नाशिकला महापूरसदृश स्थिती; प्रशासन सतर्क 

नाशिकला महापूरसदृश स्थिती; प्रशासन सतर्क
नाशिकला महापूरसदृश स्थिती; प्रशासन सतर्क

नाशिक : दोन दिवसांपासून सुरू असलेल्या संततधार पावसामुळे गंगापूर धरणात ९३ टक्के साठा झाला असून, मोठ्या प्रमाणात विसर्ग सुरू असल्याने गोदावरी नदीला पूर आला आहे. पुन्हा २००८ सारख्या महापुराची भीती निर्माण झाली आहे. त्यामुळे जिल्ह्यातील सर्व शाळांना सोमवारी (ता. ५) सुटी देण्यात आली आहे.

आदिवासी पट्ट्यातील तालुक्यात रविवारी (ता. ४) सकाळी ८ वाजेपर्यंत इगतपुरी तालुक्यात २२०, त्र्यंबकेश्वरमध्ये ३१५, पेठ मध्ये २००, सुरगाण्यात १८०, दिंडोरीत ६८, नाशिकमध्ये ८४ मिलिमीटर पावसाची नोंद झाली आहे. गंगापूर धरणातून ४२ हजार क्युसेक पाण्याचा विसर्ग सुरू होता. गंगापूर, काश्यपी, गौतमी या धरणांमधून मोठ्या प्रमाणात विसर्ग करण्यात येत असल्यामुळे गोदावरी नदीच्या पातळीत सातत्याने वाढ होत आहे. त्यामुळे नागरिकांना सतर्कतेच्या सूचना देण्यात आलेल्या आहेत. कोणतीही जीवितहानी होऊ नये, यासाठी प्रशासनाकडून खबरदारी घेण्यात येत आहे. त्यामुळे नाशिक पोलिस आयुक्तालय कार्यक्षेत्रात कलम १४४ लागू करण्यात आले आहे. पावसाचा जोर पाहता जिल्हाधिकाऱ्यांनी नाशिककरांना घराबाहेर न पडण्याचे आवाहन केले आहे.

कळवण व सुरगाणा तालुक्यात पडत असलेल्या मुसळधार पावसामुळे चनकापूर व पुणद धरणांतून प्रचंड पाण्याचा विसर्ग सोडण्यात आला असून, चनकापूर धरणातून २८,००० क्युसेक पाणाचा विसर्ग सोडल्यामुळे व पुणद धरणातून सोडलेल्या अतिरिक्त विसर्गामुळे गिरणा नदीला पूर आल्यामुळे गिरणा काठावरील गावांना सावधानतेचा इशारा देण्यात आला. भऊर, विठेवाडी, सावकी, लोहोणेर, ठेंगोडा, महालपाटणे निंबोळा परिसरात पोलिस बंदोबस्त व तहसील यंत्रणा तैनात करण्यात आली.

गोदावरीकाठच्या गावांना वेढा रविवारी मध्यरात्री दोन वाजेच्या दरम्यान चांदोरी व सायखेडा गावातील मुख्य रस्ता पाण्याखाली गेला आहे. गावातील लोकांचा संपर्क तुटला आहे. चांदोरी शिवारातील विठ्ठलवाडी येथे सात सदस्यांचे कुटुंब पाण्यात अडकले असताना चांदोरी आपत्ती व्यवस्थापन समितीचे कर्मचारी बोट व लाइफ जॅकेटसह दाखल होऊन युद्धपातळीवर काम करीत त्यांना सुरक्षित हलवण्यात यश आले.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com