नाशिक जिल्हा प्रशासनातर्फे `गुढीपाडवा - मतदान वाढवा’ उपक्रम

नाशिक जिल्हा प्रशासनातर्फे `गुढीपाडवा - मतदान वाढवा’ उपक्रम
नाशिक जिल्हा प्रशासनातर्फे `गुढीपाडवा - मतदान वाढवा’ उपक्रम

नाशिक : लोकसभा सार्वत्रिक निवडणुकीसाठी ‘No voter to be left behind’ अशी संकल्पना घेऊन भारत निवडणूक आयोगाने जास्तीत जास्त मतदारांनी या निवडणूक प्रक्रियेत सहभागी व्हावे, याकरिता जनजागृती कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी यांच्या वतीने मतदानाची टक्केवारी वाढविण्यासाठी गोल्फ क्लब मैदानापासून ‘गुढीपाडवा- मतदान वाढवा’ या उपक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यानिमित्त रॅलीचे आयोजन करण्यात आले होते.

या वेळी उदघाटन प्रसंगी जिल्हाधिकारी सूरज मांढरे म्हणाले, ‘‘भारत हा जगातील सर्वात मोठा लोकशाही प्रधान देश आहे. ही लोकशाही व्यवस्था सदृढ व बळकट करायची असेल तर प्रत्येक नागरिकाने मतदानाचे कर्तव्य बजावले पाहिजे. सोशल मीडियाचा सकारात्मक वापर करण्याबरोबर प्रत्येकाने मित्रांना, नातेवाइकांना पत्र लिहून मतदान करण्यासाठी जागृती केली पाहिजे,’’ असे आवाहन त्यांनी केली.

उपजिल्हाधिकारी अरुण आनंदकर यांनी रॅलीत तसेच जनजागृती करताना कोणत्याही राजकीय विचारधारेचा पुरस्कार केला जाणार नाही, याची दक्षता घेण्यासंबंधी सूचना करत नियोजनबद्ध रॅली पार पाडली. प्राथमिकच्या शिक्षणाधिकारी डॉ. वैशाली झनकर यांनी उपक्रमाची पार्श्वभूमी विशद केली. माध्यमिकचे शिक्षणाधिकारी नितीन बच्छाव यांनी उपक्रमाबद्दल माहिती दिली.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com