नाशिकमध्ये दोडका १०८३ ते ३३३३ रुपये प्रतिक्विंटल

In Nashik, dodka is available 1083 to 3333 rupees per quintal
In Nashik, dodka is available 1083 to 3333 rupees per quintal

नाशिक : येथील कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये दोडक्याची आवक ६९ क्विंटल झाली. त्यांना किमान १०८३ ते कमाल ३३३३ रुपये दर मिळाला. सर्वसाधारण दर २५०० रुपये राहिला, अशी माहिती बाजार समितीच्या सूत्रांनी  दिली.  

बाजारात वांग्यांची २६४ क्विंटल आवक झाली. वांग्यांना प्रति क्विंटल ७०० ते २५०० असा दर होता. त्यास सर्वसाधारण दर १४२८ राहिला. फ्लॉवरची आवक ४८२ क्विंटल झाली. त्यास प्रतिक्विंटल ५७१ ते १००० दर होता. सर्वसाधारण दर ७१४ राहिला. कोबीची आवक ८४० क्विंटल, तर दर २५० ते ५०० असा होता. सर्वसाधारण दर ४१६ राहिले. ढोबळी मिरचीची आवक १४३ क्विंटल झाली. त्यास प्रतिक्विंटल १८१२ ते ३१२५ दर होता. सर्वसाधारण दर २५०० रुपये राहिला. गवारची आवक २० क्विंटल झाली. तिला ३५०० ते ६००० असा दर होता. सर्वसाधारण दर ५५०० रुपये राहिला. 

भेंडीची आवक ७२ क्विंटल झाली. तिला किमान १५०० ते कमाल २५०० रुपये दर होता. सर्वसाधारण दर २१६५ राहिला. हिरव्या मिरचीची आवक १३० क्विंटल झाली. तिला २००० ते २५०० दर होता. सर्वसाधारण दर २२०० रुपये राहिला. कांद्यांची आवक १५१५ क्विंटल झाली. त्यांना ७०० ते २१५० दर होता. सर्वसाधारण दर १५५० राहिला. बटाट्याची आवक १५३० क्विंटल झाली. त्यास ८०० ते १८०० दर होता. सर्वसाधारण दर १४५० राहिला. लसणाची आवक १८९ क्विंटल झाली. दर किमान ३५०० ते कमाल ९००० रुपये प्रतिक्विंटल होता. सर्वसाधारण दर ५५०० राहिला. 

फळांमध्ये डाळिंबांची आवक १५२ क्विंटल झाली. त्यांना किमान ९०० ते कमाल १०५०० दर होता. सर्वसाधारण दर ७२५० राहिला. मोसंबीची आवक १५० क्विंटल झाली. त्यांना १००० ते ३००० दर होता. सर्वसाधारण दर २००० होता. संत्र्यांची आवक १८० क्विंटल झाली. त्यांना २२०० ते २६०० सर्वसाधारण दर होता. सर्वसाधारण दर १८०० रुपये राहिला . 

वेलवर्गीय भाज्यांचे दर टिकून

भोपळ्याची आवक ६५४ क्विंटल झाली. त्यास किमान ४६६ ते कमाल २००० रुपये दर होता. सर्वसाधारण दर १६३० रुपये राहिला. कारल्याची आवक ८९ क्विंटल झाली. त्यांना १२५० ते २१९६ असा दर होता. सर्वसाधारण दर २०८३ राहिला. गिलक्यांची आवक ४५ क्विंटल होती. त्यास १२५० ते २०८३ दर होता. सर्वसाधारण दर १६६६ राहिला. डांगराची आवक ४२ क्विंटल झाली.  त्यास ८०० ते १५०० दर होता. सर्वसाधारण दर १३०० राहिला. काकडीची आवक ८०६ क्विंटल झाली. तिला ७५० ते १७५० असा दर होता. सर्वसाधारण दर १३५० रुपये राहिला.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com