नाशिक विभागात ‘जलयुक्त`ची कामे अपूर्णच

नाशिक विभागात ‘जलयुक्त`ची कामे अपूर्णच
नाशिक विभागात ‘जलयुक्त`ची कामे अपूर्णच

नाशिक : जलयुक्त शिवार अभियानाअंतर्गत २०१७-१८ या वर्षी निवडलेल्या गावांतील कामांची ढकलगाडी सहा महिन्यांनंतरही सुरूच आहे. शिल्लक कामे पूर्ण करण्यासाठी राज्य सरकारने डिसेंबर २०१८ पर्यंत मुदतवाढ दिली आहे.

नाशिक विभागात निवडलेल्या ८४५ पैकी ६६३ गावांतील कामे पूर्ण झाली असून, उर्वरित १८२ गावांतील कामे अपूर्णावस्थेत आहेत.

या योजनेतील कामे वेळेत पूर्ण करण्यात प्रशासनाला आजवर एकदाही यश मिळालेले नाही. सर्वांसाठी पाणी, टंचाईमुक्त महाराष्ट्र, जलयुक्त शिवार अभियान योजनेअंतर्गत अधिकाधिक पाणी अडवून भूजल पातळीत वाढ करण्याचे मुख्य उद्दिष्टे आहे. पहिल्या दोन वर्षांतील १ हजार ८४१ गावांमधील आराखड्यानुसारची कामे पूर्ण झाल्याने ही सर्व गावे जलपरिपूर्ण झाल्याचे शासनाने घोषित केले आहे. मात्र मुदत संपून सहा महिने उलटल्यावरही अद्याप १८२ गावांतील अपूर्ण आहेत. या वर्षीच्या ६६३ गावांतील १९ हजार ६३२ पैकी ९१ टक्के म्हणजेच १७ हजार ७७९ इतकीच कामे पूर्ण झाली. ९ टक्के कामे अद्यापही अपूर्ण आहेत.

या ६६३ गावांतील १७ हजार ७७९ कामांवर आतापर्यंत १६२ कोटी ६५ लाख रुपये इतका खर्चही झाला. या वर्षीच्या कामांसाठीचा निधी वापराविना पडून आहे.

वर्षनिहाय निवडलेली गावे

२०१५-१६     ९४१
२०१६-१७    ९००
२०१७-१८ ८४५
२०१८-१९   १,१२५

विभागातील ‘जलयुक्त`ची प्रगती (२०१७-१८)

जिल्हा  प्रस्तावित कामे पूर्ण कामे
नगर  ७,९४१   ७,१०१
नाशिक   ४,१८३   ३,९७१
जळगाव ४,०९३ ३,७६९
नंदुरबार १,८९५ १,६२५
धुळे   १,५२०  १,३१३
एकूण  १९,६३२ १७,७७९

‘जलयुक्त`च्या खर्चाचा लेखाजोखा

जिल्हा एकूण निधी खर्चित निधी (कोटी रु.)
जळगाव  ८९.७७   २३.४०
नाशिक ८८.५३   ३२.०८
नंदुरबार ६७.२१  २९.३२
धुळे  ४९.२८  २०.५२
नगर  २००.००   ५७.२२
एकूण  ४९४.७९ १६२

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com