agriculture news in marathi, Nashik District Declaration Claim Settlement Top Position in the State | Agrowon

नाशिक जिल्हा वनहक्क दावे निपटाऱ्यात राज्यात अव्वल
टीम अॅग्रोवन
शनिवार, 8 सप्टेंबर 2018

नाशिक  : आदिवासींनी अतिक्रमित केलेली वनजमीन ताब्यात देणाऱ्या वन हक्क कायद्याच्या अंमलबजावणीत नाशिक जिल्हा राज्यात अव्वल ठरला आहे. प्रलंबित दाव्यांचा निपटारा करण्यासाठी नाशिक जिल्ह्यात तीन समित्या तयार करण्यात आल्यामुळे प्रत्येक दिवशी सुमारे ७०० दाव्यांना मंजुरी दिली जात आहे.

नाशिक  : आदिवासींनी अतिक्रमित केलेली वनजमीन ताब्यात देणाऱ्या वन हक्क कायद्याच्या अंमलबजावणीत नाशिक जिल्हा राज्यात अव्वल ठरला आहे. प्रलंबित दाव्यांचा निपटारा करण्यासाठी नाशिक जिल्ह्यात तीन समित्या तयार करण्यात आल्यामुळे प्रत्येक दिवशी सुमारे ७०० दाव्यांना मंजुरी दिली जात आहे.

दहा वर्षांपासून नाशिक जिल्ह्यातील वनहक्क दाव्यांचे काम अतिशय संथगतीने सुरू होते. आदिवासींना त्यांच्या हक्काच्या जागेचा ताबा मिळण्यासाठी किसान सभेतर्फे ६ मार्चला नाशिक येथून मंत्रालयावर लाँग मार्च काढण्यात आला होता. हजारो आदिवासी महिला व पुरुषांचा हा मोर्चा पायी चालत १२ मार्चला मुंबईत पोचला होता. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सहा महिन्यांत दावे निकाली काढण्याचे आश्वासन मोर्चेकऱ्यांना दिले होते. ६ सप्टेंबर रोजी ही मुदत संपली असली तरी, महिनाअखेर २१ हजार प्रलंबित दावे निकाली काढण्यासाठी जिल्ह्णातील महसूल यंत्रणा युद्धपातळीवर काम करत आहे.

पाच महिन्यांत जेमतेम सात हजार दावे निकाली निघाले. उर्वरित दाव्यांवर अंतिम निर्णय घेण्यासाठी असलेल्या एका जिल्हास्तरीय समितीचे विकेंद्रीकरण करण्यात आले असून, त्याची जबाबदारी नाशिक व मालेगावच्या अपर जिल्हाधिकाऱ्यांवर सोपविण्यात आली आहे. त्यांच्या अध्यक्षतेखालील समितीने जिल्हास्तरीय समितीकडे आलेल्या   दाव्यांना मंजुरी देण्यास सुरवात केली आहे. परंतु ११ हजार दाव्यांची फेरसुनावणी ‘स्यु मोटो’ घेण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतल्यामुळे जे दावे अमान्य करण्यात  आले, त्यांची सुनावणी करण्यासाठी
स्वतंत्र उपजिल्हाधिकाऱ्यांची नेमणूक केली आहे.

महिन्यात १३ हजार दावे निकाली काढणार
दहा दिवसांपूर्वी आदिवासी विकास विभागाच्या प्रधान सचिवांनी नाशिकला येऊन आढावा घेतला होता. त्यात १३ हजार दाव्यांचा निपटारा एका महिन्यात करण्याचा निर्णय झाला. त्यानुसार दररोज उपविभाग व जिल्हास्तरावर ७०० दाव्यांवर निर्णय घेतला जात आहे. राज्यातील २६ जिल्ह्णांमध्ये सुरू असलेल्या कामाचा वेग पाहता, नाशिक अव्वल ठरला आहे.

इतर ताज्या घडामोडी
वाशीम जिल्ह्यात रब्बीत होणार एक लाख...वाशीम : जिल्ह्यात या रब्बी हंगामासाठी एक लाख...
खानदेशातील बाजारांमध्ये ज्वारीची आवक...जळगाव : अतिपावसामुळे खानदेशात ज्वारीचे आतोनात...
कापूस वेचणीला परप्रांतीय मजुरांचा आधारअकोला : अकोट तालुक्यातील ग्राम तरोडा व परिसरात...
अमरावती जिल्ह्यात २४५० कोटींचे नुकसानअमरावती : मॉन्सुनोत्तर पावसामुळे जिल्ह्यात तीन...
नाशिक जिल्ह्यात साडेसहा लाख हेक्टरवर...नाशिक : ऑक्टोबर महिन्यातील पावसामुळे जिल्ह्यातील...
 बारामती उपविभागात ४३ हजार हेक्टरवरील...पुणे ः मॉन्सूनोत्तर पावसाने बारामती...
मराठवाड्यात ४१ लाख ४९ हजार हेक्टरवरील...औरंगाबाद  : अतिवृष्टीमुळे मराठवाड्यातील ४१...
पुणे बाजार समितीत ‘आंबेमोहर’च्या दरात...पुणे  ः आंबेमोहर तांदळासाठी प्रसिद्ध...
सोलापूर जिल्ह्यात शेतकऱ्यांसाठी...सोलापूर  ः कोरड्या आणि ओल्या दुष्काळामुळे...
नगर : रब्बी ज्वारीचा १ लाख ९१ हजार...नगर  ः मॉन्सूनोत्तर पाऊस जोरात झाला असला तरी...
सातारा जिल्ह्यात रब्बीची १३ टक्के...सातारा  : जिल्ह्यात पावसाने उघडीप दिल्याने...
शेतकऱ्यांना जास्तीत जास्त मदत...अर्धापूर, जि. नांदेड  : शेतकऱ्यांच्या...
शिवसेनेची गुरुवारी तुरंबे येथे ऊस परिषदकोल्हापूर  : येत्या गळीत हंगामासाठी ऊस दर...
आंदोलनाचा दणका; केळी पीकविमा...अकोला  ः २०१८-१९ या वर्षात केळी उत्पादक...
ऊस दराबाबत आज कोल्हापुरात बैठककोल्हापूर : यंदाच्या ऊस दरावर सकारात्मक तोडगा...
शिवसेनाप्रमुखांचा आज स्मृतिदिनमुंबई  : शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचा...
पीकविम्यासाठी पुण्यात चौथ्या दिवशीही ...पुणे  ः गेल्या वर्षीचा खरीप पीकविमा न...
औरंगाबादमध्ये कोबी १००० ते १८०० रुपये...औरंगाबाद : येथील कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये...
ढगातील हिमकणांच्या निर्मितीची प्रक्रिया...एकत्रित प्रकारच्या ढगांमध्ये हवेच्या उभ्या...
किमान तापमानात घसरण, थंडीला सुरुवातमहाराष्ट्रावर १०१२ हेप्टापास्कल इतका अधिक हवेचा...