नाशिकमध्ये कांदा प्रतिक्विंटल ७०० ते १६०० रुपये

नाशिकमध्ये कांदा प्रतिक्विंटल ७०० ते १६०० रुपये
नाशिकमध्ये कांदा प्रतिक्विंटल ७०० ते १६०० रुपये

नाशिक : नाशिक कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये चालू सप्ताहात पूरस्थिती व मुसळधार कोसळणाऱ्या पावसामुळे सर्वच शेतमालाची आवक मंदावली होती. उन्हाळ कांद्याची आवक १३१७१ क्विंटल झाली. बाजारभाव ७०० ते १६०० प्रतिक्विंटल होते. परपेठेत मागणी कमी असल्याने बाजारभाव कमी होते, अशी माहिती नाशिक कृषी उत्पन्न बाजार समितीच्या सूत्रांकडून देण्यात आली.

इतर शहरांत व राज्यात जाणारा भाजीपाला या आठवड्यात सुरवातीला कमी प्रमाणात पाठविण्यात आला. त्यामुळे काही फळभाज्यांची आवक कमी; तर काहींची आवक जास्त झाल्याने बाजारभावसुद्धा कमी जास्त निघाले. वालपापडी घेवड्याची आवक २२८६ क्विंटल झाली. वालपापडीला प्रतिक्विंटल ४५०० ते ५५०० दर मिळाला; तर घेवड्याला ५७०० ते ७००० प्रतिक्विंटल दर मिळाला. वाटाण्याची आवक १५५ क्विंटल झाली. त्यास २५०० ते ३००० प्रतिक्विंटल दर मिळाला. 

बटाट्याची आवक ८९८० क्विंटल झाली. बाजारभाव ५०० ते १२००  प्रतिक्विंटल होते. हिरव्या मिरचीची आवक २७५३ क्विंटल झाली. लवंगी मिरचीला ३५०० ते ५००० तर ज्वाला मिरचीला २००० ते ३००० असा प्रतिक्विंटल दर मिळाला. टोमॅटोला २०० ते ६००, वांगी ३०० ते ७५०, फ्लॉवर ६० ते २६० असे प्रति १४ किलोस दर मिळाले. तर कोबी ११० ते १९० असा प्रति २० किलोस दर ढोबळी मिरची ११० ते २५० प्रति ९ किलोस दर मिळाला. भोपळा १३५ ते ४५०, कारले १५० ते ४५०, गिलके १५० ते ३००, भेंडी २४० ते ६०० असे प्रति १२ किलोस दर मिळाले; तर काकडीला ३७५ ते १०००, लिंबू  १२० ते ५००, दोडका २४० ते ६०० असे प्रति २० किलोस दर मिळाले. पालेभाज्यांमध्ये कोथिंबीर ३०० ते ५५००, मेथी ३४० ते ३५००, शेपू ५०० ते २१५०, कांदापात १५०० ते ५०००, पालक १२० ते २२०, पुदिना ९० ते १८० असे दर प्रति १०० जुड्यांना मिळाले.

फळांमध्ये चालू सप्ताहात डाळिंबाची आवक ८५३५ क्विंटल झाली. परपेठेत मागणी सर्वसाधारण असल्याने बाजारभाव स्थिर होते. आरक्ता वाणास प्रतिक्विंटल ४०० ते ४५०० व मृदुला वाणास ५००० ते १०००० प्रतिक्विंटल दर मिळाला. मोसंबीची आवक १८० क्विंटल झाली. बाजारभाव ३००० ते ४५०० प्रतिक्विंटल मिळाला. केळीची आवक ४२५ क्विंटल झाली. बाजारभाव ५०० ते ११०० प्रतिक्विंटल मिळाला.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com