नवी दिल्ली ः दिल्लीच्या सीमांवर कृषी कायद्यांविरोधात मागील ५६ दिवसांपासून आंदोलन करणाऱ्या
बातम्या
द्राक्षपंढरीत गोड्या छाटण्यांना सुरवात
नाशिक : चालू वर्षीच्या द्राक्ष हंगामाला सुरवात झाली असून शेतकऱ्यांनी गोड्या छाटण्यांचे काम सुरू केले आहे. मात्र, चालू वर्षी सप्टेंबरमध्ये होणारी गोडी अर्ली, गोडी छाटणी पावसामुळे लांबणीवर पडत आहे. त्यामुळे हंगामाचे नियोजन करणाऱ्या शेतकऱ्यांना अडथळ्यांची शर्यत पार करावी लागत आहे.
मागील वर्षी हंगामाच्या तोंडावर पाऊस नसल्याने काही शेतकऱ्यांना पाऊस नव्हता म्हणून शेतकऱ्यांनी छाटण्या लांबवल्या होत्या. तर चालू वर्षी पाऊस सुरू असल्याने छाटण्या लांबल्या आहेत.

सध्या जिल्ह्यात बागलाण तालुक्यात सर्वात अगोदर अर्ली हंगाम सुरू होतो. त्यांनतर चांदवड, दिंडोरी, निफाड, येवला, सिन्नर तालुक्यांत छटाण्यांना सुरवात झाली आहे. मात्र, पावसाची प्रमुख अडचण सध्या द्राक्ष उत्पादकांसमोर आहे. पाऊस थांबायला तयार नाही. रंगीत वाणांच्या छाटण्या अधिक प्रमाणावर झाल्या. आता सफेद वाणांच्या छाटण्यांना सुरवात झाली. थोड्या फार प्रमाणात ऑगस्टच्या शेवटच्या आठवड्यात छाटण्या झाल्या. मात्र, छाटण्या झालेल्या बागांमध्ये पावसामुळे पाणी साचल्याने फवारण्या करताना अडचणी येत आहेत.
फवारण्या केल्यानंतर पुन्हा पाऊस आल्यास फवारणी केलेला खर्च मातीमोल होत आहे. त्यात पुढे पावसाचा अंदाज असल्याने द्राक्ष उत्पादकांमध्ये भीतीचे वातावरण आहे. त्यात डाऊनी व भुरी रोगांचा प्रादुर्भाव होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
अपेक्षेपेक्षा जास्त पाऊस झाला. त्यामुळे छाटण्या लांबल्या आहेत. त्यामुळे काढणी हंगाम बरोबर सुरू होईल. त्यामुळे टप्प्याटप्प्याने छाटण्या होणे गरजेचे आहे. त्यामुळे टप्प्याटप्प्याने कामसुरू आहेत. दोन पैसे मिळतील या अनुषंगाने तयारी सुरू आहे.- बापू साळुंके, द्राक्ष उत्पादक शेतकरी, वडनेर भैरव, ता. चांदवड
दरवर्षीप्रमाणे कामे सुरू आहेत. मात्र, चालू वर्षी पावसामुळे अडचणी वाढल्या आहेत. त्यामुळे पावसाची उघड मिळावी. काही छाटण्या पार पडल्या. मात्र, फवारण्या व इतर कामांचे नियोजन करताना गैरसोय होत आहे.
- प्रशांत जाधव, द्राक्ष उत्पादक शेतकरी, सोनजांब, ता. दिंडोरी
- 1 of 1498
- ››