agriculture news in Marathi, narendra singh tomar says, Pink bollworm infestation was not the reason for farmers' adoption of unapproved varieties, maharashtra | Agrowon

असंमत बियाणे लागवडीला बोंडअळी कारणीभूत नाही : केंद्रीय कृषिमंत्री नरेंद्रसिंग तोमर

कोजेन्सिस वृत्तसेवा
शनिवार, 20 जुलै 2019

नवी दिल्ली : देशात २०१८ मध्ये गुलाबी बोंडअळीचे प्रभावी नियंत्रण करण्यात यश आले असून, आर्थिक नुकसानीच्या पातळीपेक्षा कमी प्रादुर्भाव होता. त्यामुळे शेतकऱ्यांनी काही ठिकाणी बंदी असलेल्या कापूस वाणांची केलेली लागवड ही बोंडअळीच्या प्रादुर्भावामुळे केलेली नाही. या लागवडीला गुलाबी बोंडअळी कारणीभूत नाही, अशी माहिती केंद्रीय कृषिमंत्री नरेंद्रसिंह तोमर यांनी दिली. 

नवी दिल्ली : देशात २०१८ मध्ये गुलाबी बोंडअळीचे प्रभावी नियंत्रण करण्यात यश आले असून, आर्थिक नुकसानीच्या पातळीपेक्षा कमी प्रादुर्भाव होता. त्यामुळे शेतकऱ्यांनी काही ठिकाणी बंदी असलेल्या कापूस वाणांची केलेली लागवड ही बोंडअळीच्या प्रादुर्भावामुळे केलेली नाही. या लागवडीला गुलाबी बोंडअळी कारणीभूत नाही, अशी माहिती केंद्रीय कृषिमंत्री नरेंद्रसिंह तोमर यांनी दिली. 

लोकसभेत दिलेल्या लेखी उत्तरात कृषिमंत्री म्हणाले, की देशात २०१८ या वर्षात कुठेही गुलाबी बोंडअळी जास्त प्रादुर्भाव नव्हता.  या किडीचे प्रभावी नियंत्रण करण्यात यश आले असून आर्थिक  नुकसानीची पातळीपेक्षा कमी प्रादुर्भाव होता. 
महाराष्ट्रात यंदा एकूण कापूस लागवड क्षेत्राच्या जवळापास २५ टक्के लागवड ही जीएम बीटीच्या तणनाशक सहनशील (एचटीबीटी) वाणाची लागवड झाली आहे. एचटीबीटीला भारतात लागवडीची परवानगी नाही.

बीटी तंत्रज्ञान हे गुलाबी बोंडअळीला बळी पडत असून सुद्धा शासन सुधारित तंत्रज्ञानाविषयी उदासीन असल्याचा आरोप करत करत अलीकडेच राज्यात शेतकरी संघटनेच्या कार्यकर्त्यांनी जाहीररीत्या एचटीबीटीची लागवड करत सत्याग्रह आंदोलन केले.    

पीकविमा योजना सुधारणेसाठी सूचना 
सरकारने विमा योजनेत सुधारणा करण्यासाठी सूचना मागविल्या आहेत. २०१६ मध्ये सुरू करण्यात आलेली पीकविमा योजना शेतकऱ्यांना अनुदानित तत्त्वावर राबविली जाते. शेतकऱ्यांना खरीप हंगामात केवळ दोन टक्के आणि रबी हंगामात केवळ १.५ टक्के, तर फळबागांसाठी ५ टक्के विमाहप्ता भरायचा असतो. परंतु, शेतकरी संघटनांनी पीकविमा योजना ही ऐच्छिक तत्त्वावर राबवावी, अशी मागणी केली आहे. तसेच, नुकसानीची पातळी मोजण्याची पद्धती बदलण्याची मागणीही केली आहे. त्यामुळे केंद्र सरकार पीकविमा योजना अधिक सुटसुटीत व्हावी, यासाठी काम करीत आहे, अशी माहितीही कृषिमंत्री तोमर यांनी लोकसभेत दिली.

