Agriculture news in marathi, Of Nashik Market Committee Complaint to the ED | Agrowon

नाशिक बाजार समितीच्या कारभाराची ईडीकडे तक्रार

टीम अॅग्रोवन
शुक्रवार, 14 जानेवारी 2022

नाशिक : नाशिक बाजार समितीवर राष्ट्रवादीचे माजी खासदार देविदास पिंगळे यांचे गेल्या अनेक वर्षांपासून वर्चस्व राहिले आहे. या बाजार समितीत मागील २० वर्षांपासून करोडो रुपयांचा भ्रष्टाचार, अफरातफरी, गैरव्यवहार झाला आहे, असा आरोप करत भाजपचे ज्येष्ठ नगरसेवक दिनकर पाटील आणि नाशिक शहर सरचिटणीस सुनील केदार यांनी ईडीकडे तक्रार केली आहे. 

नाशिक : नाशिक बाजार समितीवर राष्ट्रवादीचे माजी खासदार देविदास पिंगळे यांचे गेल्या अनेक वर्षांपासून वर्चस्व राहिले आहे. या बाजार समितीत मागील २० वर्षांपासून करोडो रुपयांचा भ्रष्टाचार, अफरातफरी, गैरव्यवहार झाला आहे, असा आरोप करत भाजपचे ज्येष्ठ नगरसेवक दिनकर पाटील आणि नाशिक शहर सरचिटणीस सुनील केदार यांनी ईडीकडे तक्रार केली आहे. 

पाटील व केदार यांनी ईडीला दिलेल्या पत्रासोबत २०१३-२०१४ चा महाराष्ट्र शासनाचा सरकारी लेखा परिक्षण अहवाल दिला आहे. त्यात ५०० कोटी रुपयांचा भ्रष्टाचार, अफरातफरी, घोटाळा झाला आहे. एका वर्षात ५०० कोटी रुपयांचा भ्रष्टाचार आहे, तर २० वर्षात हा आकडा निश्चितच हजारो कोटींच्या घरात जाईल. ही बाब गांभीर्याने विचारात घेत दोषी असतील, त्यांच्यावर 
कारवाई करावी. शासनाचे, शेतकऱ्यांचे नुकसान झाले आहे, त्यांची वसुली 
व्हावी, अशी मागणी त्यांनी ईडीकडे केली आहे.

यापूर्वी बाजार समितीतील घोटाळ्याची तक्रार करण्यात आली. मात्र सरकारकडून त्यास स्थगिती देण्यात आली होती. त्यामुळे शेवटचा पर्याय म्हणून ईडीकडे तक्रार दाखल केली आहे. आता या संबंधी चौकशी करून वसुली होईल, असे वाटत आहे.
- दिनकर पाटील, भाजप नगरसेवक, नाशिक.

नुकत्याच झालेल्या सेंट्रल गोदावरी कृषक सेवा सहकारी संस्था निवडणुकीत दिनकर पाटील यांच्या पॅनेलचा दारुण पराभव झाला. त्यामुळे ते वैफल्यग्रस्त झाले आहेत. ही तक्रार सुडापोटी केली आहे. दोनच दिवसांपूर्वी पाटील यांनी माझ्यासह सभापती व अन्य संचालकांना शिवीगाळ केली. या प्रकरणी गंगापूर पोलिस ठाण्यात तक्रारही देण्यात आली होती. संचालक मंडळाने शिस्तभंगाची कारवाई करीत त्यांच्या संचालकपद रद्द करण्याबाबत ठराव केला आहे. त्यामुळेच ते बिनबुडाचे आरोप करीत आहेत. 
- देविदास पिंगळे, सभापती, नाशिक बाजार समिती.


इतर बातम्या
उन्हाचा चटका वाढला, गारठा ओसरला पुणे : राज्यात उन्हाचा चटका वाढू लागला असल्याने...
साखर कारखान्यांच्या माल तारण  कर्जावरील...कोल्हापूर : साखर कारखान्यांच्या माल तारण...
खते मुबलक; पण किंमत जादा पुणे : राज्यात रब्बी हंगामात रासायनिक खतांची...
ज्येष्ठ विचारवंत डॉ. एन. डी. पाटील...कोल्हापूर ः ज्येष्ठ पुरोगामी विचारवंत, माजी...
खानदेशात कांदा पिकाची दहा हजार हेक्टरवर...जळगाव ः खानदेशात कांदा पिकाची लागवड सुरूच आहे....
कांदाच बनला टुमदार बंगल्याची ओळख नाशिक ः  या नभाने या भुईला दान...
ईश्‍वेद समूहाच्या टिश्‍युकल्चर ...अकोला : सिंदखेडराजा येथील ईश्‍वेद बायोटेक टिश्‍...
कापूस आयात शुल्क  रद्दच्या विषयावरील...जळगाव ः कापसावरील आयात शुल्क रद्द करण्यासह वायदा...
नाशिकच्या स्टार्टअपचा राष्ट्रीय पातळीवर...नाशिक : केंद्रीय वाणिज्य आणि उद्योगमंत्री पीयूष...
तूर विक्रीसाठी शेतकऱ्यांची  खुल्या...अमरावती : सोयाबीन व कापसानंतर खरीप हंगामातील...
‘गिरणा’चे वस्त्रहरण करणाऱ्यांवर कारवाई...चाळीसगाव, जि. जळगाव ः जळगाव जिल्ह्याची जीवनवाहिनी...
चांदवडमध्ये कांदा लिलाव सुरूनाशिक : अकरा जानेवारीपासून सोमवार (ता. १७) पर्यंत...
पुणे विभागात रब्बीतील कांदा लागवडीत वाढपुणे : आगामी काळात कांद्याला चांगले दर...
‘अशोक’च्या निवडणुकीत ‘लोकसेवा’ची सत्ता...नगर ः श्रीरामपूर तालुक्यातील अशोक सहकारी साखर...
ग्रामपंचायतींना इंटरनेट सेवा त्वरित...सोलापूर : जिल्ह्यातील प्रत्येक ग्रामपंचायतींना...
नगरमध्ये सहाशे शेतकऱ्यांना मिळणार... नगर ः शेतकऱ्यांना शेळीपालन, कुक्कुटपालन...
नांदेड जिल्ह्यात रब्बीत विक्रमी पेरणीनांदेड : पावसाळ्यात झालेल्या विक्रमी पावसामुळे...
शेतीमाल तारण योजनेत सात बाजार समित्याऔरंगाबाद : पणन मंडळाच्या औरंगाबाद विभागातील...
‘स्वाभिमानी’चे पीकविम्यासाठीचे ठिय्या...बुलडाणा : पीकविम्याच्या मुद्यावर चिखलीमध्ये...
उस्मानाबाद जिल्हा बँकेच्या संचालक...उस्मानाबाद : उस्मानाबाद जिल्हा बँकेच्या संचालक...