नाशिक जिल्ह्यात पूरस्थिती कायम

नाशिक जिल्ह्यात पूरस्थिती कायम
नाशिक जिल्ह्यात पूरस्थिती कायम

नाशिक : जिल्ह्यात ३२ तासांमध्ये त्र्यंबकेश्वर आणि इगतपुरी तालुक्याने रविवार (ता.४) ढगफुटीसदृश पाऊस अनुभवला. त्र्यंबकेश्वरमध्ये ५१४, तर इगतपुरीत ४०९ मिलिमीटर पाऊस झाला आहे. धरणांतून मोठ्या प्रमाणात विसर्ग सुरू असल्याने गोदावरीसह उपनद्यांना महापूर आल्याने जिल्ह्यातील अनेक गावांचा संपर्क तुटला. त्यामुळे नाशिक जिल्ह्यातील पूरस्थिती कायम आहे.  

काही दिवसांपासून मुक्काम ठोकून असलेल्या पावसामुळे गेल्या दीड दिवसात मोठे संकट उभे केले आहे. जिल्ह्यातील अनेक नद्यां महापुरासारखी परिस्थिती अनुभवत आहेत. त्यामुळे जनजीवन विस्कळित झाले आहे. सायखेडा, चांदोरी शिंगवे परिसरात पुराचे पाणी स्थिर असून अद्यापही महापुराची स्थिती कायम आहे. 

जिल्ह्यात सुरू असलेल्या अतिवृष्टीमुळे जिल्हाधिकाऱ्यांनी जाहीर केल्यानुसार सोमवारी शहर, जिल्ह्यातील सर्व शाळा आणि महाविद्यालये बंद ठेवण्यात आली. प्रमुख रस्ते बंद असल्याने वाहतुकीवर परिमाण झाला. जिल्हाभरातील नद्या धोक्याची पातळी ओलांडून वाहत आहेत. त्र्यंबकेश्वरसह इगतपुरी तालुक्यातील विक्रमी पावसामुळे जिल्ह्यातील मुंबई-आग्रा हायवे, नाशिक-औरंगाबाद, नाशिक-कळवण या महामार्गांवरील वाहतुकीवर दिवसभर परिणाम झाला. 

वीजपुरवठा खंडित

सायखेडा, चांदोरी, मालेगावातील मोसम नदी येथे ग्रामीण पोलिसांनी रेस्क्यू ऑपरेशन हाती घेतले आहे. सुरक्षेच्या कारणास्तव ग्रामीण भागासह नाशिक शहरातील उपकेंद्रांतून निघणाऱ्या काही वाहिन्या बंद ठेवण्यात आल्याने शहरातील ३०, तर निफाड उपविभागातील नांदूर मध्यमेश्वर परिसरातील ७८ अश एकूण १०८ रोहित्रांवरील वीजपुरवठा खंडित झाला. गोदावरी, दारणा, कादवा या नद्यांना आलेल्या मोठ्या पुराचा फटका वीजपुरवठा सुरळीत करण्याच्या कामाला बसला. काही रोहित्रे पुराच्या पाण्यात बुडाली. त्यामुळे प्रशासनाचा सतर्कतेचा इशारा कायम ठेवला आहे.  

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com