Agriculture news in marathi In Nashik district, vegetable crops including kharif are in danger | Agrowon

नाशिक जिल्ह्यात खरिपासह भाजीपाला पिके धोक्यात

टीम अॅग्रोवन
मंगळवार, 22 सप्टेंबर 2020

नाशिक : जिल्ह्याच्या सर्वदूर भागात शनिवारी (ता.१९) नंतर पावसाने जोर धरला आहे. त्यामुळे जिल्ह्यातील  मका, बाजरी, सोयाबीन, टोमॅटो, कांद्यासह भाजीपाला पिकांचे मोठे नुकसान झाले आहे.

नाशिक : जिल्ह्याच्या सर्वदूर भागात शनिवारी (ता.१९) नंतर पावसाने जोर धरला आहे. त्यामुळे जिल्ह्यातील अनेक भागात खरीप हंगामातील मका, बाजरी, सोयाबीन, टोमॅटो, कांद्यासह भाजीपाला पिकांचे मोठे नुकसान झाले आहे. शेतांमध्ये पाणी साचून राहिल्याने पिके खराब झाली आहेत.     

शनिवारपासून पावसाने जोर धरल्यानंतर रविवारी (ता.२०) काही प्रमाणात ओढ दिली. झालेल्या अतिवृष्टीमुळे सर्वच भागात शेतांमध्ये पाणी साचून आहे. त्यामुळे काही ठिकाणी सोयाबीन पीक पाण्याखाली गेले आहे. बाजरी पिके आडवी झाल्याने कापणीच्या अडचणी वाढणार आहेत. तर, मका पिकांच्या कणसामध्ये दाणे भरण्याच्या अवस्थेत नुकसान हेत आहे. पिके चाऱ्यासह कुजण्याची शक्यता आहे. 

नाशिक, सिन्नर, मालेगाव, सटाणा, दिंडोरी, चांदवड या तालुक्यातील अनेक भागात नवीन भाजीपाला पिके टोमॅटो, शिमला मिरचीवर बुरशी, डाऊनी, करपा, फळ सडण्याचे प्रमाण वाढले आहे. सिन्नर तालुक्यात विदेशी भाजीपाला लागवडी खराब झाल्या आहेत. भाजीपाला पिकांचे मोठे नुकसान झाले आहे. मालेगाव तालुक्यातील काटवन परिसरात टोमॅटो लागवडी जमीनदोस्त झाल्या आहेत. तर, शेवग्याच्या लागवडी खराब होत आहेत. शेतकऱ्यांसमोर मोठे संकट उभे राहिले आहे.     

जिल्ह्यात खरीप हंगामातील पोळ कांदा लागवड मोठ्या प्रमाणावर झाल्या आहेत. 

कांदा लागवडी पाण्याखाली 

शेतकऱ्यांनी मोठ्या अडचणींचा सामना करत खरीप कांदा बियाण्याची उपलब्धता केली. रोपवाटिका तयार झाल्यानंतर रोपांचे नुकसान झाले. उत्पादन खर्च वाढता असताना होणारे नुकसान शेतकऱ्यांसाठी डोकेदुखी ठरत आहे. चांदवड, येवला, देवळा तालुक्यातील अनेक कांदा लागवडी पाण्याखाली आहेत. कळवण येथे झालेल्या अतिवृष्टीमुळे येथील शेतकरी अमोल मुर्तडक यांची विहिर कोसळली.


इतर ताज्या घडामोडी
नगर जिल्ह्यात दीड लाख हेक्टर पिकांची...नगर ः नगर जिल्ह्यात आॅक्टोबर महिन्याच्या...
पुणे विभागात सव्वापाच लाख हेक्टरचे...पुणे ः चालू वर्षी पावसाळ्याच्या जून ते ऑक्टोबर या...
वाशीममध्ये ‘पोकरा’च्या कामांना गती...वाशीम : जागतिक बँक अर्थसहाय्यीत नानाजी देशमुख...
कृषी कायद्यांवरून द्वेषपूर्ण राजकारण ः...अकोला ः पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ऐतिहासिक...
लाखांदूर तालुक्यात धान्य साठ्यासाठी सहा...भंडारा : जिल्ह्यातील लाखांदूर तालुक्यातील जिरोबा...
माथाडी कामगारांच्या वादात कोल्हापुरात...कोल्हापूर : येथील शाहू मार्केट यार्डातील गूळ...
जालना जिल्ह्यात १९० शेतकऱ्यांची बांबुला...जालना  : कृषी विज्ञान केंद्राच्या पुढाकाराने...
कापसाच्या पीक कापणीतून दोन गुंठ्यांत २...लोहगाव, जि. औरंगाबाद : लोहगाव महसूल मंडळाच्या...
रत्नागिरीत बारा हजार हेक्टरवरील भात,...रत्नागिरी ः जिल्ह्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे १०...
नांदेड जिल्ह्यात आर्द्रतेच्या नावाखाली...नांदेड : राज्यात परतीच्या पावसामुळे शेतकऱ्‍...
मदत लवकरच शेतकऱ्यांच्या खात्यांवर ः डॉ...परभणी : ‘‘नैसर्गिक संकटात राज्य सरकार...
देवळा तालुक्यात उन्हाळ कांद्याच्या...देवळा, जि. नाशिक : एका बाजूला कांदा खरेदी बंद...
पाच एकरातील सोयाबीनला लावली आगयवतमाळ : केवळ अतिवृष्टीग्रस्त (६५ मिलिमीटरवर)...
उद्या सर्व मंत्र्यांचे काळी फीत बांधून...मुंबई ः सीमाभागात दरवर्षी १ नोव्हेंबर हा कर्नाटक...
भोसे, मरवडे मंडलांतील १९६ द्राक्ष...मंगळवेढा, जि. सोलापूर ः गतवर्षीच्या...
सोलापूर जिल्ह्यात रोपवाटिका योजनेच्या...सोलापूर : जिल्ह्यातील भाजीपाला उत्पादनाला...
पंढरपूर बाजार समितीत वजनावर केळीची...सोलापूर : पंढरपूर कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये...
विदर्भ, मराठवाड्यात गुरुवारपासून आंदोलन...अकोला ः आॅक्टोबरमधील परतीच्या पावसाने संपूर्ण...
‘स्वाभिमानी’ची ऊस परिषद सोमवारी ऑनलाइनकोल्हापूर : संपूर्ण राज्याचे लक्ष लागलेल्या...
रब्बी हंगामातील पिकांचे व्यवस्थापनरब्बी पिकांच्या लागवडीसाठी योग्य जमिनीची निवड,...