नाशिक जिल्ह्यात दोन लाखांवर शेतकऱ्यांनी उतरविला खरीप पीकविमा

नाशिक : पंतप्रधान पीक विमा योजनेच्या २०२०-२१ वर्षासाठी पिकविमा भरण्याची अंतिम मुदत शुक्रवार (ता.३१) पर्यंत होती. जिल्ह्यात शुक्रवारअखेर सकाळी १० वाजेपर्यंत २ लाख ३१ हजार ८२१ शेतकऱ्यांनी पीक विमा उतरविला.
 In Nashik district, over two lakh farmers have availed kharif crop insurance
In Nashik district, over two lakh farmers have availed kharif crop insurance

नाशिक : पंतप्रधान पीक विमा योजनेच्या २०२०-२१ वर्षासाठी पिकविमा भरण्याची अंतिम मुदत शुक्रवार (ता.३१) पर्यंत होती. जिल्ह्यात शुक्रवारअखेर सकाळी १० वाजेपर्यंत २ लाख ३१ हजार ८२१ शेतकऱ्यांनी पीक विमा उतरविला. 

जिल्ह्यात सात-बाऱ्यावर असणाऱ्या शेतकऱ्यांची संख्या ८ लाख ४४ हजार ५६५ इतकी आहे. त्यापैकी २ लाख ३१ हजार ८२१ शेतकऱ्यांनी पीकविमा भरण्यासाठी प्रतिसाद दिला आहे. यात अजूनही वाढ होण्याची शक्यता आहे. मात्र, बहुतांश शेतकऱ्यांनी याकडे पाठ फिरवल्याचे चित्र आहे.

पंतप्रधान पीक विमा योजनेत सहभागी होण्यासाठी आवाहन करूनही प्रतिसाद मिळालेला नाही. मालेगाव तालुक्यातील शेतकऱ्यांनी सर्वाधिक सहभाग नोंदविला आहे. तर, सर्वात कमी ७२६ इतकी नोंद झाली आहे. त्यामुळे ही संख्या साधारण २.५० लाखाच्या पुढे जण्याची शक्यता वर्तविण्यात आली आहे. मात्र, एकूण शेतकरी संख्येच्या ती कमी असणार  आहे. 

पिक विम्याची स्थिती (ता.३१अखेर)

तालुका पीक विमा
मालेगाव  ५७०६५
सटाणा  ३६६२६
नांदगाव   २६७७४
कळवण  ७४४२
देवळा    १७१०१
दिंडोरी  ३२३९
सुरगाणा ३३०७
नाशिक ७२६
त्र्यंबकेश्वर  ६८१४
इगतपुरी  ९५४५
पेठ १०३८३
निफाड ७७५०
सिन्नर २२११७
येवला  १२१६५
चांदवड  १०७६७

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com