Agriculture news in marathi Nashik : The loss of grape growers at Rs 1600 crore | Agrowon

नाशिक : २० हजार एकरांवरील द्राक्ष वेलींवरच; १६०० कोटींवर नुकसान 

टीम अॅग्रोवन
शनिवार, 18 एप्रिल 2020

नाशिक : राज्यात द्राक्ष उत्पादनात आघाडीवर असलेल्या नाशिकमध्ये लॉकडाऊनचा सर्वात मोठा फटका द्राक्ष उत्पादकांना बसला आहे. संचारबंदी असल्याने प्रमुख बाजारपेठेत मालवाहतुकीची अडचण, व्यापाऱ्यांची नसलेली उपलब्धता व मंदावलेली निर्यात प्रक्रिया यामुळे दरात मोठी घसरण होऊन प्रतिकिलोमागे ४० रुपयांपर्यंत नुकसान सोसावे लागत आहे. यामुळे चालू वर्षी अंतिम टप्प्यात द्राक्ष उत्पादकांचे १६०० कोटींवर नुकसान झाले आहे. त्यामुळे उत्पादन खर्चही वसूल होणे मुश्किल झाले आहे. 

नाशिक : राज्यात द्राक्ष उत्पादनात आघाडीवर असलेल्या नाशिकमध्ये लॉकडाऊनचा सर्वात मोठा फटका द्राक्ष उत्पादकांना बसला आहे. संचारबंदी असल्याने प्रमुख बाजारपेठेत मालवाहतुकीची अडचण, व्यापाऱ्यांची नसलेली उपलब्धता व मंदावलेली निर्यात प्रक्रिया यामुळे दरात मोठी घसरण होऊन प्रतिकिलोमागे ४० रुपयांपर्यंत नुकसान सोसावे लागत आहे. यामुळे चालू वर्षी अंतिम टप्प्यात द्राक्ष उत्पादकांचे १६०० कोटींवर नुकसान झाले आहे. त्यामुळे उत्पादन खर्चही वसूल होणे मुश्किल झाले आहे. 

जिल्ह्यात ५८,३६७ हेक्टर क्षेत्रावर लागवडी आहेत. हंगामाच्या अंतिम टप्प्यात ४० टक्के बागा शिल्लक होत्या. व्यापाऱ्यांशी सौदे शेतकऱ्यांनी केले. मात्र, लॉकडाऊनची घोषणा होताच व्यवहार एकदम ठप्प झाले. त्यात बाहेरील राज्यातील व्यापारी परत गेले. काढणीसाठी उपलब्ध असलेले आदिवासी भागातील मजुरांनीही परतीचा रस्ता धरल्याने एकीकडे व्यवहार व काढणीची कामे अडचणीत सापडली. संचारबंदी असल्याने स्थानिक फळविक्रेत्यांनी खरेदी कमी केली. त्यामुळे हा माल खपवायचा कसा हा प्रश्न शेतकऱ्यांसमोर आहे. 

लॉकडाऊनच्या घोषणा होण्याच्या दरम्यान ४० हजार एकरांवरील ४ लाख टन द्राक्षे काढणीविना राहिली. यावेळी उठाव नसल्याने थेट विक्री, व्यापारी, बेदाणा निर्मिती अशा पर्यायी व्यवस्थेतून ५० टक्के माल खपला असला तरी अजूनही २ लाख मेट्रिक टन माल पडून आहे. 

अजूनही २० हजार एकरांवरील साधारणपणे दोन लाख मेट्रिक टन माल वेलींवरच आहे. सध्या अनेक व्यापारी द्राक्ष उत्पादकांची अडवणूक करून पडीच्या दरात खरेदी करीत आहेत. ज्यामध्ये सर्वसाधारण १० रुपयांप्रमाणे खरेदी होत असल्याचे चित्र आहे. त्यामुळे किलोमागे ४० रुपयांपर्यंत शेतकऱ्यांचे नुकसान होत असल्याने जिल्ह्यातील द्राक्ष उत्पादकांच्या नुकसानीचा आकडा १६०० कोटींवर गेला आहे. 

