नाशिक जिल्ह्यात पाण्यासाठी गावे पाहतात टँकरची वाट

नाशिक जिल्ह्यात पाण्यासाठी गावे पाहतात टँकरची वाट
नाशिक जिल्ह्यात पाण्यासाठी गावे पाहतात टँकरची वाट

येवला, जि. नाशिक : यंदा दुष्काळाच्या माहेरघरांसह वरुणराजाची कृपा होणारे तालुकेही पिण्याच्या पाण्यासाठी आसुसलेले आहेत. गावांसह वाड्या-वस्त्यांवर तहान भागविण्यासाठी पाणी नसल्याने तब्बल ४५५ गावे व वाड्यांवर रोज ११३ टँकरच्या ३१६ फेऱ्या करून लाखो लिटर पाणी पुरवले जात आहे.

सिन्नर, येवला, मालेगाव, नांदगाव या दुष्काळाच्या माहेरघरात दिवाळीपूर्वीच टँकरची मागणी वाढली तर बागायदार समजले जाणारे तालुकेही आता पाणी देता का पाणी म्हणू लागल्याने येणाऱ्या दिवसांच्या दाहकतेची चिंता आता वाढली आहे.

सध्यस्थितीत सर्वाधिक सर्वाधिक टँकर सिन्नर येथे सुरू असून येवला, मालेगाव, बागलाण, नांदगाव, देवळा या तालुक्यात देखील संपणाऱ्या टंचाईच्या दिवसाबरोबर टँकरची संख्याही वाढत आहे. टंचाईग्रस्त गावात तर दिवस उजाडला की टँकरचे पाणी केव्हा मिळेल अन तहान व इतर गरज कधी पूर्ण होईल याची वाट बघण्याची वेळ नागरिकांवर आता आली आहे. उन्हाळ्यात तर अजूनच भयानक चित्र दिसणार आहे. 

काही ठिकाणी चार-दोन जलस्रोतांना पाणी असल्याने नागरिकांना आधार मिळत असून, जिल्ह्यात गावांसाठी २४ तर टँकर भरण्यासाठी २६ अशा पन्नास विहिरींचेही अधिग्रहण करण्यात आले आहे.जिल्ह्यासाठी ३४२ फेऱ्या मंजूर असताना ३१६ फेऱ्याच सध्या सुरू आहे. दिवसागणिक जिल्ह्यात टंचाईग्रस्त गावे आणि टँकरसाठीचे प्रस्ताव वाढू लागल्याने या पुढील काळात प्रशासनाला मोठी कसरत करावी लागणार आहे हे नक्की.

टँकरच्या रोजच्या पाणीपुरवठ्याची सद्यस्थिती
*बागलाण २२ गावे २ वाड्या,१७ टँकर,५८ फेऱ्या
*देवळा ६ गावे,१० वाड्या,६ टँकर,१३ फेऱ्या
*चांदवड २ गावे,१ वाडी,१ टँकर, ४ फेऱ्या
*मालेगाव २० गावे ६६ वाड्या,२३ टँकर,७४ फेऱ्या
*नांदगाव ७ गावे,७० वाड्या,१० टँकर, २४ फेऱ्या
*सिन्नर १५ गावे,१६६ वाड्या,३१ टँकर,७८ फेऱ्या
*येवला ४० गावे,२८ वाड्या,२५ टँकर,६५ फेऱ्या
*एकूण ११२ गावे,३४३ वाड्या,११३ टॅंकर,३१६ फेऱ्या

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com