नाशिकमध्ये कोबी सरासरी २९१५ रुपये

नाशिक: येथील कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये कोबीची आवक ८३० क्विंटल झाली. त्यास प्रतिक्विंटल २०८५ ते ४१६५ दर मिळाला. सर्वसाधारण दर २९१५ रुपये राहिला.
 In Nashik, cabbage averages Rs 2915
In Nashik, cabbage averages Rs 2915

नाशिक : येथील कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये कोबीची आवक ८३० क्विंटल झाली. त्यास प्रतिक्विंटल २०८५ ते ४१६५ दर मिळाला. सर्वसाधारण दर २९१५ रुपये राहिला. आवक सरासरी असून, मागणी असल्याने कोबीच्या दरात तेजी आहे, अशी माहिती बाजार समितीच्या सूत्रांनी दिली. 

शेतीमालाची आवक सर्वसाधारण होत आहे. तुलनेत मागणी असल्याने भाजीपाला दरात सुधारणा आहे. तर बहुतांश भाजीपाल्याचे दर टिकून आहेत. वांग्यांची आवक १७२ क्विंटल झाली. त्यास प्रतिक्विंटल ७००० ते ११००० असा दर मिळाला. त्यास सरासरी दर ९००० राहिला.

फ्लॉवरची आवक ४५० क्विंटल झाली. त्यास प्रतिक्विंटल १४३० ते २९६४ दर मिळाला. त्यास सरासरी दर २२४२ राहिला. ढोबळी मिरचीची आवक २०५ क्विंटल झाली. तिला ६२५० ते ९३२५ असा दर मिळाला. सर्वसाधारण दर ८०६० राहिले. 

भोपळ्याची आवक १८४६ क्विंटल झाली. त्यास ४६५ ते १४६५ असा दर मिळाला. सर्वसाधारण दर १००० राहिला. कारल्याची आवक ३७३ क्विंटल झाली. त्यास २५०० ते ४१६५ असा दर मिळाला. सर्वसाधारण दर ३३३५ राहिला. भेंडीची आवक ५९ क्विंटल झाली. तिला २९१५ ते ३९६० असा दर मिळाला. त्यास सर्वसाधारण दर ३३३५ राहिला. काकडीची आवक १९०२ क्विंटल झाली. तिला ५०० ते ११०० असा दर मिळाला. सर्वसाधारण दर ७५० राहिला. 

उन्हाळ कांद्याची आवक २९९ क्विंटल झाली. त्यास २५०० ते ५२००, तर सर्वसाधारण दर ४०५० राहिला. लाल पोळ कांद्याची आवक १७० क्विंटल झाली. त्यास २१५० ते ४००० असा दर मिळाला. त्यास सर्वसाधारण दर ३०५० राहिला. बटाट्याची आवक ९७९ क्विंटल झाली. त्यास २१५० ते ३६५० असा दर मिळाला.

सर्वसाधारण दर ३२०० राहिला. लसणाची आवक २० क्विंटल झाली. आवक कमी असल्याने दर वधारले आहेत. त्यास ६२५० ते १२१०० असा दर मिळाला. सर्वसाधारण दर ९५०० राहिला.

केळीला सरासरी ७५० रूपये 

फळांमध्ये डाळिंबांची आवक ८४९ क्विंटल झाली. त्यास ३००० ते ९५०० दर होता. सर्वसाधारण दर ६००० राहिला. केळीची आवक ५० क्विंटल झाली. तिला ४०० ते १००० दर मिळाला. सर्वसाधारण दर ७५० राहिला. मोसंबीची आवक ८० क्विंटल झाली. तिला २००० ते ४५०० तर सर्वसाधारण दर ३५०० राहिला.

टरबूजाची आवक २५ क्विंटल झाली. त्यास ८०० ते २०००, तर सर्वसाधारण दर १४०० राहिला. पपईची आवक ५५ क्विंटल झाली. त्यास ८०० ते १५०० दर होता. सर्वसाधारण दर ११०० राहिला. लिंबाची आवक ५० क्विंटल झाली. त्यास ६५० ते १००० दर होता.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com