नाशिक जिल्ह्यात रब्बी हंगामात ६४ टक्के पेरण्या पूर्ण

In Nashik district, the rabi season is complete with 64% sowing
In Nashik district, the rabi season is complete with 64% sowing

नाशिक : रब्बी हंगामातील पेरण्या सर्वसाधारणपणे डिसेंबरच्या पहिल्या आठवड्यापर्यंत पूर्ण होणे आवश्यक असते. मात्र, चालू वर्षी अतिवृष्टीमुळे रब्बी हंगामातील पेरण्या सव्वा महिना पुढे गेल्याचे चित्र आहे. अद्यापपर्यंत रब्बीच्या पेरण्या पूर्ण न झाल्याने ही टक्केवारी ६४ टक्के इतकीच आहे. त्यामुळे एकरी उत्पादन घटण्याची शक्यता असल्याचे कृषी विभागाचे म्हणणे आहे. 

जिल्ह्यातील १ लाख १३ हजार १९१ हेक्टर रब्बीच्या क्षेत्रापैकी ७५ हजार ५३९ हेक्टर क्षेत्रावर रब्बी हंगामातील पेरण्या झाल्या आहेत. त्याचे प्रमाण ६४.९७ टक्के इतकेच आहे. गेल्या वर्षी तुलनेत ही आकडेवारी कमी असल्याचे पाहायला मिळते. चालू वर्षीच्या रब्बी हंगामात मका, ज्वारी, गहू, हरभरा हे क्षेत्र वाढणार असले तरी पेरण्या उशिराने झाल्याने उत्पादकता कशी असणार हे बघणे अपेक्षित आहे. 

जिल्ह्यात मालेगाव व सिन्नर तालुक्यात पेरण्यांची आकडेवारी समाधानकारक आहे; तर देवळा, नांदगाव, सुरगाणा, सिन्नर व येवला तालुक्यात पेरण्या सर्वसाधारण आहेत. मात्र बागलाण, नाशिक, इगतपुरी, पेठ, निफाड, चांदवड तालुक्यात अजूनही पेरण्या कमी प्रमाणावर आहेत. 

याबाबत जिल्हा अधीक्षक कृषी कार्यालयाचे तंत्रअधिकारी जितेंद्र शाह म्हणाले, की गहू पिकामध्ये एकरी उत्पादन घटण्याची शक्यता आहे. त्यामुळे एकरी पेरणीसाठी १०० किलोऐवजी १२० किलोपर्यंत बियाणे वापरल्यास अपेक्षित उत्पादन मिळेल.

तेलबिया पिकांचे क्षेत्र शून्यावरच  जिल्ह्यात २७५ हेक्टर क्षेत्रावर तेलबिया पिकांचे क्षेत्र प्रस्तावित आहे. त्यामध्ये करडई ५६ हेक्टर, जवस १ हेक्टर, सूर्यफूल ४ हेक्टर क्षेत्रावर असते. मात्र, अद्यापपर्यंत पेरण्या झालेल्या नाहीत. त्यामुळे तेलबियांचे उत्पादन जिल्ह्यात होणार नसल्याचे दिसून येत आहे. 

पिके सर्वसाधारण क्षेत्र पेरणी क्षेत्र (हेक्टर) टक्केवारी
ज्वारी ५७५५ ४४१३ ७७
गहू ६९९६७ ३९६६४ ६४
मका २५१६ ३२५४ १२९
हरभरा ४११८४ २५१०९ ६१
इतर डाळ पिके ९६८ १०९९ ११४
तृणधान्य ७०७६७ ४७३३१ ६७
कडधान्य ११२९१६ ७३५३९ ६५
तेलबिया २७५

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com