agriculture news in marathi nashik fruit market to remain close | Agrowon

नाशिकमध्ये फळ बाजार अनिश्चित काळासाठी बंद

टीम अॅग्रोवन
बुधवार, 15 एप्रिल 2020

नाशिक बाजार समितीच्या पेठरोडवरील शरदचंद्र पवार मार्केट यार्डातील फळ विभाग मंगळवारपासून (ता.१४) बंद ठेवण्याचा निर्णय व्यापारी असोसिएशनेने घेतला आहे.

नाशिक : दिवसेंदिवस कोरोना बाधितांची संख्या वाढत चालली आहे. त्यात पुणे, मुंबई येथील बाजार बंद झाल्याने येथील व्यापाऱ्यांची गर्दी वाढत आहे. खबरदारी म्हणून नाशिक बाजार समितीच्या पेठरोडवरील शरदचंद्र पवार मार्केट यार्डातील फळ विभाग मंगळवारपासून (ता.१४) बंद ठेवण्याचा निर्णय व्यापारी असोसिएशनेने घेतला आहे.

नाशिक बाजार समितीच्या शरदचंद्र मार्केट यार्डातील फळ विभागात परराज्यातून फळे येत असतात, ही फळे नाशिक शहरासह जिल्ह्यात विक्री साठी जात असतात. यामुळे नाशिककरांना कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव होऊ नये यासाठी उपाययोजना करीत फ्रूट असोसिएशनच्या व्यापाऱ्यांची बैठक शुक्रवारी (ता.१०) झाली. या बैठकीस महेश गुप्ता, याकुब खान, राजेंद्र कोठावदे, सुधीर कुशवाहा, राऊफ बागवान, गोरख व्यापारी, बबलू गुप्ता, राजेश गुप्ता, नरेश गुप्ता यांसह व्यापारी उपस्थित होते.

यावेळी मंगळवारपासून (ता.१४) अनिश्चित काळासाठी बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला असून यामुळे नागरिकांना होणाऱ्या त्रासाबद्दल फ्रूट असोसिएशनने दिलगिरी व्यक्त केली आहे. मात्र गर्दी नियंत्रणात आल्यास सुरू करण्याबाबत पुनर्विचार केला जाईल, असेही यावेळी सांगण्यात आले आहे. याबाबत फ्रुट व्यापारी असोसिएशनने बाजार समितीचे सचिव अरुण काळे यांच्याकडे शनिवारी (ता.११) निवेदन सादर केले आहे. 

बाहेरून गर्दी होते आहे. पुणे, वाशी, कल्याण, मुंबई बाजार बंद असल्याने येथे गर्दी वाढली आहे. खरबूज व टरबूज खरेदीसाठी गर्दी अधिक असते. त्यामुळे टप्याटप्यात व्यवहार सुरू ठेवण्याचा विचार आहे. याबाबत लवकरच निर्णय घेण्यात येईल. 
- याकूब खान,अध्यक्ष, फ्रुट व्यापारी असोसिएशन


इतर ताज्या घडामोडी
सोलापूर जिल्ह्यात दमदार पाऊस सोलापूर : जिल्ह्यात गेल्या दोन दिवसांपासून...
नगर जिह्यात पावसाने पिकांचे अतोनात...नगर  : जिल्ह्याच्या बहुतांश भागात...
सोनी गावामध्ये आहेत २८८ शेततळीसोनी (ता. मिरज,जि.सांगली) या गावात  कृषी...
कर्नाळा बँकेत ३६ ग्रामपंचायतींचे पैसे...मुंबई : ‘शेकाप’चे माजी आमदार विवेक पाटील यांच्या...
मराठवाड्याच्या विकासासाठी शासन कटीबध्द...औरंगाबाद : मराठवाड्याच्या सर्वांगिण विकासासाठी...
केंद्राच्या कांदा निर्यातबंदी विरोधात...नाशिक : केंद्र सरकारने कुणाचीही ओरड नसताना, अन्न...
औरंगाबादमधील नुकसानग्रस्त पिकांचे...औरंगाबाद : ‘‘जिल्ह्यात अतिवृष्टीमुळे नुकसान...
खानदेशातील पपई पिकाला अतिपावसाचा फटकाजळगाव : खानदेशात पपई पिकाला अतिपावसाचा फटका बसला...
नांदेडमध्ये ३८ हजार हेक्टर पिकांचे...नांदेड : अतिवृष्टी व पूरामुळे जिल्ह्यातील ३८१...
‘म्हैसाळ’मधून पावणेदोन टीएमसी पाणी उचललेसांगली  ः कृष्णा नदीला आलेल्या पूराचे पाणी...
कांदा निर्यातबंदीविरूध्द कॉंग्रेसचे...रत्नागिरी : कांदा निर्यातीबाबतचा निर्णय...
मुसळधार पावसामुळे पिके भुईसपाटपुणे ः राज्यातील अनेक भागांत कमीअधिक स्वरूपात...
पानपिंपरी पिकाला विम्याचे कवच द्याअकोला ः जिल्ह्यात पानपिंपरी या वनौषधीवर्गीय...
सीमाभाग आणि बंदरातील कांदा सोडा; अन्यथा...नाशिक : टाळेबंदी शिथिल झाल्यानंतर शेजारील...
कोल्हापुरात ‘गोकूळ’चे दूध रोखण्याचा...कोल्हापूर : मराठा आरक्षणाला स्थगिती दिल्याच्या...
शरद पवार यांनी ऊसतोड कामगारांची कोंडी...नगर ः ऊसतोडणी कामगारांच्या तोडणी दरात वाढ करावी...
फळबाग लागवडीसाठी जमिनीची निवड महत्त्वाचीसामान्यपणे फळबागा अयशस्वी होण्यामध्ये किंवा...
बियाणासाठी घरचे सोयाबीन ठेवताना...बियाण्यासाठी निवड करण्यात आलेल्या प्लॉटमध्ये...
महिला बचत गटांच्या माध्यमातून हळद...सहकाराच्या धर्तीवर संघटित झालेल्या राजापूर...
पुणे जिल्ह्यात दोन लाखावर शेतकऱ्यांना...पुणे : जिल्हा बॅंकेकडून खरीप हंगामासाठी गेल्या...