नाशिक जिल्ह्यात हरभऱ्याच्या उत्पादनात वाढ अपेक्षित

नाशिक जिल्ह्यात हरभऱ्याच्या उत्पादनात वाढ अपेक्षित
नाशिक जिल्ह्यात हरभऱ्याच्या उत्पादनात वाढ अपेक्षित

नाशिक  : जिल्ह्यात रब्बी हंगामात चालू वर्षी हरभऱ्याचा पेरा दुपटीने वाढला असून मालेगाव, येवला, सिन्नर व दिंडोरी तालुका यावर्षी आघाडीवर आहे. समाधानकारक पाऊस झाल्याने जिल्ह्यात रब्बीची आवर्तने व संरक्षित पाणी साठ्याचा अंदाज घेऊन हरभाऱ्याचा पेरण्याही मोठ्या प्रमाणावर झाल्या आहेत. आत्तापर्यंत संपूर्ण जिल्ह्यात प्रस्तावित क्षेत्रापैकी ९४ टक्के पेरण्या पूर्ण झाल्या आहेत. त्यामुळे चालू वर्षी हरभऱ्याच्या उत्पादनात वाढ होणार असल्याचे सकारात्मक चित्र आहे. मागील वर्षी पाण्याचे दुर्भिक्ष्य असल्याने जिल्ह्यात ४१ हजार १८४ हेक्टर क्षेत्रापैकी १७ हजार ८४२ हेक्टर क्षेत्रावर अवघ्या ४३.३२ टक्के पेरण्या झाल्या होत्या. मात्र यंदा यात वाढ होऊन ३८ हजार ८५९ हेक्टर क्षेत्रावर पेरण्या पूर्ण झाल्याने हा आकडा ९४ टक्क्यांवर गेला आहे. मागील वर्षी सटाणा, नांदगाव, येवला व चांदवड तालुक्यांत पेरण्या घटल्या होत्या. मात्र, यावर्षी तालुक्यांमध्ये हा पेरा वाढला आहे तर नाशिक, निफाड तालुक्यांत पेरा घटला आहे. हरभरा हे नगदी पीक असल्याने उत्पादन खर्च कमी असतो. त्यात दर चांगले असल्याने हरभऱ्याला पसंती दिली आहे. सुरुवातीला ऑक्टोबर महिन्यात ओल असल्याने याचकाळात हरभऱ्याच्या पेरण्या झाल्या. त्यामुळे पिके चांगली येऊन ९ ते १० क्विंटलपर्यंत एकरी उत्पादन काहींना मिळालेले आहे. नंतरच्या पेरण्यांमध्ये हे उत्पादन चार क्विंटलपर्यंत घटले आहे. नंतरच्या काळात थंडी कमी असल्याने व ढगाळ वातावरणाचा उत्पादनांवर परिणाम होणार असल्याचे दिसून येत आहे.   

 या वर्षी आवर्तन मिळण्याची खात्री असल्याने ऑक्टोबरच्या मध्यात हरभरा पेरण्या करण्यात आल्या. या वर्षी उत्पादन चांगले मिळाले. मात्र, नंतरच्या पेरण्यांमध्ये उत्पादकता घटली आहे.  - अजय परदेशी, शेतकरी, बोकटे, ता. येवला.   

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com