Agriculture news in marathi In Nashik, the arrival of chillies is normal, the price is stable | Agrowon

नाशिकमध्ये ढोबळी मिरचीची आवक सर्वसाधारण, दर स्थिर 

टीम अॅग्रोवन
गुरुवार, 19 नोव्हेंबर 2020

 येथील कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये ढोबळी मिरचीची आवक ११५ क्विंटल झाली. तीला प्रतिक्विंटल पाच हजार ते ७ हजार ८१० दर मिळाला. सर्वसाधारण दर ६ हजार ५६२ रुपये राहिला.

नाशिक : येथील कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये ढोबळी मिरचीची आवक ११५ क्विंटल झाली. तीला प्रतिक्विंटल पाच हजार ते ७ हजार ८१० दर मिळाला. सर्वसाधारण दर ६ हजार ५६२ रुपये राहिला. आवक सर्वसाधारण असल्याने दर स्थिर असल्याची माहिती बाजार समितीच्या सूत्रांनी दिली. 

सध्या बाजारात होणारी शेतमालाची आवक सर्वसाधारण असून, सध्या दर स्थिर आहेत. तर काही शेतमालाची आवक वाढूनही दर टिकून आहेत. वांग्याची १६३ क्विंटल आवक झाली. त्यास प्रति क्विंटल ४ हजार ते ७ हजार, असा दर मिळाला. त्यास सरासरी दर ५ हजार ५०० राहिला. फ्लॉवरची आवक ९०५ क्विंटल झाली. त्यास प्रतिक्विंटल ५७० ते १ हजार १५० दर मिळाला. त्यास सरासरी दर एक हजार राहिला. कोबीची आवक १ हजार ७६ क्विंटल झाली. तिला १ हजार ६६५ ते २ हजार ९६०, असा दर मिळाला. सर्वसाधारण दर २ हजार २९० राहिला.         

भोपळ्याची आवक १ हजार ९२७ क्विंटल झाली. त्यास १६५ ते ५३५ असा दर मिळाला. सर्वसाधारण दर ३३५ राहिला. कारल्याची आवक ५२२ क्विंटल झाली. त्यास १ हजार ६७० ते २ हजार ५०५ असा दर मिळाला. सर्वसाधारण दर २ हजार ०८५ राहिला. दोडक्याची आवक २१०  क्विंटल झाली. त्यास १ हजार ६७० ते २ हजार ७१० असा दर मिळाला. त्यास सर्वसाधारण दर २ हजार १२५ राहिला. गिलक्याची आवक १४२ क्विंटल झाली. त्यास १हजार २५० ते २ हजार ९१५ दर मिळाला. सर्वसाधारण दर २ हजार २९० राहिला. काकडीची आवक २ हजार १७३ क्विंटल झाली. तिला २०० ते ५००, असा दर मिळाला. सर्वसाधारण दर ३२५ राहिला. भेंडीची आवक ३२ क्विंटल झाली. त्यास २ हजार ५०० ते ३ हजार ७५० दर मिळाला. सर्वसाधारण दर २ हजार ९१५ राहिला. कांदा, बटाटा व लसणाची आवक झाली नाही. 

फळांची आवक स्थिर 
दिवाळीच्या पार्श्‍वभूमीवर फळांची आवक स्थिर होती. फळांमध्ये डाळिंबाची आवक १०२ क्विंटल झाली. त्यास ४५० ते १२ हजार ५०० दर होता. सर्वसाधारण दर ९ हजार राहिला. केळीची आवक २०० क्विंटल झाली. तिला ४०० ते एक हजार दर राहिला. सर्वसाधारण दर ७५० राहिला. सफरचंदाची आवक १२० क्विंटल झाली. त्यास पाच हजार ते ८ हजार ५०० दर होता. सर्वसाधारण दर सात हजार राहिला. पपईची आवक ३० क्विंटल झाली. तिला ८०० ते दोन हजार दर राहिला. सर्वसाधारण दर १ हजार ४०० राहिला. 
 


इतर बाजारभाव बातम्या
राज्यात मेथी २५० ते ३००० रुपये शेकडासोलापुरात प्रतिशेकडा ३०० ते ७०० रुपये सोलापूर...
नाशिक बाजारात कारल्याचे दर टिकूननाशिक : येथील कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये...
सोलापुरात वांगी, गाजराला उठावसोलापूर ः सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या...
पुण्यात भाजीपाला आवक घटली; दर स्थिरपुणे ः गुलटेकडी येथील कृषी उत्पन्न बाजार...
खानदेशात मका दरात सुधारणाजळगाव ः खानदेशातील प्रमुख बाजार समित्यांमध्ये...
औरंगाबादमध्ये मोसंबीला सर्वसाधारण ३०००...औरंगाबाद : येथील कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये...
कोल्हापूर : गुळाच्या दरात १५० रुपयांनी...कोल्हापूर : बाजार समितीत गेल्या आठ दिवसांमध्ये...
राज्यात बटाटा १००० ते २६०० रुपयेऔरंगाबादमध्ये क्विंटलला १००० ते १२५० रुपये...
नाशिकमध्ये भेंडीला सर्वसाधारण २९१० रुपयेनाशिक : ‘‘येथील बाजार समितीमध्ये भेंडीची आवक ५२...
नाशिकमध्ये कांद्याच्या दरात सुधारणानाशिक: नाशिक कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये चालू...
नगरमध्ये तूर ४००० ते ५५०० रुपये...नगर ः नगर येथील दादा पाटील कृषी उत्पन्न बाजार...
खानदेशात कांद्याच्या दरात सुधारणाजळगाव ः खानदेशात कांदा दरात सुधारणा सुरूच आहे. दर...
औरंगाबादमध्ये मक्यासह तुरीचे दर स्थिरजालना : येथील बाजार समितीमध्ये गत आठवड्यात ५ ते ९...
पुण्यात भोगीनिमित्त गाजर, मटारला मागणीपुणे ः गुलटेकडी येथील कृषी उत्पन्न बाजार...
औरंगाबादेत द्राक्षांना क्विंटलला ६०००...औरंगाबाद : येथील बाजार समितीमध्ये शनिवारी (ता. ९...
परभणीत शेवग्याला क्विंटलला ५००० ते ८०००...परभणी ः येथील पाथरी रस्त्यावरील फळे, भाजीपाला...
आंबिया संत्र्याला मिळाला २२ हजार...नागपूर : बाजारात संत्र्याचे दर गडगडले असतानाच...
राज्यात कांदा २०० ते ३५०० रुपयेसोलापुरात प्रतिक्विंटला २०० ते ३५०० रुपये...
नाशिकमध्ये दोडक्याची आवक सर्वसाधारण;...नाशिक : येथील कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये...
खानदेशात मक्याची आवक कमीजळगावः खानदेशात प्रमुख बाजार समित्यांमध्ये...