Agriculture news in marathi, Nashik: Eastern tomatoes destroy by rains | Agrowon

नाशिक जिल्ह्यात पावसामुळे पूर्वहंगामी टोमॅटोला फटका

टीम अॅग्रोवन
बुधवार, 21 ऑगस्ट 2019

नाशिक : संततधार सुरू असलेल्या पावसामुळे पूर्वहंगामी टोमॅटोच्या लागवडीला फटका बसला. झाडांवरील पानांची संख्या कमी झाली आहे. अलीकडे जास्त पडणारे कडक ऊन व सकाळी मोठ्या प्रमाणात दव पडत असल्याने त्याचा फटका टोमॅटोच्या झाडांना बसला. परिणामी, उत्पादनात घट होण्याची शक्यता आहे. 

सुरवातीला पावसात टोमॅटोच्या झाडांची मोठ्या प्रमाणात फुलगळ झाली. सतत पडणाऱ्या पावसामुळे टोमॅटोच्या झाडांची पाने खराब झाली. त्यात सतत कोसळणाऱ्या पावसामुळे टोमॅटोवर वेळोवेळी फवारण्या करणे शेतकऱ्यांना शक्य झाले नाही. त्यात ढगाळ वातावरण असल्याने अन्नप्रक्रिया व वाढीच्या अवस्थेत अडचणी आल्या आहेत.

नाशिक : संततधार सुरू असलेल्या पावसामुळे पूर्वहंगामी टोमॅटोच्या लागवडीला फटका बसला. झाडांवरील पानांची संख्या कमी झाली आहे. अलीकडे जास्त पडणारे कडक ऊन व सकाळी मोठ्या प्रमाणात दव पडत असल्याने त्याचा फटका टोमॅटोच्या झाडांना बसला. परिणामी, उत्पादनात घट होण्याची शक्यता आहे. 

सुरवातीला पावसात टोमॅटोच्या झाडांची मोठ्या प्रमाणात फुलगळ झाली. सतत पडणाऱ्या पावसामुळे टोमॅटोच्या झाडांची पाने खराब झाली. त्यात सतत कोसळणाऱ्या पावसामुळे टोमॅटोवर वेळोवेळी फवारण्या करणे शेतकऱ्यांना शक्य झाले नाही. त्यात ढगाळ वातावरण असल्याने अन्नप्रक्रिया व वाढीच्या अवस्थेत अडचणी आल्या आहेत.

लागवडीच्या क्षेत्रामध्ये पाणी साचून राहिल्याने मुळांची कार्यक्षमता मंदावली असून, ‘करपा’ रोगाचा प्रादुर्भाव वाढला आहे. झाड पूर्णपणे करप्यामुळे अशक्त झाल्याने टोमॅटोच्या फुगवणयोग्य त्या प्रमाणात होण्याची शाश्वती कमी असल्याचे शेतकऱ्यांचे म्हणणे आहे. त्यामुळे उत्पादनात घट होण्याची शक्यता आहे. 

कडक ऊन असल्याने वाढलेला ‘करपा’चा प्रादुर्भाव व फळांच्या फुगवणीत अडचणी येत आहेत. प्रादुर्भाव ५० टक्के आहे. त्यात फळधारणा कमी असल्याने शेतकऱ्यांच्या उत्पादनासह उत्पन्नावर मोठा परिणाम होत आहे. त्यामुळे खूप मोठ्या प्रमाणात खर्च करून प्लॉट वाचवण्यासाठी टोमॅटो उत्पादक प्रयत्न करत आहेत. बाजारभाव चांगले आहेत. ते टिकून राहिले तर काहीतरी पदरात मिळेल, अशी अपेक्षा शेतकऱ्यांना आहे. येवला, निफाड तालुक्यातील ज्या गावांमध्ये पूर्वहंगामी लागवड आहे, त्या गावांमध्ये  ‘करपा’चा प्रादुर्भाव झाल्याने टोमॅटो उत्पादक अडचणीत सापडले आहेत. 


इतर ताज्या घडामोडी
जालना जिल्ह्यातील दोन मंडळांत जोरदार...औरंगाबाद : मराठवाड्यातील आठही जिल्ह्यात गुरुवारी...
नाशिक जिल्ह्यात धरणांच्या पाणलोट...नाशिक : जिल्ह्यात मोठे ७, तर मध्यम १७ असे एकूण २३...
परभणी, हिंगोली जिल्ह्यांत दहा लाख...परभणी  ः महाराष्ट्र राज्य सहकारी कापूस...
नाशिक जिल्ह्यात पावसाचे जोरदार पुनरागमननाशिक : जिल्ह्यात जुलैअखेर पावसाने उघडीप...
पिंपळनेरला कांदा मार्केट सुरू करापिंपळनेर, जि.धुळे  : पिंपळनेर (ता.साक्री)...
शासकीय मका खरेदी बंदमुळे शेतकऱ्यांना...भडगाव, जि. जळगाव  : शासकीय मका खरेदिला...
बार्शीतील ४३ हजार शेतकरी दुष्काळ...मळेगाव, जि. सोलापूर  ः दीड वर्षांपूर्वी भीषण...
पावसाळी वातावरणामध्ये येणाऱ्या...सध्या द्राक्ष लागवडीखालील सर्वच भागात बऱ्यापैकी...
धिंगरी अळिंबीचे उत्पादन तंत्रधिंगरी आळिंबी ही कमी खर्चात चांगला आर्थिक फायदा...
आणखी तीन सोयाबीन बियाणे कंपन्यांविरुद्ध...अकोला : या हंगामासाठी बाजारपेठेत आणलेले...
नगर जिल्ह्यातील पॉलिहाउसधारक बेदखलनगर ः जूनमध्ये आलेल्या निसर्ग चक्रीवादळाने नगर...
ऐन श्रावणातही नाशिकचा फुलबाजार...नाशिक : धार्मिक दृष्टीने महत्त्वाचा जिल्हा...
तुरीवरील शेंगा पोखरणाऱ्या अळीचे नियंत्रणमागील काही दिवसापासून सतत ढगाळ हवामान...
राज्यात टोमॅटो १०० ते ६०० रूपये क्रेटअकोल्यात ३५० ते ६०० रुपये क्रेट अकोला...
रत्नागिरी जिल्ह्यातील नद्यांना पूर,...रत्नागिरी : सलग दुसऱ्या दिवशीही पावसाने...
पंढरपुरात ७ ते १३ ऑगस्ट दरम्यान...सोलापूर  : कोरोना विषाणूची साखळी तोडण्यासाठी...
फळपीक विमा निकषात बदलाची गरज :...अमरावती : जिल्ह्यामध्ये संत्रा फळपीक मोठ्या...
सातारा जिल्ह्यात दमदार पाऊस सातारा : जिल्ह्यात मंगळवारी दमदार पाऊस झाल्याने...
कोयना धरण परिसरात मुसळधार पाऊस सातारा : कोयना धरण क्षेत्रात मंगळवारी मुसळधार...
कोल्हापूर बाजार समितीवर अखेर प्रशासक कोल्हापूर : नोकर भरती वरून वादग्रस्त ठरलेल्या...