नाशिक बाजार समिती संचालकांकडून वसुली होणार

नाशिक कृषी उत्पन्न बाजार समितीच्या बाजार निधीचा दुरुपयोग झाल्याचे चौकशीअंती सिद्ध झाल्यामुळे बाजार समितीचे सभापती देविदास पिंगळे, सचिव अरुण काळे यांच्यासह १० सदस्यांना जबाबदार धरून त्यांच्याविरुद्ध १ कोटी १६ लाख ५७ हजार रुपयांची जबाबदारी निश्चित केली आहे.
Nashik Market Committee will recover from the Director
Nashik Market Committee will recover from the Director

नाशिक : नाशिक कृषी उत्पन्न बाजार समितीच्या बाजार निधीचा दुरुपयोग झाल्याचे चौकशीअंती सिद्ध झाल्यामुळे बाजार समितीचे सभापती देविदास पिंगळे, सचिव अरुण काळे यांच्यासह १० सदस्यांना जबाबदार धरून त्यांच्याविरुद्ध १ कोटी १६ लाख ५७ हजार रुपयांची जबाबदारी निश्चित केली आहे. त्यानुसार ही रक्कम वसूल करण्यासाठी जिल्हा उपनिबंधक सतीश खरे यांनी सोमवारी (ता. ५) आदेश काढले आहेत. 

बाजार समितीच्या टोमॅटो बाजारात तात्पुरते गाळेधारकांकडून बाजार समितीने भाडेआकारणी केली नाही. जे तात्पुरते ११० गाळे उभारले त्या गाळेधारकांकडून वार्षिक ३५ हजार रुपयेप्रमाणे भाडेआकारणी केली; परंतु वसूल केलेल्या भाडेबदल्यात एकाही व्यापाऱ्याला बाजार समितीची पावती देण्यात आली नाही. ही रक्कम बाजार समितीकडे जमा न झाल्यामुळे बाजार समितीचे खूप मोठे आर्थिक नुकसान झाले. यासह कोरोना काळात कुठलीही प्रक्रिया न राबवता अन्न पाकिटे वितरित करण्यात आली, असे आरोप झाले होते. 

बाजार समितीच्या झालेल्या निधीच्या नुकसानीबाबत बाजार समितीच्या चौकशीसाठी प्राधिकृत चौकशी अधिकारी म्हणून सुरगाणा सहायक निबंधक सहकारी संस्था माधव शिंदे यांची नेमणूक केलेली होती. चौकशी अधिकाऱ्यांनी महाराष्ट्र कृषी उत्पन्न खरेदी विक्री (विकास व विनियमन) अधिनियम १९६३ चे कलम ५३ अन्वये चौकशी अहवाल जिल्हा उपनिबंधक कार्यालयास सादर केला. या चौकशीत तथ्य आढळून आल्याने जिल्हा उपनिबंधकांनी दिलेल्या अहवालातून स्पष्ट केले आहे. 

वसुलीसाठी अधिकाऱ्यांची नियुक्ती  बाजार समितीचे सभापती, संचालक व सचिव यांच्याकडून वसली करण्याच्या कार्यवाहीसाठी नाशिक तालुका सहायक निबंधक सहकारी संस्था फय्याझ मुलानी यांची नियुक्ती केली आहे. समन्वय अधिकारी म्हणून त्यांनी काम पाहावे, असे आदेशात म्हटले आहे. संबंधितांच्या मालमत्तेतून जबाबदारीच्या रकमा जमीन महसुलाची थकबाकी म्हणून वसूल करण्याच्या रीतीने करावी, असे त्यात नमूद केले आहे. 

संचालकांवर आर्थिक नुकसानीची निश्‍चित केलेली जबाबदार 
संचालक रक्कम 
देविदास आनंदराव पिंगळे ९ लाख ८७ हजार ४२८
संपतराव महादू सकाळे १० लाख ०१ हजार ६६६
युवराज बाबूराव कोठुळे ९ लाख ८७ हजार ४२८ 
दिलीपराव शंकरराव थेटे ९ लाख ८७ हजार ४२८ 
विश्‍वास चिंतामण नागरे ९ लाख ८७ हजार ४२८
तुकाराम त्रंबक पेखळे १५लाख ६७ हजार ४२८ 
ताराबाई शंकर माळेकर ९ लाख ८७ हजार ४२८ 
सौ. विमलबाई भगवान जुंद्रे ५ लाख ८० हजार
शंकरराव झुंबरराव धनवटे ५ लाख ८० हजार
संदीप शिवाजी पाटील ५ लाख ८० हजार 
रवींद्र तुकाराम भोये ४ लाख २१ हजार ६६६
अरुण जयराम काळे १९ लाख ८९ हजार ९५ 

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com