नाशिकला बेळगाव ढगा येथे वणवा भडकला

नाशिकला बेळगाव ढगा येथे वणवा भडकला
नाशिकला बेळगाव ढगा येथे वणवा भडकला

नाशिक : नाशिक शहराच्या पश्चिम भागात वनविभागाच्या सातपूर वनपरिमंडळाच्या हद्दीत असलेल्या बेळगाव ढगा गावाजवळील संतोषा, भागडी या दोन डोंगरांवर (ता. २८) कृत्रिम वणवा पडल्याने डोंगरमाथ्यावर मोठ्या स्वरूपात आग लागली हाती. या ठिकाणी लागवड केलेल्या वनसंपदेसह जैवविविधतेचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले. हा वणवा सलग दोन दिवस भडकल्याने मोठ्या प्रमाणात नुकसान झाले.  डोंगराच्या पाठीमागे अगदी वनक्षेत्राला लागून असलेल्या दगडखाणीत उत्खनन सुरू आहे. त्यासाठी येथे भूसुरुंगाचे स्फोट केले जात आहेत. तसेच या ठिकाणी काम करणारे कर्मचारी यांच्याकडून बिडी सिगारेटमुळे ठिणग्या उडून वणवा भडकण्याचे प्रकार याठिकाणी सर्रासपणे घडत आहेत. पाच ते दहा वर्षांपूर्वी डोंगरमाथ्यावर लावलेली झाडे भरली होती. त्यातील तीवस, करंज, साग, कहांडळ, बेडशिंगे, धामोडा, करवंद, शिवण यांसारखी भारतीय प्रजातीची झाडे दोन दिवसांत कृत्रिम वणव्यात मोठ्या प्रमाणावर जळून खाक झाली. याबाबत वनविभाग, जिल्हा प्रशासन व महसूल विभागाने संयुक्तरीत्या कठोर कारवाई करण्याची मागणी, पर्यावरण संबंधित काम करणाऱ्या संस्था व बेळगाव ढगा ग्रामपंचायतीसह येथील नागरिकांनी केली आहे.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com