नाशिकमध्ये ढोबळी मिरची ३७५० ते ६८७५ रुपये

नाशिक : येथील कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये ढोबळी मिरचीची आवक ३५२ क्विंटल झाली. त्यास प्रतिक्विंटल ३७५० ते ६८७५ दर मिळाला. सर्वसाधारण दर ५००० रुपये राहिला
 In Nashik, chillies cost Rs. 3750 to Rs. 6875
In Nashik, chillies cost Rs. 3750 to Rs. 6875

नाशिक : येथील कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये ढोबळी मिरचीची आवक ३५२ क्विंटल झाली. त्यास प्रतिक्विंटल ३७५० ते ६८७५ दर मिळाला. सर्वसाधारण दर ५००० रुपये राहिला, अशी माहिती बाजार समितीच्या सूत्रांनी दिली. 

शेतमालाची आवक सर्वसाधारण असून सध्या दरात सुधारणा आहे. वांग्यांची ४०० क्विंटल आवक झाली. त्यांना प्रतिक्विंटल १५०० ते ४०००, तर सरासरी दर ३००० रूपये राहिला. फ्लॉवरची आवक ५८१ क्विंटल झाली. त्यास प्रतिक्विंटल ४६४  ते २४३५, तर सरासरी दर १५७१ रूपये राहिला. कोबीची आवक ६८१ क्विंटल झाली. तिला ६२५ ते ११९७ असा दर मिळाला. सर्वसाधारण दर १५०० राहिले.          भोपळ्याची आवक १०८० क्विंटल होती. त्यास १३३० ते २६६५, तर सर्वसाधारण दर २००० रूपये राहिला. कारल्याची आवक ५२८ क्विंटल झाली. त्यास २०८१ ते ३३३०, तर सर्वसाधारण दर २९१५ राहिला. दोडक्याची आवक ३०० क्विंटल झाली. त्यास २५०० ते ५८३०, तर सर्वसाधारण दर ३३३० राहिला. गिलक्यांची आवक १३२ क्विंटल झाली. त्यांना २५०० ते ५००० दर मिळाला.

सर्वसाधारण दर ४१६५ राहिला. भेंडीची आवक ३० क्विंटल झाली. त्यास १६६५ ते २९१५ दर मिळाला. सर्वसाधारण दर २०८३ राहिला. हिरवी मिरचीची आवक ३० क्विंटल झाली. तिला २५०० ते ५२०० असा दर मिळाला. सर्वसाधारण दर ४८०० राहिला. काकडीची आवक १४४० क्विंटल झाली. तिला १५०० ते २५०० असा दर मिळाला. सर्वसाधारण दर २००० राहिला. 

कांद्याची आवक १८४६ क्विंटल झाली. त्यास ९०० ते ४२५१ असा दर मिळाला. त्यास सर्वसाधारण दर ३४०० राहिला. बटाट्याची आवक ७७६ क्विंटल झाली. तिला १९०० ते २९०० असा दर मिळाला. सर्वसाधारण दर २३५० राहिला. लसणाची आवक २५ क्विंटल झाली. त्यास ५६०० ते १०५०० दर मिळाला. सर्वसाधारण दर ८६०० राहिला.

फळांमध्ये डाळिंबांची आवक १२४० क्विंटल झाली. त्यास ३०० ते ११००० दर होता. सर्वसाधारण दर ६५०० राहिला. मोसंबीची आवक २२६ क्विंटल झाली. तिला १६०० ते ३४०० दर राहिला. सर्वसाधारण दर २८०० रूपये राहिला. 

आवक साधारण, दरांत सुधारणा  

सध्या भाजीपाल्याची आवक सर्वसाधारण होत आहे. त्यामुळे सध्या उठाव आहे. प्रामुख्याने वेलवर्गीय भाजीपाल्यांचे दर तेजीत आहे. तर, इतर भाज्या व फळांच्या आवकेप्रमाणे दरामध्ये चढ-उतार झाल्याचे दिसून आले.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com