जिल्ह्यातील नुकसानीची स्थिती पुढीलप्रमाणे 
लॉकडाऊन दरम्यान काढणीविना शिल्लक माल ४ लाख टन 
झालेली काढणी १०,००० हेक्टर 
अपेक्षित दर ५० रुपये प्रतिकिलो
सध्याचा सर्वसाधारण दर १० रुपये किलो 
दरातील तफावत ४० रुपये प्रतिकिलो

चालू वर्षी चार एकर बागेसाठी १० लाख रुपये खर्च केला. अवकाळी पावसाच्या फटक्यातून बागा वाचवून निर्यातक्षम मालही तयार आहे. मात्र, व्यापारी नाही, निर्यात थांबली. त्यात जे व्यापारी आहेत ते १० रुपयांपर्यंत माल मागतात. आता उत्पादन खर्चही निघणार नसल्याने पुन्हा कसे उभे राहायचे हा प्रश्न उभा राहिला आहे. 
-पुंडलिक दामू कांडेकर, द्राक्ष उत्पादक, लाखलगाव, जि. नाशिक 

जिल्ह्यात अजूनही २० हजार एकरांवरील बागा काढणीविना आहेत. त्यात उठाव नाही तर दुसरीकडे अपेक्षित दर नसल्याने द्राक्ष उत्पादकांचे अर्थकारण कोलमडले आहे. व्यापारी, मजूर अशा अडचणीत माल काढणीविना असल्याने पुढील हंगामाची कामेही अडचणीत सापडली. त्यामुळे द्राक्ष उत्पादक चहुबाजूंनी अडचणीत आहे. 
- कैलास भोसले, कोषाध्यक्ष, राज्य द्राक्ष बागायतदार संघ, पुणे 
 


इतर अॅग्रो विशेष
मराठवाड्यात मुसळधारेचा अंदाजपुणे ः विदर्भ आणि तेलंगणा दरम्यान चक्राकार...
बचत गटांच्या उत्पादनांची माहिती एका...मुंबई: महिलांच्या आर्थिक सक्षमीकरणासाठी कार्यरत...
पंजाब, हरियानात कृषी विधेयके...नवी दिल्लीः लोकसभेत मंजूर झालेल्या कृषी...
यांत्रिकीकरण अभियानाच्या अर्ज...पुणे:  राज्यात चालू वर्षीही कृषी...
मराठवाड्यात पावसाचा जोर कायमऔरंगाबाद : मराठवाड्यात शनिवारी (ता. १९)...
राज्यात ठिकठिकाणी जोरदार सरीपुणे ः राज्यात तुरळक ठिकाणी होत असलेल्या पावसाचा...
शेतीसंबंधी विधेयकाविरोधात देशव्यापी...नगर ः केंद्र सरकारने काढलेल्या व आता कायद्यात...
कृषी खात्यात आजपर्यंत कोरोनाची १८१...अकोला ः राज्यात वाढत चाललेल्या कोरोनाचा फटका कृषी...
साखर निर्यात योजनेस डिसेंबर अखेरपर्यंत...कोल्हापूर: गेल्या वर्षभरात साखर निर्यातीचे नवे...
मराठवाड्यात पूर, पावसाचे थैमाननांदेड-औरंगाबाद : परभणी व हिंगोली जिल्ह्यांत...
बंदर, सीमेवरील कांदा निर्यातीचा मार्ग...नाशिक: निर्यातबंदीमुळे मुंबईतील जेएनपीटी बंदरावर...
नाचणी, भाजीपाला लागवडीतून महिला गट झाला...गावातील ७५ टक्के जमीन कातळाची, उरलेला भाग डोंगराळ...
पीककर्ज वाटपात राज्यात कोल्हापूर प्रथम...कोल्हापूर : जिल्ह्याकरिता पीक कर्जाचे वार्षिक...
कृषी विधेयकांना वाढता विरोधनवी दिल्लीः देशभरात ठिकठिकाणी विशेषतः पंजाब आणि...
तंबी देताच फळपिकांची विमा भरपाई झाली...पुणे: फळपिक विमा योजनेतील अडवून ठेवलेली नुकसान...
कांदा उत्पादकांची सावध चाल नाशिक: केंद्राच्या वाणिज्य मंत्रालयाने कांदा...
मराठवाड्यात पावसाचे धुमशान पुणे ः मराठवाड्यात पावसाचे धुमशान सुरूच आहे....
ग्रामपंचायतींच्या निवडणुकांसाठी निवडणूक...मुंबई: कोरोनामुळे स्थगित करण्यात आलेल्या आणि...
हलक्या पावसाची शक्यता पुणे ः बंगाल उपसागराच्या ईशान्य परिसरात उद्या (ता...
शेतकऱ्यांना उभारी देणारी संत ज्ञानेश्‍...किनखेडा (ता.रिसोड,जि.वाशीम) येथील प्रगतशील शेतकरी...