नाशिक जिल्हा बँकेतर्फे नवीन सामोपचार कर्ज परतफेड योजना जाहीर

नाशिक : नाशिक जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेला आर्थिक संकटातून बाहेर काढण्याकरिता थकबाकी वसुलीसाठी कठोर पावले उचलण्यात आली होती. मात्र, त्यास प्रतिसाद न मिळाल्याने बँकेची थकबाकी मोठ्या प्रमाणात वाढलेली असून बँकेचे अनुत्पादक कर्जाचे प्रमाण वाढलेले आहे. या परिस्थितीत सावरण्यासाठी जिल्हा बॅंकेकडून नवीन सामोपचार कर्ज परतफेड योजना २०२० जाहीर करण्यात आली आहे.
Nashik District Bank announces new symposium loan repayment scheme
Nashik District Bank announces new symposium loan repayment scheme

नाशिक : नाशिक जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेला आर्थिक संकटातून बाहेर काढण्याकरिता थकबाकी वसुलीसाठी कठोर पावले उचलण्यात आली होती. मात्र, त्यास प्रतिसाद न मिळाल्याने बँकेची थकबाकी मोठ्या प्रमाणात वाढलेली असून बँकेचे अनुत्पादक कर्जाचे प्रमाण वाढलेले आहे. या परिस्थितीत सावरण्यासाठी जिल्हा बॅंकेकडून नवीन सामोपचार कर्ज परतफेड योजना २०२० जाहीर करण्यात आली आहे.

यापूर्वी विविध कार्यकारी संस्थांचे मोठे थकबाकीदार प्रभावशाली थकबाकीदार यांच्यावर सहकार कायदा नियम १०७ अन्वये बँकेचे नाव लावून जमीन जप्ती करून जमिनीच्या लिलावाची प्रक्रिया करण्यात आली होती. परंतु गत ३-४ वर्षापासून कर्जमाफी योजनांच्या अंबलबजावणीमुळे व नैसर्गिक आपत्तीमुळे ते शक्य झाले नाही. कर्ज वसुलीसाठी प्राथमिक शेती संस्था स्तरावरील व थेट कर्जाच्या थकबाकीदार सभासदांकडील थकबाकी वसूल होणे आवश्यक असल्याने तसेच प्राथमिक शेती संस्था व थकबाकीदार सभासदांकडून जुन्या सामोपचार योजनेऐवजी नवीन योजना राबविण्याबाबत वारंवार मागणी करण्यात येत होती. त्यानुसार जिल्हा बँकेची सध्याची सुरू असलेली सामोपचार कर्ज परतफेड योजना तसेच बँकेचा वाढलेला एनपीए व त्यानुसार असलेल्या कालनिहाय व रक्कमनिहाय थकबाकीचे व अपेक्षित वसुलीचे अवलोकन केले आहे. नाबार्ड व आरबीआय यांच्या मार्गदर्शक सूचना विचारात घेऊन बँकेच्या संचालक मंडळाने नवीन सुधारित सामोपचार कर्ज परतफेड योजना २०२० या नावाने राबविण्यास मान्यता देण्यात आली.

३० जून २०१६ अखेरीस विविध कार्यकारी संस्था पातळीवर थकीत असलेले सर्व प्रकारचे शेती व शेतीपूरक (अल्पमुदत, मध्यम मुदत, दीर्घमुदत) संपूर्ण येणे कर्ज व बँकेमार्फत वितरित केलेल्या थेट कर्जपुरवठा योजनेअंतर्गत थकीत झालेले सर्व थकबाकीदार सभासद या योजनेस पात्र राहतील. कर्जदाराकडील थकीत कर्जाची थकबाकी झाल्यापासून पुढे होणाऱ्या एकूण व्याज रकमेवर व्याज सवलत म्हणून मिळेल.

थकबाकी सभासदांनी या योजनेअंतर्गत लाभ घेतल्यानंतर होणाऱ्या रकमेच्या किमान ५० टक्के रक्कम भरणा करून योजनेत भाग घेता येईल. उर्वरित ५० टक्के रक्कम प्रस्ताव मंजूर झाल्यानंतर दोन महिने अथवा योजनेचे अंतिम भरणा करणे आवश्यक राहील. कलम १०१ व १०१(२) १०७ अन्वये चालू असलेली जप्ती, अपसेट प्राइस व लिलाव कारवाई आहे. त्या स्तरावर या योजनेतील अटीनुसार कर्जाची व्याजासह पूर्ण परतफेड होईपर्यंत स्थगित ठेवली जाणार आहे.

योजनेचा कालावधी ठरावीक १ जुलै ते ३० सप्टेंबर २०२० या कालावधीत योजना लागू राहणार आहे. थकबाकीदार सभासदांनी योजनेत भाग घेऊन पुनश्च कर्ज मिळवण्यासाठी पात्र व्हावे व बँकेस सहकार्य करावे, असे आवाहन बँकेच्या वतीने बँकेचे अध्यक्ष केदा आहेर व संचालक मंडळातर्फे करण्यात आलेले आहे.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com