नाशिकमध्ये ढोबळी मिरची प्रतिक्विंटल ४००० ते ५३१२ रुपये 

नाशिकमध्ये ढोबळी मिरची प्रतिक्विंटल ४००० ते ५३१२ रुपये 
नाशिकमध्ये ढोबळी मिरची प्रतिक्विंटल ४००० ते ५३१२ रुपये 

नाशिक : नाशिक कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये बुधवारी (ता. २७) ढोबळी मिरचीची आवक ११४ क्विंटल झाली. ढोबळी मिरचीला प्रतिक्विंटल दर ४००० ते ५३१२ रुपये मिळाला. सर्वसाधारण दर ४५६० रुपये मिळाला, अशी माहिती बाजार समितीच्या सूत्रांकडून देण्यात आली.

काकडीला प्रतिक्विंटल १२५० ते २२५० रुपये दर मिळाला. सर्वसाधारण दर प्रतिक्विंटल १८५० रुपये होता. वांग्याची आवक २७४ क्विंटल झाली. त्यास प्रतिक्विंटल १००० ते २५०० रुपये दर मिळाला. सर्वसाधारण दर १७५० रुपये होता. फ्लॉवरची आवक २२९ क्विंटल होती. त्यास प्रतिक्विंटल ७७५ ते १३६० रुपये दर मिळाला. सर्वसाधारण दर ११४० रुपये होता. कोबीची आवक २०४ क्विंटल होती. त्यास प्रतिक्विंटल ८७५ ते २१२५ रुपये दर मिळाला. सर्वसाधारण दर १७१० रुपये होते. 

भोपळ्याची आवक ४८२ क्विंटल झाली. त्यास ६६५ ते १५०० रुपये असा दर मिळाला. सर्वसाधारण दर ११०० रुपये होता. कारल्याची आवक ४६ क्विंटल झाली. त्यास प्रतिक्विंटल ३१२५ ते ४७९० रुपये दर मिळाला. सर्वसाधारण दर ३६२५ रुपये असे होते. गिलक्याची आवक १७ क्विंटल होती. त्यास २०८० ते २९१५ रुपये असे दर मिळाले. सर्वसाधारण दर २२९० रुपये होते. दोडक्याची आवक ३८ क्विंटल झाली. त्यास प्रतिक्विंटल २९१५ ते ५००० रुपये असा दर मिळाला. सर्वसाधारण दर ३५४० रुपये होता. 

भेंडीची आवक ८८ क्विंटल झाली. तिला प्रतिक्विंटल २९२५ ते ३६०० रुपये दर मिळाला. सर्वसाधारण दर ३३५० रुपये होता. गवारची आवक घेतली असून आवक ८ क्विंटल झाली. तिला ७००० ते ८५०० रुपये असा दर मिळाला. सर्वसाधारण दर ८००० रुपये मिळाला. डांगर आवक २५ क्विंटल होती. त्यास प्रतिक्विंटल १००० ते १८०० रुपये दर मिळाला. सर्वसाधारण दर १७०० रुपये होता. लिंबूची आवक १४ क्विंटल होती. त्यास प्रतिक्विंटल ३००० ते ३५०० रुपये दर मिळाला. सर्वसाधारण दर ३३०० रुपये होता. 

लाल कांद्याची आवक २६८५ क्विंटल झाली. त्यास प्रतिक्विंटल २०० ते ८५९ रुपये दर मिळाला. सर्वसाधारण दर ६०० रुपये मिळाला. बटाट्याची आवक २२९६ क्विंटल झाली. त्यास प्रतिक्विंटल ७०० ते १४०० रुपये दर मिळाला. सर्वसाधारण दर ९०० रुपये राहिला. लसणाची आवक १४७ क्विंटल झाली. त्यास प्रतिक्विंटल १५०० ते ४५०० रुपये दर मिळाला. सर्वसाधारण दर २५०० रुपये मिळाला.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com