agriculture news in Marathi, Nashik APMC speaker arrested in bribe case of 3 lac, Maharashtra | Page 2 ||| Agrowon

तीन लाखाची लाच घेताना नाशिक बाजार समितीचे सभापती चुंबळेंना अटक
टीम अॅग्रोवन
शनिवार, 17 ऑगस्ट 2019

नाशिक: नाशिक  कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती  शिवाजी चुंभळे  यांना तीन लाख रुपयांची लाच घेताना शुक्रवारी (ता. १६) लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने अटक केली. कामावरून कमी करण्यात आलेल्या एका कर्मचाऱ्याला पुन्हा कामावर रुजू करण्यासाठी त्यांनी लाच मागितली होती. स्थानिक राजकारणात चुंबळे चर्चेत असल्याने या कारवाईमुळे चर्चेला उधाण आले आहे. 

नाशिक: नाशिक  कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती  शिवाजी चुंभळे  यांना तीन लाख रुपयांची लाच घेताना शुक्रवारी (ता. १६) लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने अटक केली. कामावरून कमी करण्यात आलेल्या एका कर्मचाऱ्याला पुन्हा कामावर रुजू करण्यासाठी त्यांनी लाच मागितली होती. स्थानिक राजकारणात चुंबळे चर्चेत असल्याने या कारवाईमुळे चर्चेला उधाण आले आहे. 

कामावरून कमी करण्यात आलेल्या एका कर्मचाऱ्याला पुन्हा कामावर रुजू करण्यासाठी चुंभळे यांनी १० लाख रुपयांची मागणी केली होती. अखेर ३ लाखांवर तडजोड झाली. या प्रकरणाची लाचलुचपत प्रतिबंधक खात्याला माहिती मिळाली होती. त्यानुसार एसीबीचे अधीक्षक सुनील कडासने याबाबत चुंभळे यांच्यावरील कारवाईसाठी सापळा रचला. शुक्रवारी दुपारी १ वाजेच्या सुमारास ते लाच घेताना रंगेहाथ सापडले. तीन लाखांची रक्कम घेताना त्यांना ताब्यात घेतले असून, पुढील चौकशी सुरू आहे. 

नाशिकच्या राजकारणात सतत चर्चेत असणारे व्यक्तिमत्त्व आहे. शिवसेनेत असलेल्या चुंबळे यांनी लोकसभा निवडकीत बंड पुकारले होते. मात्र ते शमल्यानंतर सध्या ते नाशिक पश्चिम विधानसभा मतदारसंघात शिवसेनेकडून उमेदवारीबाबत आग्रही असल्याचे बोलले जाते. यापूर्वी माजी खासदार देविदास पिंगळे यांना बाजार समितीच्या सभापतिपदी असताना आर्थिक व्यवहाराच्या प्रकरणात अटक झाली होती. त्यांच्यानंतर लाचलुचपत विभागाने कारवाई केलेले बाजार समिती सभापतीचे हे दुसरे प्रकरण आहे.

 

इतर अॅग्रो विशेष
विदर्भातून मॉन्सून परतला  पुणे : नैर्ऋत्य मोसमी वाऱ्यांनी (मॉन्सून)...
गुरुवारपासून पुन्हा वादळी पावसाचा इशारापुणे : राज्यात वादळी पावसाने काहीशी उसंत घेतली...
राज्यातील कांदा उत्पादकांना ५५० कोटींचा...नाशिक ः दसरा-दिवाळीच्या तोंडावर कांद्याला चांगला...
‘ती’चा गावगाड्याला मिळतोय आधारसोलापूर : चूल अन्‌ मूल या मर्यादेला बगल देत महिला...
राजद्रोह कायद्याची गरज काय?का ही वर्षांपूर्वीची ही घटना आहे. एका...
को-मार्केटिंगचा घोळबियाणे, खते, कीडनाशके या कृषी उत्पादनासाठीच्या...
नाशिक जिल्ह्यात पावसाचा टोमॅटो पिकाला...नाशिक: जिल्ह्यात मागील दोन आठवड्यांत झालेल्या...
झोपडीचा आधार बांबू पोचला सातासमुद्रापारवेलतूर, जि. नागपूरः गरिबांच्या झोपडीचा आधार...
देशाच्या उत्तर-मध्य बहुतांश भागातून...पुणे : नैर्ऋत्य मोसमी वारे (मॉन्सून) मजल-दरमजल...
रब्बीसाठी अनुदानित हरभरा बियाणे उपलब्धपुणे: राज्यात गेल्या रब्बी हंगामात अनुदानित हरभरा...
बुधवारपासून पावसाची शक्यतापुणे: देशातून मॉन्सूनचा परतीचा प्रवास वेगाने सुरू...
पावासामुळे खरीप पिके, भाजीपाल्यासह...पुणे : राज्यात ऑक्टोबर महिन्यात झालेल्या वादळी...
कलम ३७० पुन्हा आणून दाखवा : नरेंद्र मोदीजळगाव  : हिंमत असेल तर, जम्मू-काश्मीरबाबत...
पीक बदलातून दिली नवी दिशाशिरपूर जैन (ता. मालेगाव, जि. वाशीम) येथील...
अमेरिकेतील भातशेतीची शिवारफेरीअमेरिकेतील कॅलिफोर्निया राज्यामध्ये सॅक्रामेंटो...
परतीचा प्रवास वेगाने; मध्य, पूर्व...पुणे : नैर्ऋत्य मोसमी वाऱ्यांचा (मॉन्सून)...
सातारा : उसावर अमेरिकन लष्करी अळीचा...सातारा : जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या अडचणीत...
राज्यात हलक्या पावसाचा अंदाजपुणे : ऑक्टोबर महिन्याच्या सुरुवातीपासून पडणाऱ्या...
राष्ट्रीय संस्थांमध्ये कृषी...दापोली, जि. रत्नागिरी : राष्ट्रीय कृषी...
...हे खूपच संतापजनक आहे : राजू शेट्टीसध्या शेतकऱ्याला भाकरीची गरज आहे, त्याच्या पुढे...