agriculture news in marathi In Nashik, eggplant averages Rs. 8500 per quintal | Agrowon

नाशिकमध्ये वांगी सरासरी ८५०० रुपये क्विंटल

टीम अॅग्रोवन
गुरुवार, 29 ऑक्टोबर 2020

नाशिक : येथील कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये सध्या भाजीपाला आवक कमी झाली आहे. त्यात वांग्यांची आवक घटली आहे. ती अवघी ९३ क्विंटल झाली. त्यास प्रतिक्विंटल ७००० ते १००००, तर सरासरी दर ८५०० रुपये राहिला.

नाशिक : येथील कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये सध्या भाजीपाला आवक कमी झाली आहे. त्यात वांग्यांची आवक घटली आहे. ती अवघी ९३ क्विंटल झाली. त्यास प्रतिक्विंटल ७००० ते १००००, तर सरासरी दर ८५०० रुपये राहिला. वांग्यांना मागणी असल्याने व दरात तेजी  आहे, अशी माहिती बाजार समितीच्या सूत्रांनी दिली. 

बाजारात शेतीमालाची आवक सर्वसाधारण आहे. त्यामुळे सध्या दरात सुधारणा कायम आहे. फ्लॉवरची आवक १९४ क्विंटल झाली. त्यास प्रतिक्विंटल १४३० ते ३२१४, सरासरी दर २३२० राहिला. कोबीची आवक ५६७ क्विंटल झाली. तिला १८७५ ते ४१६५, तर सरासरी दर ३१२५ राहिले. ढोबळ्या मिरचीची आवक १०० क्विंटल झाली. त्यास प्रतिक्विंटल ६२५० ते ८७५०, तर सरासरी दर ७८१० रुपये राहिला.

भोपळ्याची आवक १२५५ क्विंटल, तर ६६५ ते १३३५, तर सरासरी दर १००० रुपये राहिला. कारल्याची आवक १२५५ क्विंटल झाली. त्यास ६६५ ते १००० असा दर मिळाला. चालू सप्ताहात आवक वाढल्याने दरात घसरण झाली. सर्वसाधारण दर १००० राहिला. 

दोडक्याची आवक १३६ क्विंटल झाली. त्यास ४१६५ ते ६२५०, तर सरासरी दर ५४१५ राहिला. गिलक्यांची आवक ८० क्विंटल झाली. त्यास ३३३५ ते ५००० दर मिळाला. सर्वसाधारण दर ४१६५ रुपये राहिला. भेंडीची आवक २७ क्विंटल झाली. त्यास २६६० ते ४७९० दर मिळाला. सर्वसाधारण दर ३५४० राहिला. काकडीची आवक १४८७ क्विंटल झाली. तिला ७५० ते १३६५, तर सरासरी दर १००० राहिला. 

कांद्याची आवक २९३ क्विंटल झाली. त्यास २५६० ते ५६०० रुपये दर मिळाला. त्यास सर्वसाधारण दर ४७५० राहिला. बटाट्याची आवक ७७५ क्विंटल झाली. तिला २५०० ते ३७००, तर सरासरी दर ३१०० राहिला. लसणाची आवक १७ क्विंटल झाली. तिला ६२५० ते १२००० असा दर मिळाला. सर्वसाधारण दर ८५०० राहिला. 

मोसंबी २४०० रुपये क्विंटल

फळांमध्ये डाळिंबांची आवक १३८७ क्विंटल झाली. त्यास ४००० ते १२००० दर होता. सर्वसाधारण दर ७५०० राहिला. मोसंबीची आवक २२० क्विंटल झाली. तिला १७०० ते ३४००, सरासरी दर २४०० राहिला. केळीची आवक १७० क्विंटल झाली. तिला ४०० ते १००० दर मिळाला. सर्वसाधारण दर ७५० राहिला. सीताफळांची  आवक २० क्विंटल झाली. त्यास १५०० ते २५०० दर मिळाला. सर्वसाधारण दर २००० राहिला. लिंबांची आवक ५० क्विंटल झाली. त्यास ८०० ते १५०० दर मिळाला. सर्वसाधारण दर १००० रुपये राहिला.


इतर बाजारभाव बातम्या
नाशिकमध्ये भेंडी २५०५ रुपये क्विंंटलनाशिक : येथील कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये...
खानदेशात केळीची खरेदी मंदावलीजळगाव : खानदेशात कांदेबाग केळीची काढणी पूर्ण...
अकलूज येथील जनावरांचा बाजार बंदअकलूज, जि. सोलापूर : ‘‘अकलूज कृषी उत्पन्न...
कोल्हापुरात गुळाच्या नियमित आवकेस...कोल्हापूर : येथील बाजार समितीत गेल्या पंधरा...
जळगावात हिरवी मिरची १८०० ते २६०० रुपयेजळगाव : कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये मंगळवारी (...
नगरमध्ये डाळिंबाच्या दरात सुधारणानगर ः नगर येथील दादा पाटील शेळके कृषी उत्पन्न...
कोल्हापुरात टोमॅटोला दहा किलोस १५० रुपयेकोल्हापूर : येथील बाजार समितीत या सप्ताहात...
कळमना बाजारात मोसंबी दरात सुधारणानागपूर : मागणीअभावी संत्रा दरात घसरण झाली आहे....
औरंगाबादमध्ये गाजर सरासरी १८०० रूपयेऔरंगाबाद : येथील कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये...
परभणीत वाटाणा ३००० ते ४५०० रुपये परभणी : येथील पाथरी रस्त्यावरील फळे भाजीपाला...
राज्यात पेरू ३०० ते ३५०० रुपयेजळगावात २५०० ते ३५०० रुपये दर जळगाव : ः...
नाशिकमध्ये वांग्यांना सरासरी ३००० रुपये...नाशिक : येथील कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये...
जळगावात भरताची वांगी १८०० ते २६०० रुपये जळगाव : कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये मंगळवारी (...
संत्राचे व्यवहार ११०० ते १४०० रुपये...नागपूर :  मागणीअभावी संत्रा दरातील तेजीची...
नाशिकमध्ये हिरव्या मिरचीच्या दरात...नाशिक : येथील कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये...
सोलापुरात हिरवी मिरची, गवार, घेवड्याला...सोलापूर ः सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या...
पुण्यात भाजीपाल्याची आवक, दर स्थिर पुणे  : गुलटेकडी येथील कृषी उत्पन्न बाजार...
औरंगाबाद : हिरवी मिरची सरासरी ३०००...औरंगाबाद  : येथील कृषी उत्पन्न बाजार...
परभणीत ढोबळी मिरचीची पंधरा क्विंटल आवकपरभणी : येथील पाथरी रस्त्यावरील फळे भाजीपाला...
राज्यात हिरवी मिरची २००० ते ५००० रुपये...पुण्यात २००० ते ३००० रुपये पुणे : पुणे बाजार...