नाशिकमध्ये ढोबळी मिरची ३२५० ते ६२५० रुपये प्रतिक्विंटल

नाशिकमध्ये ढोबळी मिरची ३२५० ते ६२५० रुपये प्रतिक्विंटल
नाशिकमध्ये ढोबळी मिरची ३२५० ते ६२५० रुपये प्रतिक्विंटल

नाशिक : येथील कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये ढोबळी मिरचीची आवक १३९ क्विंटल झाली. तिला ३२५० ते ६२५० रुपयांचा दर मिळाला. सर्वसाधारण दर ४६८७ रुपये राहिला, अशी माहिती बाजार समितीच्या सूत्रांनी दिली. 

बाजारात फ्लॉवरची आवक २१९ क्विंटल झाली. त्यास प्रतिक्विंटल ७८५ ते २२१४ रुपये दर होता. सरासरी दर १८५७ रुपये राहिला. कोबीची आवक ७२९ क्विंटल झाली. तिला सरासरी ७०८ ते १७५० रुपयांचा दर होता. सर्वसाधारण दर १५४१ रुपये राहिले. वांग्यांची १५८ क्विंटल आवक झाली. त्यांना प्रतिक्विंटल २६०० ते ५००० रुपये असा दर राहिला. त्यास सरासरी दर ३६५० रुपये राहिला.

पिकॅडोरची आवक ५४ क्विंटल झाली. तिला १००० ते ३१५० दर होता. सर्वसाधारण दर २५०० रुपये राहिला. भोपळ्याची आवक ५५४ क्विंटल होती. त्यास ११३३ ते ३००० रुपये असा दर होता. सर्वसाधारण दर २४०० रुपये राहिला. कारल्याची आवक ५०७ क्विंटल झाली. त्यांना १३३० ते २५००, तर सर्वसाधारण दर २००० रुपये राहिला. दोडक्याची आवक ७३ क्विंटल झाली. त्यास २२५० ते ४५८० रुपयांचा दर मिळाला. त्यास सर्वसाधारण दर ३०८३ रुपये राहिला. गिलक्याची आवक ३४ क्विंटल होती. त्यास १२९० ते ३७५० रुपये दर मिळाला. सर्वसाधारण दर २९५८ रुपये राहिला. भेंडीची आवक २४ क्विंटल झाली. तिला १५०० ते ३५४० रुपये दर होता. सर्वसाधारण दर २७८५ रुपये राहिला.

गवारीची आवक १० क्विंटल झाली. तिला २५०० ते ४५०० असा दर होता. सर्वसाधारण दर ४००० राहिला. डांगराची आवक २३ क्विंटल झाली. त्यास ७०० ते १४०० दर मिळाला. सर्वसाधारण दर १२०० राहिला. काकडीची आवक ९१८ क्विंटल झाली. तिला १७५० ते ३२५० असा दर होता. सर्वसाधारण दर २३५० राहिला. 

कांद्याची आवक १३३ क्विंटल झाली. त्यास १७५० ते ५०१० दर होता. सर्वसाधारण दर ४००० राहिला. बटाट्याची आवक ११४६ क्विंटल झाली. त्यास ९०० ते १६५० दर होता. सर्वसाधारण दर १३५० होता. लसणाची आवक २३ क्विंटल झाली. सर्वसाधारण दर ७५०० ते १७५०० दरम्यान होता. सरासरी दर १२५०० होता. लिंबांची आवक ४० क्विंटल झाली. सर्वसाधारण दर १००० ते १७०० दरम्यान होता. सरासरी दर १४०० होता. 

फळांमध्ये पेरूची आवक २० क्विंटल झाली. त्यांना २५०० ते ३२५० दर होता. सर्वसाधारण दर ३००० राहिला. डाळिंबांची आवक १०५२ क्विंटल झाली. त्यास ५०० ते ७७५० दर होता. सर्वसाधारण दर ५०५० राहिला. केळीची आवक १२० क्विंटल झाली. तिला ५०० ते १००० दर होता. सर्वसाधारण दर ८०० राहिला. खरबुजाची आवक ६४ क्विंटल झाली. त्यास १५०० ते ३६०० दर होता. सर्वसाधारण दर २३०० राहिला. सफरचंदाची आवक २३ क्विंटल झाली. त्यास ३००० ते ५५०० दर होता. सर्वसाधारण दर ४६०० राहिला.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com