Agriculture news in marathi In Nashik district, the pace of wheat harvesting in fear of unseasonable rain | Agrowon

नाशिक जिल्ह्यात ‘अवकाळी’च्या भीतीने गहू काढणीला वेग

टीम अॅग्रोवन
शुक्रवार, 20 मार्च 2020

नाशिक : बदलत्या हवामानामुळे राज्यात अनेक ठिकाणी अवकाळीच्या तडाख्यात काढणीला आलेल्या पिकांचे नुकसान झाले आहे. अवकाळी पावसाच्या भीतीने जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी गहू काढणीला जोमाने सुरुवात केली आहे. हातातोंडाशी आलेला घास वाया जाऊ नये, यासाठी शेतकऱ्यांची गहू काढणीची लगबग सुरू आहे. 

नाशिक : बदलत्या हवामानामुळे राज्यात अनेक ठिकाणी अवकाळीच्या तडाख्यात काढणीला आलेल्या पिकांचे नुकसान झाले आहे. अवकाळी पावसाच्या भीतीने जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी गहू काढणीला जोमाने सुरुवात केली आहे. हातातोंडाशी आलेला घास वाया जाऊ नये, यासाठी शेतकऱ्यांची गहू काढणीची लगबग सुरू आहे. 

जिल्ह्यात रब्बीचे एकूण १ लाख १३ हजार १९१ हेक्टर क्षेत्र निर्धारित करण्यात आले होते. मात्र, चालू वर्षी हा आकडा ओलांडून १ लाख ३६ हजार ४३५ हेक्टर क्षेत्रावर पेरण्या झाल्या आहेत. ही टक्केवारी १२०.५४ इतकी आहे. चालू वर्षी ५० हजार हेक्टरहून अधिक पेरण्या झाल्या आहेत. प्रामुख्याने अतिवृष्टीमुळे खरीप कांदा खराब झाला. त्यामुळे पुढील टप्प्यात लागवडीसाठी कांदा रोपांचा तुटवडा जाणवू लागल्याने गव्हाच्या पिकाचा पेरा वाढला.

मालेगाव तालुक्यात गव्हाच्या पेरण्या चारपटीने झाल्या आहेत. त्याखालोखाल बागलाण, कळवण, देवळा, सुरगाणा, निफाड सिन्नर, येवला या तालुक्यामध्येही गव्हाचे क्षेत्र वाढले आहे. 

काढणीच्या दरात वाढ 

गहू सोंगणीला मजुरांची टंचाई आहे. यांत्रिकीकरण पद्धतीने काढणीवर शेतकऱ्यांचा जोर आहे. मागील वर्षाच्या तुलनेत यावर्षी पेरण्या अधिक झाल्या. त्यामुळे यंत्रांद्वारे गव्हाच्या काढणीच्या दरात एकरी २०० ते ३०० रुपयांनी वाढ झाली आहे. मागील वर्षी हे दर १५०० ते १६०० रुपयांपर्यंत होते. 
 


इतर ताज्या घडामोडी
सोलापूर जिल्ह्यात पावसामुळे महावितरणचे...सोलापूर ः महावितरणच्या अकलूज, पंढरपूर व...
वळण योजना प्रकल्प पूर्ण करा : भुजबळनाशिक : ‘‘जिल्ह्यातील पाणी पश्चिमेकडे वाहून...
कृषीकन्येकडून शेतकऱ्यांना मार्गदर्शनबदलापूर (जि.ठाणे) ः कृषी कार्यानुभव...
मालेगावात कांदा निर्यातबंदीच्या...मालेगाव, जि. नाशिक : गेल्या महिन्यात कांद्याला...
सोलापुरातील शेतकऱ्यांनो कृषी...सोलापूर : यंदाच्या वर्षासाठीची कृषी यांत्रिकीकरण...
जीवामृत निर्मितीचे प्रात्यक्षिकनशिराबाद, जि. बुलडाणाः येथील कृषीकन्या भाग्यश्री...
हिंगोलीतील सहा मंडळात अतिवृष्टीहिंगोली :जिल्ह्यात मंगळवारी (ता.२२) सकाळी...
द्राक्ष उत्पादकांची व्यापारी,...नाशिक : सुमारे ९५ टक्के द्राक्ष व्यापारी हे...
जळगाव जिल्ह्यात केळी उत्पादकांना विमा...जळगाव : शेतकरी प्रश्‍नी शरद जोशी प्रणित शेतकरी...
दुधना नदीला पूर, पिकांत पाणीच पाणीपरभणी : सेलू तालुक्यातील ब्रम्हवाकडी येथील निम्न...
उदगीरमधील ‘देवर्जन’ सात वर्षांनंतर भरलाउदगीर : देवर्जन (ता. उदगीर) येथील मध्यम...
बीड, लातूरमधील मंडळांत दमदार पाऊसऔरंगाबाद : औरंगाबाद, जालना, बीड, उस्मानाबाद,...
गिरणा पट्ट्यात पूर ओसरताच वाळूचा उपसा...जळगाव : गिरणा परीसरातील शेतकऱ्यांना पूर,...
सेस रद्द करा, अन्यथा बंद पुकारूपुणे ः केंद्र सरकारच्या कृषी आणि पणन विषयक तीन...
जळगावात बाजार समित्या बरखास्तीचे राजकारणजळगाव ः जिल्ह्यात दोन्ही काँग्रेस, शिवसेनेची...
शेतकऱ्यांसाठी सुखावणारा कायदा ः...कोल्हापूर ः शेती उत्पन्न व्यापार आणि वाणिज्य...
बुलडाण्यात दहा हजार हेक्टरवर क्षेत्र...बुलडाणा ः जिल्ह्यात शनिवार (ता. १९) व रविवारी (ता...
सिंधुदुर्ग जिल्ह्याला मुसळधार पावसाने...सिंधुदुर्ग ः जिल्ह्याच्या काही भागाला सोमवारी (ता...
अखेर ६६५ शेतकऱ्यांना विम्याचा लाभअकोला ः  सन २०१९ च्या खरीप हंगामात पंतप्रधान...
संत्रा वाहतुकीसाठी रेल्वेकडून वरूड...अमरावती : किसान रेल्वेच्या माध्यमातून येत्या...