कृषी आणि ग्रामविकास मंत्रिपदी नरेंद्रसिंह तोमर; रुपाला, चौधरी राज्यमंत्री

कृषिमंत्रिपदी नरेंद्रसिंह तोमर; रुपाला, चौधरी राज्यमंत्री
कृषिमंत्रिपदी नरेंद्रसिंह तोमर; रुपाला, चौधरी राज्यमंत्री

नवी दिल्ली : केंद्रीय कृषिमंत्रिपदी नरेंद्रसिंह तोमर यांची, तर कृषी राज्यमंत्रिपदी पुरुषोत्तम रूपाला आणि कैलास चौधरी यांची यांची निवड पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केली आहे. श्री. तोमर यांच्याकडे ग्रामविकास आणि पंचायत राज मंत्रालयाचा पदभारही असणार आहे.   पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासह नव्या मंत्रिमंडळाचा शपथविधी गुरुवारी (ता. ३०) दिमाखदार सोहळ्यात पार पडल्यानंतर शुक्रवारी (ता. ३१) खातेवाटप करण्यात आले. निवडणुकीचा निकाल लागल्यापासूनच कृषिमंत्रिपद कुणाला मिळाणार याविषयी तर्क लावले जात होते. 

अखेर नरेंद्रसिंग तोमर यांच्याकडे कृषी खात्याचा भार पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सोपविला. मंत्री तोमर यांनी एनडीए-१ च्या काळात दुसऱ्या टप्प्यात ग्रामीण विकास आणि पंचायत राज विभागाची धुरा सांभाळली होती. त्यामुळे त्यांना ग्राम आणि शेती याविषयीचा अनुभव दांडगा आहे.    नरेंद्रसिंग तोमर यांचा जन्म १२ जून १९५७ ला मध्य प्रदेशातील मोरेना जिल्ह्यातील ओरेठी या गावात झाला होता. त्यांनी पदवीचे शिक्षण जिवाजी विद्यापीठातून पूर्ण केले. २०१४ मध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वात एनडीएचे सरकार केंद्रात स्थापन झाल्यानंतर नरेंद्रसिंग तोमर यांना कॅबिनेट मंत्रिपद मिळाले. त्यांच्याकडे स्टील, खाण, कामगार आणि रोजगार मंत्रालयाचा भार देण्यात आला.   ५ जुलै २०१६ रोजी कॅबिनेट मंत्र्यांचे खातेपालट करण्यात आले. यात तोमर यांच्याकडे बिरेंदरसिंग यांच्याकडील पंचायत राज, ग्रामीण विकास आणि पेयजल मंत्रालयाचा भार सोपविण्यात आला. आता एनडीएला दुसऱ्यांदा बहुमत मिळाल्यानंतर तोमर यांच्याकडे कृषी, ग्रामीण विकास आणि पंचायतराज मंत्रालयाचे कॅबिनेट मंत्रिपद देण्यात आले. तोमर यांनी आधीच्या सरकारच्या काळात ग्रामीण विकास आणि पंचायत राज विभागाचा कारभार सांभाळला असल्याने त्यांचा अनुभव दांडगा आहे. त्यामुळे त्यांच्याकडे अत्यंत महत्त्वाच्या अशा कृषी विभागाचा कार्यभार सोपविण्यात आला आहे. पुरुषोत्तम रुपाला : कृषी राज्यमंत्री गुजरातमधील भारतीय जनता पक्षाचे वरिष्ठ नेते. गुजरात विधानसभेत ते नर्मदा विकास, जलस्रोत आणि कृषिमंत्री होते. पक्षाचे प्रदेशाध्यक्षपदही त्यांनी भूषविले आहे, तर विद्यमान राष्ट्रीय उपाध्यक्ष आहेत. २०१६ मध्ये श्री. रुपाला यांना राज्यसभेवर घेतल्यानंतर मोदी सरकारमध्ये कृषी आणि शेतकरी कल्याण राज्यमंत्री करण्यात आले. कैलाश चौधरी : कृषी राज्यमंत्री श्री. चौधरी हे शेतकरी नेते आहेत. बारमर मतदारसंघात त्यांनी नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीत कॉंग्रेसच्या मानवेंद्र सिंग यांचा ३.२ लाख मतांनी पराभव केला. चौधरी हे बायतू मतदारसंघाचे राजस्थान विधानसभेत प्रतिनिधित्व करत होते. भाजपच्या किसान मार्चाचे ते प्रदेशाध्यक्ष आहेत. साध्वी निरंजन ज्योती : ग्रामविकास राज्यमंत्री उत्तर प्रदेशातील फत्तेपूर मतदारसंघातून सलग दोन वेळेस त्यांनी लोकसभेचे प्रतिनिधित्व केले आहे. यापूर्वीच्या सरकारमध्ये त्यांच्याकडे अन्न आणि प्रक्रिया उद्योग मंत्रालयाचा राज्यमंत्री पदाचा कार्यभार होता. २०१२ ते २०१४ मध्ये त्यांनी हमीरपूर विधानसभेचे प्रतिनिधित्व केले. वादग्रस्त वक्तव्यांनी त्याही चर्चेत होत्या.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com