नाशिक जिल्ह्यातील माती परीक्षणासाठी ‘इस्रो’शी करार होणार

नाशिक जिल्ह्यातील माती परीक्षणासाठी ‘इस्रो’शी करार
नाशिक जिल्ह्यातील माती परीक्षणासाठी ‘इस्रो’शी करार

नाशिक : नाशिक जिल्ह्यातील शेती, गावतळे, जलसंपदा, कृषी विमा योजना, वनहक्‍क पॉलिसी या विषयीच्या कारभारात पारदर्शकता आणण्यासाठी जिल्हाधिकारी आता इस्रोची मदत घेणार आहे. यासंबंधी जिल्हाधिकारी आणि इस्रो यांच्यात उद्या (शुक्रवारी, ता. १४) करार करण्यात येणार आहे. या कराराप्रसंगी इस्रोचे पाच नामांकित शास्त्रज्ञ उपस्थित राहणार असून, अशा पद्धतीचा हा देशातील पहिलाच करार असणार आहे. करारामुळे जिल्ह्यातील रस्ते, खड्डे, पिकांची उपलब्धता, जलसंपदा, जमिनीचे माती परीक्षण याची अचूक माहिती प्रशासनाला उपलब्ध होणार आहे. खासदार हेमंत गोडसे यांच्या पुढाकाराने इस्रो एका उपग्रहामार्फत काही महिन्यांपासून लोकसभा मतदारसंघाचे खास सर्वेक्षण करत आहे. इस्रोकडून जीआयएस अ‍ॅप्लिकेशन तयार करण्याचे काम सुरू करण्यात आलेले आहे. सर्वेक्षणाचे काम आता अंतिम टप्प्यात आले असून, या सर्वेक्षणामुळे मतदारसंघातील रस्ते, मोकळी जागा, पाणीपुरवठा योजना, नवीन वसाहती याविषयीची माहिती विज्ञानाच्या आधारावर मिळणार आहे. इस्रोचे सुरू असलेले कामकाज आणि शंभर टक्के पारदर्शकतेची हमी या बाबी जिल्हाधिकारी राधाकृष्ण बी. यांना भावल्याने त्यांनी जिल्ह्याच्या विकासकामी बी. इस्रोचे सहकार्य घेण्याचे ठरविले आहे. त्याचाच यांच्यात एक विशेष करार होणार आहे. वनजमिनीचीही माहिती वनविभाग आणि वनजमिनी कसणारे शेतकरी यांच्यातील संघर्ष पारदर्शकतेच्या आधारावर सहजपणे मिटविणे शक्य होणार आहे. आज वनविभागाची जमीन कसत असलेला शेतकरी २००५ पूर्वी हा शेतकरी ही जमीन कसत होता किंवा नाही, याची पारदर्शक माहिती मिळणार आहे. यातून अगदी सहजपणे वन प्रशासन-शेतकरी यांच्यातील संघर्ष मिटणार आहे. शेतीविषयक पॉलिसीतून शेतकर्ऱ्यांना नुकसानभरपाई मिळण्यासाठी सॅटेलाइट इमेजेसची खास मदत होणार आहे.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com