Agriculture news in marathi; Nashik wind storm hits again | Agrowon

नाशिकला वादळी वाऱ्याचा पुन्हा मोठा फटका

टीम अॅग्रोवन
बुधवार, 12 जून 2019

नाशिक  : नाशिक जिल्ह्यात सलग तिसऱ्या दिवशी झालेल्या वादळी वाऱ्यात सिन्नर, मालेगाव, येवला, निफाड तालुक्यांत मोठे नुकसान झाले आहे. ढगांचा गडगडाट आणि विजांच्या कडकडाटासह संततधार पावसाने (ता. १०) जिल्ह्यात अनेक भागांत हजेरी लावली. त्यामुळे झाडे, घराची पत्रे व शेतीमालाचे मोठे नुकसान झाले आहे.

नाशिक  : नाशिक जिल्ह्यात सलग तिसऱ्या दिवशी झालेल्या वादळी वाऱ्यात सिन्नर, मालेगाव, येवला, निफाड तालुक्यांत मोठे नुकसान झाले आहे. ढगांचा गडगडाट आणि विजांच्या कडकडाटासह संततधार पावसाने (ता. १०) जिल्ह्यात अनेक भागांत हजेरी लावली. त्यामुळे झाडे, घराची पत्रे व शेतीमालाचे मोठे नुकसान झाले आहे.

निफाड तालुक्यातील विंचूर येथे कांदा व्यापाऱ्यांच्या खळ्यावर असलेले ११ कांद्याचे शेड वादळाने उद्‍ध्वस्त झाले. यात लाखोंचे नुकसान झाल्याचा अंदाज वर्तवण्यात येत आहे. त्यामुळे (ता. ११) पासून पुढील सूचना येईपर्यंत कांदा व धान्याचे लिलाव बंद असणार आहेत. मालेगाव तालुक्यातील आघार, दाभाडी या भागांत पावसाने दुपारनंतर हजेरी लावली. चांदवड तालुक्यात वडाळीभोई, मंगरूळ परिसरात सायंकाळी सोसाट्याचा वारा सुटला होता. सिन्नर तालुक्यातील अडवाडी, गुळवंच, खापराळे येथील चारा छावण्यांमध्ये दोन हजारांहून अधिक जनावरे दाखल आहेत. मात्र मुसळधार पाऊस पडल्याने येथे कामकाजात मोठा व्यत्यय आला. या ठिकाणी वीजपुरवठाही खंडित झाल्याने अंधार झाला होता. 

वादळाच्या दुर्घटनेत ३ जण मृत्यूमुखी
येवला तालुक्यात वादळी वारा व पावसामुळे घरांची भिंत व छत उडून गेल्याच्या २५ घटना घडल्या आहेत. यामुळे संबंधित कुटुंबांचे लाखो रुपयांचे नुकसान झाले आहे. नांदगावमधील सावरगावमध्ये वीज अंगावर पडून बाळू सावंत (वय ४७) यांचा मृत्यू झाला. येवल्यातील आडगाव चौथवा येथे लताबाई आहेर (४५) आणि निफाडमधील काथरगावला द्वारकाबाई रणपिसे यांचा भिंत अंगावर पडल्याने मृत्यू झाला. 


इतर बातम्या
उगाव येथे सामूहिक पातळीवर दशपर्णी अर्क...नाशिक: निफाड तालुक्यातील उगाव येथील श्री. श्री....
संगमनेर तालुका संघाकडून ५० टक्के...नगर: संगमनेर तालुका सहकारी दूध संघाने दूध...
दुधाला दर नसल्याने, दुभती जनावरे ...सोलापूर ः दुधाला मागणी असूनही केवळ योग्य तो दर...
कोविड-१९ रुग्णांच्या वास, चव संवेदनांवर...कोविड १९ च्या आजारातून बरे झाल्यानंतरही सुमारे ९०...
किसान क्रेडिट कार्डवर बिनव्याजी कर्ज...नाशिक: शेतकऱ्यांना शेतीकामासाठी आर्थिक मदत करणे...
अमरावतीत बियाणे कंपनीकडून ९०१ बