agriculture news in Marathi Nashik included in grapes cluster Maharashtra | Agrowon

‘द्राक्ष क्लस्टर’मध्ये नाशिकचा समावेश 

टीम अॅग्रोवन
शुक्रवार, 18 जून 2021

केंद्र सरकारने देशभरात विविध ५३ पिकांचे क्लस्टर उभारण्याचा निर्णय घेतला आहे. त्यापैकी पायलट प्रोजेक्ट म्हणून १२ पिकांची निवड करण्यात आली आहे. 

नाशिक : केंद्र सरकारने देशभरात विविध ५३ पिकांचे क्लस्टर उभारण्याचा निर्णय घेतला आहे. त्यापैकी पायलट प्रोजेक्ट म्हणून १२ पिकांची निवड करण्यात आली आहे. या अनुषंगाने नॅशनल हॉर्टिकल्चर बोर्डाच्या माध्यमातून ही योजना राबविली जाणार असून, नाशिक जिल्ह्यातील द्राक्ष पिकाचा समावेश केला आहे. त्यानुसार योजनेच्या अनुषंगाने सादरीकरण बुधवारी (ता. १६) पार पडले त्यामुळे जिल्ह्यात द्राक्ष क्लस्टर डेव्हलपमेंन्ट योजनेच्या अंमलबजावणीच्या हालचाली सुरू झाल्या आहेत. 

जिल्ह्यात मोठ्या प्रमाणावर द्राक्ष उत्पादन होत असून, उत्पादन ते विक्री अशा अनेक अडचणी आहेत. तर शासनाकडून मिळणाऱ्या सुविधांचा अभाव असल्याने द्राक्ष उत्पादकांमध्ये सतत चिंता असते. त्यामुळे ही योजना दिलासा देणारी आहे.

सादरीकरणावेळी खासदार हेमंत गोडसे, नाशिक विभागाचे कृषी सहसंचालक संजीव पडवळ, महाराष्ट्र राज्य द्राक्ष बागायतदार संघाचे माजी अध्यक्ष अशोक गायकवाड, अखिल भारतीय द्राक्ष निर्यातदार संघटनेचे अध्यक्ष जगन्नाथ खापरे, नॅशनल हॉर्टिकल्चर बोर्डाचे सदस्य माणिकराव पाटील, रामेतीचे प्राचार्य संजय पाटील, विभागीय अधीक्षक कृषी अधिकारी सुनील वानखेडे, नॅशनल हॉर्टिकल्चर बोर्डचे नाशिक उपसंचालक होशियार सिंग, आत्मा प्रकल्प संचालक राजेंद्र निकम, उपसंचालक हेमंत काळे आदींसह द्राक्ष उत्पादक आणि शेतकरी गटांचे पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. 

‘ग्रँट थोर्टन’ ही कंपनी प्रकल्पाचे तांत्रिक व्यवस्थापन करणार आहे. कंपनीचे व्यवस्थापक झानीयल यांनी ऑनलाइन द्राक्ष क्लस्टरचे सादरीकरण केले. या वेळी द्राक्षांचे पिकाचे महत्त्व व उत्पादनात येणाऱ्या अडचणींवर मात करण्यासाठी उपाययोजनांबाबत माहिती दिली. 

द्राक्ष उत्पादकांनी मांडल्या सूचना 

  • नावीन्यपूर्ण बाजारात मागणी असणाऱ्या वाणांच्या रोपांची निर्मिती करण्यात यावी. 
  • लागवडीपूर्वी पाणी आणि माती परीक्षण सुविधा असावी. 
  • मान्यताप्राप्त आणि अत्याधुनिक नर्सरी केंद्र उभारावेत. 
  • रोगप्रतिकारक वाणांची उपलब्धता करून द्यावी. 
  • क्लस्टरमध्ये नैसर्गिक आपत्तीत द्राक्ष बागांचे संरक्षण उपाययोजनांचा समावेश असावा. 
  • बागांच्या माहिती संकलनासाठी जी.पी.एस.द्वारे आढावा घ्यावा. 
  • जिल्हास्तरावर शीतकरण व्यवस्था व्यवस्था असावी. 
  • वाहतूक विषय महत्त्वाचा असून, वाहतुकीसाठी विशेष सुविधा निर्माण कराव्यात. 

प्रतिक्रिया
द्राक्ष क्लस्टरमुळे शेतकऱ्यांना एकत्रित येऊन आपल्या मालाचा दर्जा सुधारता येणार आहे. उत्पादन ते विक्री अशा समस्या सहज सोडविता येणार आहेत. क्लस्टर योजना एक आर्थिक स्रोत ठरणार असून, जिल्ह्यातील अधिकाधिक शेतकऱ्यांना द्राक्ष क्लस्टर योजनेचा लाभ घ्यावा. 
- हेमंत गोडसे, खासदार, नाशिक  


इतर अॅग्रो विशेष
कोकण, घाटमाथ्यावर जोरदार पावसाची शक्यतापुणे : गेल्या काही दिवसांपासून पावसाची उघडीप...
राज्यस्तरीय ‘आत्मा’ समितीत ३०...पुणे ः राज्याच्या कृषी तंत्रज्ञान व्यवस्थापन...
खासगी उद्योजकांच्या अवजारांवर अनुदानपुणे ः राज्यातील कृषी विद्यापीठे तसेच खासगी...
एक हजार नव्या रोपवाटिका होणारपुणे ः राज्यात नव्याने एक हजार रोपवाटिका...
भारतात उत्पादित ड्रॅगन फ्रूटची...नाशिक : गेल्या काही वर्षांत नवीन पीकपद्धती म्हणून...
रत्नागिरीत अतिवृष्टीमुळे हजार कोटींचे...रत्नागिरी : मागील आठवड्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे...
गजानन महाराज संस्थानचे विश्‍वस्त...शेगाव, जि. बुलडाणा ः विदर्भाच्या पंढरीतील श्री...
चाळीस एकरांत उत्कृष्ट कांदा शेतीचा आदर्शनाशिक जिल्ह्यातील अंतापूर (ता. सटाणा) येथील जाधव...
‘थ्री स्टार’ लिंबू वर्गीय रोपनिर्मिती लिंबूवर्गीय पिकांच्या रोपनिर्मितीला लागणारा २० ते...
सोयाबीनमधील सुधारित तंत्र पोचले...परभणी येथील वसंतराव नाईक मराठवाडा कृषी...
पशुचिकित्सा व्यवसायी आंदोलनाने पशुसेवा...नगर : पशुचिकित्सा व्यवसायी (डिप्लोमा, पदविकाधारक...
अमरावती जिल्ह्यात १८३ जणांना ...अमरावती ः २०१७-१८ मध्ये फवारणीदरम्यान विषबाधेत...
पीकविम्यातील सूचनांचा केंद्राकडून...पुणे ः पंतप्रधान पीकविमा योजनेत विमा कंपन्यांच्या...
पूरग्रस्तांच्या मदतीसाठी साडेअकरा हजार...मुंबई ः राज्यातील विविध जिल्ह्यांत अतिवृष्टीमुळे...
कोकणात काही ठिकाणी मुसळधार पुणे : कोकणात तुरळक ठिकाणी मध्यम स्वरूपाचा पाऊस...
निविष्ठा वितरणातील अडचणींत लक्ष घालणार...पुणे ः राज्यात निविष्ठा वितरणात अडचणी येत असल्यास...
मराठवाड्यात सव्वा लाख हेक्टरवरील...औरंगाबाद : मराठवाड्यातील सात जिल्ह्यांतील १००३...
साखरेचे किमान विक्री मूल्य तातडीने...कोल्हापूर : सध्या साखर उद्योग संकटात असून,...
सत्तावीस कीडनाशकांच्या बंदीविषयी अहवाल...पुणे ः केंद्रीय कृषी मंत्रालयाने मागील वर्षी...
राज्यात 'शेतमाल तारणा'तून २७ कोटी...पुणे ः कृषी पणन मंडळाद्वारे बाजार समित्यांद्वारा...