Agriculture news in Marathi, Nashik in tomorrow Grape October Pruning Seminar | Page 2 ||| Agrowon

नाशिकमध्ये उद्या द्राक्ष ऑक्टोबर छाटणी चर्चासत्र
टीम अॅग्रोवन
सोमवार, 16 सप्टेंबर 2019

नाशिक : महाराष्ट्र राज्य द्राक्ष बागायतदार संघ, नाशिक विभाग यांच्यातर्फे मंगळवारी (ता. १७) द्राक्षावरील ऑक्टोबर छाटणी चर्चासत्र दादासाहेब गायकवाड सभागृह, मुंबई नाका, नाशिक येथे आयोजित करण्यात आले आहे. कार्यक्रम सकाळी १० वाजता सुरू होणार आहे. 

नाशिक : महाराष्ट्र राज्य द्राक्ष बागायतदार संघ, नाशिक विभाग यांच्यातर्फे मंगळवारी (ता. १७) द्राक्षावरील ऑक्टोबर छाटणी चर्चासत्र दादासाहेब गायकवाड सभागृह, मुंबई नाका, नाशिक येथे आयोजित करण्यात आले आहे. कार्यक्रम सकाळी १० वाजता सुरू होणार आहे. 

आयोजित करण्यात आलेल्या या चर्चासत्रात द्राक्ष शेतीमधील तज्ज्ञ मार्गदर्शन करणार आहेत. यामध्ये राष्ट्रीय द्राक्ष संशोधन केंद्राच्या संचालिका इंदू सावंत व त्यांचे सहकारी शास्त्रज्ञ मार्गदर्शन करणार आहेत. यांसह घड जिरणे, कुज, इथरेल व अमोनियम नत्र यांचा संबंध या विषयावर विशेष व्याख्यान आयोजित केले असून, डॉ. जे. एम. खिलारी मार्गदर्शन करणार आहेत. द्राक्ष शेतीतील विविध आव्हाने सध्या द्राक्ष उत्पादकांना भेडसावत आहेत. उत्पादन ते विक्री यामध्ये येणाऱ्या समस्यांवर मार्गदर्शन करण्यासाठी मान्यवरांना निमंत्रित करण्यात आले आहे. 

चर्चासत्रामध्ये द्राक्ष विक्रीची सद्यस्थिती व भविष्यातील विक्री व्यवस्था, छाटणी ते फळधारणा व थंडीमध्ये द्राक्षाच्या साईजमध्ये करावयाच्या उपाययोजना, यशस्वी ग्राफटिंगचे तंत्र, द्राक्षबागेतील नवीन कीड व त्याचे नियंत्रण, द्राक्षबागेतील नवीन बुरशीजन्य रोग व त्यांचे नियंत्रण, जास्त पर्जन्यमानामध्ये द्राक्षवेली पोषणावर होणारे परिणाम, संजीवकांचा अतिवापर व त्याचे परिणाम तसेच येणाऱ्या द्राक्ष हंगामाचा द्राक्ष आढावा या विषयांवर अनुक्रमे सह्याद्री फार्मचे व्यवस्थापकीय संचालक विलास शिंदे, विजय जाधव, राष्ट्रीय द्राक्ष संशोधन केंद्र, पुणेचे प्रमुख शास्त्रज्ञ डॉ. आर. जी. सोमकुवर, डॉ. दिपेंद्र सिंग यादव, डॉ. ए. के. उपाध्याय, डॉ. एस. डी. रामटेके व स्कायमेंट हवामान तज्ज्ञ योगेश पाटील हे मार्गदर्शन करणार आहेत. 

या महत्त्वपूर्ण चर्चासत्राचा सर्व द्राक्ष बागायतदारांनी लाभ घ्यावा, असे आवाहन विभागीय अध्यक्ष रवींद्र बोराडे, मानद सचिव अरुण मोरे व कोषाध्यक्ष कैलास भोसले, तसेच सर्व संचालक मंडळ यांनी केले आहे.
 

इतर ताज्या घडामोडी
घाटशीळ पारगाव प्रकल्प कोरडानगर : जिल्ह्यात यंदा पावसाळा संपत आला तरी अजून...
उमेदवारी देऊन केलेली चूक सुधारा : पवारसातारा : ‘‘वरुणराजानेही आपल्याला आशीर्वाद दिले...
काकडा परिसरात सोयाबीन काढणीच्या...काकडा, अमरावती ः परिसरात सोयाबीन...
अकोला येथे पावसाळी वातावरणाने...अकोला ः गेल्या २४ तासांपासून या भागात...
सिंधुदुर्ग जिल्ह्यात वावडिंग खरेदी सुरू सिंधुदुर्ग  ः बहुउपयोगी वावडिंग खरेदीला...
पट्टणकोडोलीला ‘इट्टल-बिरोबाच्या नावानं...पट्टणकोडोली, जि. कोल्हापूर  : ‘इट्टल-...
विश्रांतीनंतर सोलापुरात पुन्हा सर्वदूर...सोलापूर  ः गेल्या काही दिवसांच्या...
शेतकरी, जनतेच्या प्रश्नांची उत्तरे...नगर  : राज्यात पाच वर्षांत १६ हजार शेतकरी...
महायुतीला ऐतिहासिक विजय मिळेल ः...मुंबई ः केंद्र आणि महाराष्ट्रातील भाजप-शिवसेना...
आपण विजयाचा जल्लोष साजरा करू ः...नागपूर : मतदानाचा दिवस युद्धदिन समजून...
भाजप-शिवसेनेने पाच वर्षे  फक्त थापा...मुंबई : पाच वर्षे ज्यांनी विविध आश्वासने...
तुरीवरील किडींचे एकात्मिक व्यवस्थापनमहाराष्ट्रातील प्रमुख कडधान्य पीक असलेल्या तुरीची...
औरंगाबादेत सीताफळ २५०० ते ७००० रुपये...औरंगाबाद : येथील कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये...
धो धो पावसात भिजत शरद पवारांचे...सातारा: राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष शरद...
सियाम कडून पूरग्रस्तांसाठी दीड कोटींचे...औरंगाबाद  : अतिवृष्टी व पुरामुळे बाधित...
नांदुरा तालुक्यात दुधाळ जनावरांमध्ये घटनांदुरा, जि. बुलडाणा  : जिल्ह्यात दुधासाठी...
चिखली तालुक्यात पावसाची जोरदार हजेरीअकोला  ः या मोसमातील मॉन्सून परतला असला, तरी...
आर्द्रतेआड सोयाबीनची कमी दराने खरेदीधामणगावरेल्वे, अमरावती  ः हंगामातील नव्या...
कीड ओळखूनच व्यवस्थापन पद्धती वापरा : डॉ...जालना : ‘‘रासायनिक कीटकनाशकांच्या जास्त...
मागण्यांच्या पूर्ततेसाठी एचएएल...नाशिक  : नाशिककरांनी यशवंतराव चव्हाणांना...