढी एकादशीला दर्शनासाठी हजारो भाविक जातात. मागील १५ वर्षांपासून लाड चौकातील श्री ज्ञानेश्वर माउली पालखी सोहळा भक्त मंडळाच्या वतीने कोल्हापूर ते नंदवाळ पायी दिंडीचे आयोजन करण्यात येते. या दिंडीची रविवारी (ता. २२) नगरप्रद‌क्षिणा झाली.

यानंतर दिंडीचे पुईखडीकडे प्रस्थान झाले. ही दिंडी बिनखांबी गणेश मंदिर, निवृत्ती चौक, उभा मारुती चौक, खंडोबा तालीम, जुना वाशी नाका, साने गुरुजी वसाहत, संकल्प सिद्धी मंगल कार्यालयमार्गे पुईखडीवर आली. वाटेत ठिक‌ठिकाणी विविध मंडळांकडून दिंडीचे स्वागत करण्यात आले. रिमझिम पावसात वारकऱ्यांचा दिंडीमध्ये उत्साह होता. या सोहळ्यात २० हजारांहून अधिक भाविकांनी उपस्थिती लावली.

दिंडीत अवतरली अवघी पंढरी आषाढी एकादशीनिमित्त नंदवाळ येथील दिंडी सोहळ्यासाठी भजनी मंडळ, फुगड्याचे फेर धरत, टाळ मृदंगाचा गजर करत दिंडी सहभागी झालेले वारकरी, डोईवर तुळस घेतलेल्या महिला सहभागी झाल्या होत्या.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com