Agriculture news in Marathi In Nashik, the arrival of Walpapadi and Ghewda increased | Agrowon

नाशिकमध्ये वालपापडी, घेवड्याची आवक वाढली

टीम अॅग्रोवन
मंगळवार, 27 ऑक्टोबर 2020

येथील कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये वालपापडी-घेवड्याची आवक २७११ क्विंटल झाली. सध्या आवेकत वाढ झाल्याने बाजारभाव कमी झाले आहेत. वालपापडीला प्रतिक्विंटल ४००० ते ५५०० असा तर सरासरी दर ४५०० रुपये राहिला.घेवड्याला प्रतिक्विंटल ५००० ते ८५०० तर सरासरी दर ४५०० रुपये राहिला, अशी माहिती बाजार समितीच्या सूत्रांनी दिली.

नाशिक : येथील कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये वालपापडी-घेवड्याची आवक २७११ क्विंटल झाली. सध्या आवेकत वाढ झाल्याने बाजारभाव कमी झाले आहेत. वालपापडीला प्रतिक्विंटल ४००० ते ५५०० असा तर सरासरी दर ४५०० रुपये राहिला.घेवड्याला प्रतिक्विंटल ५००० ते ८५०० तर सरासरी दर ४५०० रुपये राहिला, अशी माहिती बाजार समितीच्या सूत्रांनी दिली.

चालू सप्ताहामध्ये उन्हाळ कांद्याची आवक ४०१७ क्विंटल झाली. मागणीमुळे आवक वाढली असली तरी बाजारभावात वाढ दिसून आली. त्यास प्रतिक्विंटल ३००० ते ७५०० तर सरासरी दर ५५०० रुपये राहिला. बटाट्याची आवक ६२४० क्विंटल झाली.त्यास प्रतिक्विंटल २१०० ते ३६५० तर सरासरी दर ३२०० रुपये राहिला. लसूणाची आवक १२३ क्विंटल झाली. त्यास प्रतिक्विंटल ६००० ते १३००० तर सरासरी दर १०००० रुपये राहिला. आद्रकची आवक १०२ क्विंटल झाली. त्यास प्रतिक्विंटल ८००० ते १३००० तर सरासरी दर १२००० रुपये राहिला.

सप्ताहात काही फळभाज्यांची आवक सर्वसाधारण असल्याने दरात तेजी कायम आहे. वाटाण्याची आवक कमी असून ती अवघी २० क्विंटल झाली. आवक कमी असल्याने दरात तेजी असल्याचे पाहायला मिळाले. त्यास प्रतिक्विंटल १०००० ते १४००० दर मिळाला. तर सरासरी दर १२००० रुपये मिळाला. गाजराची आवक १७९४ क्विंटल झाली. त्यास प्रतिक्विंटल १५०० ते ४००० तर सरासरी दर ३००० रुपये राहिला.

फळभाज्यांमध्ये टोमॅटोला २५१ ते ६११ तर सरासरी ४००, वांगी ४०० ते ८०० तर सरासरी ६०० व फ्लॉवर १५० ते ४७१ सरासरी ३३१ रुपये असे दर प्रति १४ किलोस मिळाले. तर कोबीला १८० ते ४८०  तर सरासरी २७० रुपये असे दर प्रति २० किलोस मिळाले. ढोबळी मिरचीला ४०० ते ७०० तर सरासरी दर ५०० रुपये असे दर प्रति ९ किलोस मिळाले.

वेलवर्गीय भाजीपाल्यामध्ये दरात किंचित घट झाली. भोपळा १०० ते २५० तर सरासरी १७५, कारले ००० ते ४०० तर सरासरी ३००, गिलके ४०० ते ६०० तर सरासरी ५००, भेंडी ३०० ते ५०० तर सरासरी ४०० व दोडका ३०० ते ६५० तर सरासरी दर ४५० रुपये असे प्रति १२ किलोस दर मिळाले. काकडीला १२५ ते २०० तर सरासरी १५० रुपये असे २० किलोस दर मिळाले.

