नाशिकमध्ये गवार २५०० ते ४५०० रूपये प्रतिक्विंटल

नाशिकमध्ये गवार २५०० ते ४५०० रूपये प्रतिक्विंटल
नाशिकमध्ये गवार २५०० ते ४५०० रूपये प्रतिक्विंटल

नाशिक : येथील कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये गवारीची आवक ३० क्विंटल झाली. गवारीला प्रतिक्विंटल २५०० ते ४५०० असा दर होता. त्यास सरासरी दर ३००० मिळाला, अशी माहिती बाजार समितीच्या सूत्रांनी दिली. फळे व भाजीपाला या दोन्हींमध्ये आवक कमी जास्त होत असून, त्यानुसार बाजारभाव काढले जात आहेत.

बाजारात वांग्याची आवक २९७ क्विंटल झाली. वांग्याला प्रति क्विंटल २५०० ते ५००० असा दर होता. त्यास सरासरी दर ३७०० मिळाला. फ्लॉवरची आवक २१५ क्विंटल झाली. त्यास प्रतिक्विंटल ४२८ ते १३५७ दर होता. सरासरी दर ११४२ मिळाला. कोबीची आवक १३४१ क्विंटल झाली. तिला सरासरी ७९१ ते २१६६ असा दर होता. सर्वसाधारण दर १७५० मिळाला. ढोबळी मिरचीची आवक १८९ क्विंटल झाली. तिला १००० ते २५०० दर होता. सर्वसाधारण दर २००० मिळाला. पिकॅडोरची आवक २९ क्विंटल झाली. तिला १२५० ते १८७५ दर होता तर सर्वसाधारण दर १५०० मिळाला. 

भोपळ्याची आवक ६६५ क्विंटल होती. त्यास ४०० ते १००० असा दर होता. सर्वसाधारण दर ७३३ मिळाला. कारल्याची आवक ३०१ क्विंटल झाली. त्यास ६६५ ते १२५० असा दर होता. सर्वसाधारण दर ९५८ मिळाला. 

दोडक्याची आवक ८६ क्विंटल झाली. त्यास २१६६ ते २९१६ असा दर होता. त्यास सर्वसाधारण दर २५०० मिळाला. गिलक्याची आवक १७ क्विंटल झाली. त्यास १२५० ते २१०० दर मिळाला. सर्वसाधारण दर १८०० मिळाला. भेंडीची आवक ४८ क्विंटल झाली. त्यास १००० ते २५०० दर होता. सर्वसाधारण दर २२०० मिळाला. डांगराची आवक ३३ क्विंटल झाली. त्यास ५०० ते १५०० दर होता. सर्वसाधारण दर १३०० राहिला. काकडीची आवक ६० क्विंटल झाली. तिला ५०० ते ८५० असा दर होता. सर्वसाधारण दर ६७५ मिळाला. 

लिंबूची आवक २० क्विंटल झाली. त्यास १५०० ते ४००० असा दर होता. सर्वसाधारण दर ३५०० मिळाला. कांद्याची आवक १७९६ क्विंटल झाली. त्यास २२०० ते २७५० दर होता. सर्वसाधारण दर २४०० मिळाला. बटाट्याची आवक १३०५ क्विंटल झाली. त्यास ८०० ते १२५० दर होता. सर्वसाधारण दर ११०० मिळाला. लसणाची आवक ९१ क्विंटल झाली. सर्वसाधारण दर ५००० ते १७००० दरम्यान होता. सरासरी दर १३५०० मिळाला. 

फळांमध्ये पेरूची आवक १० क्विंटल झाली. त्यास १००० ते २५०० दर मिळाला. सर्वसाधारण दर २००० मिळाला. डाळिंबाची आवक १८४९ क्विंटल झाली. त्यास ५०० ते ९५०० दर होता. सर्वसाधारण दर ५७५० मिळाला. आवक थोडीफार घटल्याचे दिसून आले.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com