agriculture news in Marathi, Narendra Modi, if you have daring then impose 370 artical, Maharashtra | Agrowon

कलम ३७० पुन्हा आणून दाखवा : नरेंद्र मोदी
टीम अॅग्रोवन
सोमवार, 14 ऑक्टोबर 2019

जळगाव  : हिंमत असेल तर, जम्मू-काश्मीरबाबत स्पष्ट भूमिका घेऊन महाराष्ट्रातील विधानसभा निवडणुकीला सामोरे जा. धाडस असेल तर ३७० आणि ३५-अ कलम परत आणू, असे आश्वासन तुमच्या जाहीरनाम्यात द्या, असे आव्हान पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेसला दिले. 

जळगाव  : हिंमत असेल तर, जम्मू-काश्मीरबाबत स्पष्ट भूमिका घेऊन महाराष्ट्रातील विधानसभा निवडणुकीला सामोरे जा. धाडस असेल तर ३७० आणि ३५-अ कलम परत आणू, असे आश्वासन तुमच्या जाहीरनाम्यात द्या, असे आव्हान पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेसला दिले. 

पंतप्रधान नरेंद्र मोदींची पहिली प्रचारसभा रविवारी (ता.१३) जळगाव येथे झाली. यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, गिरिष महाजन यांच्यासह उमेदवार उपस्थित होते. पंतप्रधान मोदी म्हणाले, की काँग्रेस-राष्ट्रवादी जम्मू-काश्मीरबाबत घेतलेल्या राष्ट्रहिताच्या निर्णयाला विरोध करत आहेत. शेजारी राष्ट्राची भाषा बोलत आहेत; पण आमच्यासाठी जम्मू-काश्मीरबाबतचा निर्णय अटळ आहे. आम्ही जे बोलतो ते करतो. आम्ही तिहेरी तलाकचा विषयही असाच तडीस नेला. काँग्रेससह अनेक पक्षांनी त्याला विरोध केला; पण मुस्लिम माताभगिनींना दिलेले आश्वासन आम्ही पूर्ण केले.  

‘‘५ ऑगस्टला भारताने ऐतिहासिक निर्णय घेतला. त्याआधी हा निर्णय घेण्याचे धाडस होत नव्हते. जम्मू-काश्मीरमधील जनतेला वंचित ठेवले जात होते. त्या परिस्थितीत फक्त स्वतंत्रतावाद आणि दहशतवादाचा विस्तार होत होता. जम्मू-काश्मीर आणि लडाख केवळ जमिनीचा तुकडा नाही तर भारताच मस्तक आहे. त्या जमिनीतील कण-कण भारताला मजबूत करते. जम्मू-काश्मीरमध्ये ४० वर्षे जी आसामन्या परिस्थिती होती ती सामान्य होण्याला चार महिनेही लागले नाहीत,’’ असेही ते म्हणाले.

पंतप्रधान म्हणाले की, महिलांनी ज्या पद्धतीने मतदानात उत्स्फूर्त सहभाग घेतला त्याची संपूर्ण जगाने दखल घेतली आहे. महाराष्ट्रात या वेळी महिलांनी पुरुषांच्या पुढे जाऊन मतदान करावे. 
 

इतर बातम्या
किमान तापमानात किंचित वाढपुणे  : राज्यात थंडीची चाहूल लागल्यानंतर...
बाजार समित्यांना सक्षम पर्याय द्याः...पुणे ः केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी...
पावसाने संत्र्यात ४० टक्के फळगळ; ४००...नागपूर : राज्याचे मुख्य फळपिकांत महत्त्वाचे स्थान...
हमीभावाने कापूस खरेदी २० नोव्हेंबरपासून...जळगाव : भारतीय कापूस महामंडळ (सीसीआय) व...
राजकीय अस्थिरतेमुळे पूरग्रस्तांना मदतीस...कोल्हापूर: महापुरात नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना...
नवनवीन प्रपत्र, जिओ टॅगिंगच्या...बुलडाणा  ः अवकाळी पावसामुळे झालेल्या...
बारा लाख टन साखर निर्यातीचा मार्ग मोकळापुणे : केंद्र शासनाने मुदतवाढ दिल्यामुळे देशातील...
विमा कंपन्यांचे आस्ते कदम; पंचनाम्याकडे...पुणे : राज्यातील लाखो हेक्टरवरील पिके जमीनदोस्त...
दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांच्या प्रश्नी ‘...अकोला ः राज्यातील दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांना एकरी...
पंचनाम्यांसाठी संभाजी ब्रिगेड, किसान...पुणे : नैसर्गिक आपत्ती व अतिवृष्टीमुळे बाधित...
शरद पवार करणार विदर्भातील पीक नुकसानीची...नागपूर ः राज्यात सत्तास्थापनेचे गुऱ्हाळ सुरू...
महाशिवआघाडीत सत्तास्थापनेसाठी वाटाघाटी...मुंबई ः राज्यात भाजपला वगळून शिवसेना, राष्ट्रवादी...
शेतकऱ्यांवर रब्बी ज्वारीचे पीक...औरंगाबाद : मकानंतर आता रब्बी ज्वारीवर लष्करी...
अकोला, बुलडाण्याला खरिपात ७२५ कोटींचा...अकाेला ः गेल्या महिन्यात झालेल्या संततधार पाऊस व...
खानदेशात रब्बीसाठी प्रकल्पांमध्ये...जळगाव  ः खानदेशात रब्बी हंगामाची शेतकरी...
पुणे : हरभरा उत्पादनवाढीसाठी ४००...पुणे ः हरभरा उत्पादनवाढीसाठी रब्बी हंगामात अकरा...
मांजरपाडा प्रकल्पग्रस्तांची पूल...नाशिक  : दिंडोरी तालुक्यातील मांजरपाडा वळण...
खारपाण पट्ट्यातील कापूस हंगामही अडचणीतअकोला ः सततच्या पावसाने खरिपातील सर्वच...
पुणे : पंचनाम्यापासून अद्यापही १५ हजार...पुणे ः पुणे जिल्ह्यात नुकसान झालेल्या पिकांचे...
कोल्हापूर जिल्ह्यात केवळ पाच टक्के...कोल्हापूर : पावसाचा फटका खरीप हंगामात बसल्याने...