फळांमध्ये चालू सप्ताहात डाळिंबाची आवक १९४५ क्विंटल झाली. आरक्ता वाणास प्रतिक्विंटल ३०० ते ४५०० दर मिळाला. तर सरासरी ३००० व मृदुला वाणास ३०० ते ९००० तर सरासरी ४५०० रुपये दर मिळाला. केळीची आवक १३३० क्विंटल झाली.तिला प्रतिक्विंटल ४०० ते १००० तर सरासरी दर ७५० रुपये मिळाला. पपईची आवक २९५ क्विंटल झाली. तिला प्रतिक्विंटल ८०० ते २००० तर सरासरी दर १२०० रुपये होता.

मोसंबीची आवक ८६० क्विंटल झाली. तिला १८०० ते ४००० रुपये प्रतिक्विंटल दर मिळाला. तर सरासरी दर ३००० रुपये मिळाला. शहाळ्याची आवक ९३५ क्विंटल झाली. त्यास प्रतिक्विंटल २५०० ते ३५०० तर सरासरी दर ३००० रुपये राहिला. सीताफळाची आवक २६८ क्विंटल झाली. त्यास प्रतिक्विंटल २००० ते ४००० तर सरासरी दर २८०० रुपये होता.


इतर ताज्या घडामोडी
नगरमध्ये डाळिंबाच्या दरात सुधारणानगर ः नगर येथील दादा पाटील शेळके कृषी उत्पन्न...
एफआरपीप्रश्नी सोलापूर जिल्ह्यातील बैठक...सोलापूर : जिल्ह्यातील साखर कारखान्यांनी अद्यापही...
नांदेड जिल्ह्यात ढगाळ वातावरणाचा...नांदेड : खरिपातील नुकसानीनंतर शेतकऱ्यांनी...
शहीद नितीन भालेराव अनंतात विलीननाशिक : भारतीय निमलष्कराच्या केंद्रीय राखीव पोलिस...
डाळिंब, आंब्याच्या विम्यासाठी ३१...नाशिक : ‘‘राज्य शासनाच्या पुनर्रचित हवामान आधारित...
परभणी, पाथरी, गंगाखेडमधील कापसाची...परभणी : ‘‘राज्य सहकारी कापूस उत्पादक पणन...
परभणीतील अपात्र शेतकऱ्यांकडून ‘शेतकरी...परभणी : पंतप्रधान किसान सन्मान निधी (पीएम- किसान...
खानदेशात रब्बीसाठी आवर्तनांची प्रतीक्षाजळगाव : खानदेशात सर्वच प्रकल्पांमधील जलसाठे मुबलक...
औरंगाबाद, बीड जिल्ह्यात विशेष पथके...औरंगाबाद : औरंगाबाद व बीड जिल्ह्यात बिबट्याच्या...
जळगाव जिल्हा परिषदेत रिक्त पदांमुळे...जळगाव : ग्रामविकासाचा केंद्रबिंदू असलेल्या जिल्हा...
अंबड तालुक्यात चार ठिकाणी कापूस खरेदी...अंबड, जि. जालना : तालुक्यात चार ठिकाणी कापूस...
पपई उत्पादकांना खर्चही निघेनाअकोला : पारंपरिक पिकांची चाकोरी सोडत शेतकरी...
मराठवाड्यात तुरीवरच शेतकऱ्यांचे आर्थिक...औरंगाबाद : यंदा अतिपावसाने उडीद, सोयाबीनचे अतोनात...
खडकपूर्णा धरणाचे आवर्तन अखेर सुरूबुलडाणा : देऊळगावराजा तालुक्यातील शेतकऱ्यांना...
...तर महावितरणचे कार्यालय जाळणार :  आ....अमरावती :  वरुड, मोर्शी तालुक्यांत...
मक्यावर अमेरिकन लष्करी अळीनगर  : नगर तालुक्यातील पिंपळगाव वाघा परिसरात...
पुण्यात भात काढणी अंतिम टप्प्यातपुणे  : दिवाळी सणामुळे भात पट्यात अनेक...
टेंभूचे आवर्तन सुरू करण्याची मागणीकडेगाव, जि. सांगली  : रब्बी हंगामासाठी टेंभू...
सांगलीत एफआरपीची प्रतीक्षासांगली : जिल्ह्यातील साखर कारखानदारांनी ऊस...
शेतकऱ्यांच्या अनुदानाबाबत ठाकरे सरकार...नांदेड : निवडणुकीच्या तोंडावर उद्धव ठाकरे यांनी...