नाशिकमध्ये कारले १००० ते २६६७ रूपये

नाशिक : येथील कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये (ता.८) कारल्याची आवक ८४० क्विंटल झाली. त्यांना १००० ते २६६७ रूपये प्रतिक्विंटलचा दर मिळाला. सर्वसाधारण दर १६६७ रूपये राहिला, अशी माहिती बाजार समितीच्या सूत्रांनी दिली.
 In Nashik, cars cost Rs. 1000 to 2667
In Nashik, cars cost Rs. 1000 to 2667

नाशिक : येथील कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये (ता.८) कारल्याची आवक ८४० क्विंटल झाली. त्यांना १००० ते २६६७ रूपये प्रतिक्विंटलचा दर मिळाला. सर्वसाधारण दर १६६७ रूपये राहिला, अशी माहिती बाजार समितीच्या सूत्रांनी दिली. 

गिलक्याची आवक ४८ क्विंटल झाली. त्यास प्रतिक्विंटल २५०० ते ४१६७ रूपये दर मिळाला. सर्वसाधारण दर ३३३३ रूपये राहिले. आवक साधारण आल्याने दर स्थिर आहेत. वांग्यांची आवक ३५० क्विंटल झाली. त्यास प्रति क्विंटल ३००० ते ५००० असा दर मिळाला. त्यास सरासरी दर ४००० राहिला. फ्लॉवरची व कोबीची आवक झाली नाही. ढोबळी मिरचीची आवक २६४ क्विंटल झाली. तिला प्रतिक्विंटल ३१२५ ते ५६२५ दर मिळाला. सर्वसाधारण दर ४३७५ राहिला. हिरव्या मिरचीची आवक ३० क्विंटल झाली. तिला प्रतिक्विंटल ३२०० ते ५००० दर मिळाला. सर्वसाधारण दर ४२०० रूपये राहिला. 

भोपळ्याची आवक ६४ क्विंटल होती. त्यास २५०० ते ४०६३ असा दर मिळाला. सर्वसाधारण दर २६६६ राहिला. दोडक्याची आवक १४४ क्विंटल झाली. त्यास प्रतिक्विंटल ४१६७ ते ८३३३ दर मिळाला. सर्वसाधारण दर ६२५० राहिला. भेंडीची आवक ४२ क्विंटल झाली. तिला प्रतिक्विंटल १२० ते ३३३३ दर मिळाला. सर्वसाधारण दर २५०० राहिला. काकडीची आवक ९८० क्विंटल झाली. तिला १५०० ते २५०० असा दर मिळाला. सर्वसाधारण दर २००० राहिला. 

कांद्याची आवक २९४१ क्विंटल झाली. त्यास ७०० ते २३०१ असा दर मिळाला. त्यास सर्वसाधारण दर १८५० रूपये राहिला. बटाट्यांची आवक ८६४ क्विंटल झाली. त्यास २००० ते २८५० असा दर मिळाला. सर्वसाधारण दर २३०० राहिला. लसणाची आवक ५ क्विंटल झाली. त्यास ५२०० ते ११५०० असा दर मिळाला. सर्वसाधारण दर ८७०० राहिला. 

मोसंबीला २००० ते ४००० रूपये

फळांमध्ये डाळिंबाची आवक २३३२ क्विंटल झाली. त्यास ३०० ते ९५०० दर होता. सर्वसाधारण दर ७००० राहिला. मोसंबीची आवक १४० क्विंटल झाली. तिला २००० ते ४००० दर होता. सर्वसाधारण दर ३००० राहिला. केळीची आवक १२० क्विंटल झाली. तिला ४०० ते १००० दर होता. सर्वसाधारण दर ७०० राहिला. पपईची आवक ४० क्विंटल झाली. तिला ८०० ते १८०० दर होता. सर्वसाधारण दर १२०० राहिला. शहाळ्याची आवक २०१ क्विंटल झाली. त्यास २८०० ते ३६०० दर होता. सर्वसाधारण दर ३२०० राहिला.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com