शेतकऱ्यांना वीज उत्पादक बनविणार
शेतकऱ्यांना पडीक जमिनीवर सोलार पॅनेल बसविण्यासाठी मदत करेल आणि शेतकऱ्यांनी उत्पादित केलेल वीज विकत घेईल अशी योजना आणण्याचा केंद्राचा विचार आहे. केंद्र सरकारने २०१९-२० च्या अर्थसंकल्पात अन्नधान्य उत्पादकाला आपारंपरिक ऊर्जा उत्पादक बनविण्याची घोषणा केली होती. त्याच योजनेचा एक भागा म्हणून ही योजना राबविली जाणार आहे. या योजनेमुळे शेतकरी स्वतः वीजनिर्मिती करून वापरेल आणि अतिरिक्त वीज विक्रीतून पैसाही कमवेल, अशी माहिती कृषिमंत्र्यांनी दिली. 


इतर बातम्या
नगर जिल्ह्याच्या विकासासाठी ९७१ कोटींची...नगर ः जिल्ह्याच्या विकासासाठी शासनाकडे ९७१...
खानदेशातील ‘रब्बी’ला ढगाळ वातावरणाचे...जळगाव : खानदेशात यंदा हुडहुडी भरविणारी थंडी दोन-...
उद्योगमंत्र्यांनी जाणली रेशीम...औरंगाबाद : जिल्ह्यात रेशीम कोषाचे उत्पादन,...
फुलकिड्यांच्या प्रादुर्भावामुळे काजू...सिंधुदुर्ग : ढेकण्या, शेंडेमर, फांदीमर रोगांमुळे...
दहा वर्षांत सातारा जिल्ह्यातील १३८०...सातारा  ः जिल्ह्यात गोपीनाथ मुंडे शेतकरी...
मुळा, भंडारदरा धरणांतून आजपासून आवर्तननगर  ः यंदा पाऊस चांगला झाल्याने...
पुणे कृषी महाविद्यालयातील ...पुणे  ः विद्यार्थी वसतिगृहाचे प्रवेशद्वार...
भीमा खोऱ्यातील धरणांमध्ये ८५ टक्के पाणीपुणे  : जिल्ह्याच्या धरणक्षेत्रात यंदा दमदार...
हिंगोली, नांदेड, परभणी जिल्ह्यांत...हिंगोली : पाऊस लांबल्यामुळे हिंगोली, नांदेड,...
‘पोकरा’अंतर्गत तांत्रिक सहकार्यासाठी...औरंगाबाद: नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्पाच्या...
शिरवाडे वणीत जलसंधारणासाठी...नाशिक : कर्मवीर काकासाहेब वाघ कला विज्ञान आणि...
अनियमित थंडी ऊस रिकव्हरीच्या मुळावरकोल्हापूरः जानेवारीच्या पहिल्या आठवड्यातही ऊस...
कुरखेडा तालुक्यात सेवा सोसायट्यांचा धान...गडचिरोली  ः कमिशन व हमालीची रक्‍कम मिळत...
देशात केवळ ३५ तेलबिया हबनिर्मितीनवी दिल्ली: देशातील तेलबिया उत्पादन वाढावे आणि...
नवव्या जागतिक कृषी महोत्सवास उद्यापासून...नाशिक : श्रीस्वामी समर्थ सेवा मार्ग दिंडोरी...
राज्यात गारठा कमी, उकाडा वाढलापुणे : उत्तरेकडून येणाऱ्या थंड वाऱ्यांचे प्रवाह...
संवादासाठी तंत्रज्ञान महोत्सव फायदेशीर...सोलापूर : ‘‘शेतीतील नवे ज्ञान, तंत्रज्ञान, बदल...
धान खरेदी केंद्रासाठी शेतकऱ्यांचा...भंडारा  ः गेल्या दोन महिन्यांपासून बंद...
काँग्रेसचा दर बुधवारी मुंबईत ‘लोकदरबार’ मुंबई  : विविध कामांसाठी मंत्रालयात येणाऱ्या...
अलिबागचा पांढरा कांदा ‘जीआय’च्या वाटेवरपुणे : औषधी गुणधर्मांसाठी प्रसिद्ध असलेल्या...