नाशिक जिल्हा बॅँकेची पीक कर्जवाटपात आघाडी

नाशिक : जिल्हा बॅंकेला खरीप हंगामासाठी पीककर्ज वाटपाचा ४३७.३५ कोटी लक्ष्यांक दिला होता. सप्टेंबरअखेर जिल्हा बँकेने ठरवून दिलेले उद्दिष्ट साध्य केले आहे.
Nashik District Bank leads in crop loan disbursement
Nashik District Bank leads in crop loan disbursement

नाशिक : जिल्हा बॅंकेला खरीप हंगामासाठी पीककर्ज वाटपाचा ४३७.३५ कोटी लक्ष्यांक दिला होता.  सप्टेंबरअखेर जिल्हा बँकेने ठरवून दिलेले उद्दिष्ट साध्य केले आहे. सुमारे ६० हजार १७५ सभासदांना ४४३.५२ कोटी रुपये वाटप करण्यात आले आहेत . त्याची टक्केवारी १०१ इतकी असल्याने यावर्षी जिल्हा बँक आघाडीवर आहे.

महाविकास आघाडी सरकारने महात्मा जोतीराव कर्जमुक्ती योजनेच्या माध्यमातून जिल्हा बँकेला ९१५ कोटी रुपये मिळाले आहेत. जिल्हा बँकेला सर्वाधिक कर्जवाटपाचे उद्दिष्ट होते. अधिकाधिक शेतकऱ्यांना कर्ज वाटप करावे, अशी सूचना जिल्हाधिकारी सूरज मांढरे यांनी केल्या होत्या.

त्यानुसार बँकेने योग्य नियोजन करून खरीप पीक कर्जवाटपाचा लक्ष्यांक गाठला. जिल्हा उपनिबंधक सतीश खरे यांच्याकडे मुख्य कार्यकारी अधिकारी ही जबाबदारी असताना त्यांनी याकामी लक्ष दिले. गेल्या काही वर्षात जिल्हा बँक आर्थिक अडचणीत होती. त्यातच केंद्र सरकारच्या वतीने २०१७ साली झालेल्या  नोटबंदीचा फटका बसला.

पाच वर्षांतील खरीप पीक कर्जवाटप 

वर्ष  वितरण (कोटी)  टक्केवारी
२०१६-१७ १७१९.१८ १०९
२०१७-१८ २१२.७३ १४
२०१८-१९ ३२६.४९ ६५
२०१९-२० १९९.३८ २९
२०२०-२१ ४४३.५२  १०१

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com