दुधी अळिंबी लागवडीसाठी जागेची निवड, वाढीसाठी लागणारे माध्यम आणि वातावरण तसेच काडाचे निर्ज
अॅग्रो विशेष
नाशिक जिल्ह्यातील काही भागाला अवकाळी पावसाने झोडपले
नाशिक : नाशिक जिल्ह्यातील अनेक भागात सोमवारी (ता. १९) सायंकाळी झालेल्या अवकाळी पावसाने द्राक्षासह फळपिकांना झोडपले. निफाड, दिंडोरी, सिन्नर, चांदवड तालुक्यांतील पिकांना शेतकऱ्यांनी जीवापाड जपलेल्या द्राक्षबागा, कांदा, टोमॅटो आदी पिकांना या अवकाळी पावसामुळे फटका बसला आहे. रब्बी पिकांना या पावसाचा फायदा होणार असला तरी त्यांचे क्षेत्रफळ खूपच कमी आहे.
नाशिक : नाशिक जिल्ह्यातील अनेक भागात सोमवारी (ता. १९) सायंकाळी झालेल्या अवकाळी पावसाने द्राक्षासह फळपिकांना झोडपले. निफाड, दिंडोरी, सिन्नर, चांदवड तालुक्यांतील पिकांना शेतकऱ्यांनी जीवापाड जपलेल्या द्राक्षबागा, कांदा, टोमॅटो आदी पिकांना या अवकाळी पावसामुळे फटका बसला आहे. रब्बी पिकांना या पावसाचा फायदा होणार असला तरी त्यांचे क्षेत्रफळ खूपच कमी आहे.
पंधरा दिवसांत तालुक्यात बेमोसमी पावसाने दुसऱ्यांदा अचानक हजेरी लावल्याने शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे. दिवाळीच्या पूर्वसंध्येलाच पावसाने हजेरी लावली होती. सोमवारी सायंकाळी सहा वाजेच्या दरम्यान पावसाने हजेरी लावली. त्यामुळे द्राक्ष उत्पादकांचे धाबे दणाणले. पुढील दोन दिवस पावसाचा अंदाज असल्याने शेतकऱ्यांमध्ये चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे.
सोमवारी तालुक्यातील वरखेडा, तळेगाव, कोराटे, ढकांबे, खडक सुकेने, चिंचखेड, जोपुळ, पालखेड, निळवंडी, पाडे, लखमापूर, दहेगाव, ओझे, परमोरी, कादवा कारखाना, वणी, बोपेगाव आदी परिसरात पावसाने हजेरी लावली. अचानक आलेल्या पावसाने पोंगा व फुलोरा अवस्थेतील द्राक्ष बागांचे मोठे नुकसान झाले आहे.
निफाड तालुक्यातील शिवडी, शिवरें, कुंदेवाडी, रसलपूर या गावांसह गोदाकाठ भागातील म्हाळसाकोरे, चांदोरी, चितेगाव, पिंपळस, कसबेसुकेणे, करंजी, ओझर, पिंपळगाव परिसरातही वादळी पाऊस झाला. वादळवारा आणि विजांच्या कडकडाटात झालेल्या या बेमोसमी पावसाने नागरिकांची धावपळ उडाली. पाऊस सुरू होताच निफाड शहरातील वीजपुरवठा खंडित झाल्याने शहरात काळोख पसरला होता. सुमारे अर्धा तास निफाड शहरात पाऊस झाला. थोडावेळ थांबल्यानंतर पुन्हा अर्धा तास मुसळधार पाऊस झाला. या पावसामुळे द्राक्ष आणि कांदा पिकांवर विपरित परिणाम होणार आहे. फुलोरा अवस्थेतील द्राक्षमण्यांची गळ होण्याचा धोका वाढला आहे. पावसाचे पाणी द्राक्षघडांत साठून घडकुज वाढण्याची भीती आहे.
मनमाडमध्ये जोरदार सरी
सोमवारी सायंकाळी मनमाड शहरासह नांदगाव परिसरात पावसाने हजेरी लावल्यामुळे काही प्रमाणात दिलासा मिळाला. सोमवारी सायंकाळी मनमाड शहरात मुसळधार पावसाला सुरवात झाली. सायंकाळी साडे पाच वाजता अर्धा तास पाऊस झाला. या पावसाने जनजीवन विस्कळित केले. काही वेळ विश्रांती घेतल्यानंतर सात वाजेनंतर पुन्हा एकदा पावसाने हजेरी लावली. पावसामुळे शहरातील विद्युतपुरवठा खंडित झाला. मनमाड शहर व परिसरात पाऊस झाला मात्र शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या वागदर्डी परिसरात फारसा पाऊस झाला नाही.
- 1 of 654
- ››