नाशिकमध्ये वाटाण्याच्या आवेकसह दरातही सुधारणा

नाशिक : येथील कृषी उत्पन्न बाजार समितीमध्येवाटाण्याची आवक ११९१ क्विंटल झाली. सध्या आवेकत सुधारणा झाली असल्याचे दिसून आले. त्यास ८००० ते १०५०० रुपये प्रतिक्विंटल दर मिळाला. तर सरासरी दर ९००० रुपये राहिला, अशी माहिती बाजार समितीच्या सूत्रांनी दिली.
In Nashik, along with the demand for peas, the price has also improved
In Nashik, along with the demand for peas, the price has also improved

नाशिक : येथील कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये वाटाण्याची आवक ११९१ क्विंटल झाली. सध्या आवेकत सुधारणा झाली असल्याचे दिसून आले. त्यास ८००० ते १०५०० रुपये प्रतिक्विंटल दर मिळाला. तर सरासरी दर ९००० रुपये राहिला, अशी माहिती बाजार समितीच्या सूत्रांनी दिली.

चालू सप्ताहामध्ये कांद्याची आवक १५१९५ क्विंटल झाली. मागणी असूनही बाजारभाव सर्वसाधारण आहेत. त्यास कांद्याला प्रतिक्विंटल ३५० ते १६००, तर सरासरी दर १२५० रुपये राहिला. बटाट्याची आवक ६८३२ क्विंटल झाली. त्यास प्रतिक्विंटल ४०० ते १२०० तर सरासरी दर ८५० रुपये राहिला. लसणाची आवक २१७ क्विंटल झाली. त्यास प्रतिक्विंटल २५०० ते ८५००, तर सरासरी दर ६५०० रुपये राहिला. आल्याची आवक ४८७ क्विंटल झाली. त्यास प्रतिक्विंटल ३००० ते ५८०० तर सरासरी दर ४००० रुपये राहिला.

हिरव्या मिरचीची आवक ४८३ क्विंटल झाली. लवंगी मिरचीला प्रतिक्विंटल १४०० ते २२००, तर सरासरी दर १७०० रुपये राहिला. गाजराची आवक ७६९ क्विंटल झाली. त्यास प्रतिक्विंटल १५०० ते २८००, तर सरासरी दर २३०० रुपये राहिला. 

फळभाज्यांमध्ये टोमॅटोला ५० ते २२१, तर सरासरी १३०, वांगी २०० ते ५००, तर सरासरी ३५० व फ्लॉवर १७५ ते ३५० सरासरी २२५ रुपये असे दर प्रति १४ किलोस मिळाले. कोबीला ६० ते १०५, तर सरासरी ९० रुपये असे दर प्रति २० किलोस मिळाले. ढोबळी मिरचीला ३०० ते ४५० तर सरासरी दर ३०० रुपये असे दर प्रति ९ किलोस मिळाले.

वेलवर्गीय भाजीपाल्यामध्ये भोपळा २५० ते ४०० तर सरासरी ३२५, कारले १०० ते २०० तर सरासरी १५०, गिलके ४०० ते ५००, तर सरासरी ४५० व दोडका ३५० ते ५०० तर सरासरी दर ४२५ रुपये असे प्रति १२ किलोस दर मिळाले. फळांमध्ये चालू सप्ताहात डाळिंबांची आवक ११०५९ क्विंटल झाली. मृदुला वाणास ५००० ते १००००, तर सरासरी ७००० रुपये दर मिळाला. केळीची आवक ८८० क्विंटल झाली. 

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com