Agriculture news in Marathi, Nashik district receives heavy rains again | Agrowon

नाशिक जिल्ह्यातील काही भागात पुन्हा मुसळधार पाऊस

टीम अॅग्रोवन
शुक्रवार, 6 सप्टेंबर 2019

नाशिक : जिल्ह्यात गेल्या पंधरा दिवसांपेक्षा अधिक काळ पावसाने ओढ दिली होती. पावसाच्या प्रतीक्षेत शेतकरी असताना बुधवारी (ता. ४) चांदवड, दिंडोरी, कळवण, निफाड व नाशिक तालुक्यात पावसाने दमदार हजेरी लावली. त्यामुळे शेतकऱ्यांमध्ये समाधानाचे वातावरण आहे. 

नाशिक : जिल्ह्यात गेल्या पंधरा दिवसांपेक्षा अधिक काळ पावसाने ओढ दिली होती. पावसाच्या प्रतीक्षेत शेतकरी असताना बुधवारी (ता. ४) चांदवड, दिंडोरी, कळवण, निफाड व नाशिक तालुक्यात पावसाने दमदार हजेरी लावली. त्यामुळे शेतकऱ्यांमध्ये समाधानाचे वातावरण आहे. 

पावसाची वाट पाहत असताना दुपारनंतर दमदार पावसाला सुरवात झाली. चांदवड तालुक्यात वडणेर भैरव, धोंडगव्हान परिसरात मुसळधार पाऊस झाला. काही क्षणात पावसाचा वेग वाढल्याने ओढे-नाले एक झाले. काही काळ धोंडगव्हाण व पाचोरे वणी या गावांचा संपर्क तुटला होता. त्यामुळे या परिसरातील टोमॅटो पिकाचे मोठे नुकसान झाले आहे. या पावसामुळे द्राक्ष उत्पादकांची चिंता वाढली असून त्यांनी धास्ती घेतली आहे. त्यात काही शेतकऱ्यांनी छाटण्यांची सुरवात केली असून हंगाम सुरू होण्याच्या ऐन तोंडावर पावसाचा तडाखा बसला आहे. 

दिंडोरी तालुक्यात तिसगाव, खेडगाव, शिंदवड, जानोरी, मोहाडी, खतवड, दहेगाव व लखमापूर भागातही पावसाने जोरदार हजेरी लावली. यामध्ये तिसगाव व शिंदवड परिसरात तीन तासांत ८५ मिमी पावसाची नोंद झाली. या पावसामुळे टोमॅटो, कांदा व भाजीपाला पिकाचे नुकसान होण्याची शक्यता आहे. निफाड तालुक्यातील पिंपळगाव बसवंत, लासलगाव, आहेरगाव, उगकाव, नैताळे, शिवरे, पिंपळस, कोठुरे, जळगाव, सुकेने, पावसाने एक ते दीड तास जोरदार कोसळला. त्यामुळे या भागातसुद्धा द्राक्ष व टोमॅटो पिकांचे मोठे नुकसान झाले आहे. 

जिल्ह्यात पावसामुळे अनेक ठिकाणी मोठे नुकसान झाले आहे. आवक ठिकाणी टोमॅटो, द्राक्ष व काही ठिकाणी भाजीपाला पिके गुडघाभर पाण्यात पिके गेली होती. त्यामुळे आगामी उत्पादनावर परिणाम तर होणारच आहे. मात्र, शेतकऱ्यांनी केलेला खर्च काही ठिकाणी वाया जाण्याची शक्यता आहे. 
 


इतर ताज्या घडामोडी
मराठवाड्यात पावसाचा जोर कमीऔरंगाबाद  : मराठवाड्यातील सर्वच जिल्ह्यांत...
बियाण्यांच्या अडीच हजारांवर तक्रारींची...बीड : उगवण न झाल्याने दुबार पेरणीचे संकट...
नांदेड जिल्ह्यासाठी खरीप पीकविमा योजना...नांदेड : जिल्ह्यात यंदासाठी (२०२०-२१) खरीप हंगाम...
सततच्या खंडित वीजपुरवठ्याने माळीनगर...माळीनगर, जि. सोलापूर : वारंवार खंडित...
अत्यावश्यक वेळीच रासायनिक तणनियंत्रक...हिंगोली : ‘‘शेतकऱ्यांनी तणनियंत्रणासाठी केवळ...
सांगली जिल्ह्यातील प्रकल्पांत गेल्या...सांगली : जिल्ह्यात मध्यम व लघू ८४ प्रकल्पांची...
कृषिपंपांना दिवसा वीजपुरवठ्यासाठी...रत्नागिरी  : अनिश्‍चित पावसाचा हंगाम लक्षात...
`म्हैसाळ’ची कामे १५ ऑगस्टपूर्वी पूर्ण...सोलापूर  : म्हैसाळ योजनेतून सांगोला,...
काथ्या उद्योगातून कोकणाच्या विकासाला...नाशिक  : जगात भारत नारळ उत्पादनात आघाडीवर...
बियाणे बदलून देण्याच्या आदेशाची...अकोला  ः या हंगामात लागवड केलेल्या सोयाबीन...
मराठा आरक्षणाबाबत उपसमितीची वरिष्ठ...मुंबई : मराठा आरक्षणाच्या न्यायालयीन प्रकरणांच्या...
शेती नियोजनातून साधावा आर्थिक प्रगतीचा...नागपूर  : शेतकऱ्यांनी पारंपरिक शेतीसोबतच...
भाजपची प्रदेश कार्यकारिणी जाहीरमुंबई : भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील...
राज्यात चांगल्या पावसाचा अंदाजभारतीय हवामान शास्त्र विभागाच्या कृषी मोसम...
पुणे जिल्हा परिषदेची मागासवर्गीय...पुणे  : पुणे जिल्ह्यातील मागासवर्गीय...
नगरमध्ये १८ हजार हेक्टरवर उडदाची पेरणीनगर  ः नगर जिल्ह्यात यंदाच्या खरीप हंगामात...
औरंगाबादमध्ये बटाटा १००० ते २००० रुपये...औरंगाबाद  : येथील कृषी उत्पन्न बाजार...
आरोग्यदायी हिंगआपल्या रोजच्या स्वयंपाकात पदार्थ करताना फोडणीसाठी...
अकोला जिल्ह्यात जूनमध्ये सरासरीपेक्षा...अकोला  ः यंदाच्या हंगामात मृग नक्षत्रात...
खानदेशात कांदा रोपवाटिकांची संख्या वाढलीजळगाव  ः खानदेशात यंदा रोपवाटिकांची संख्या...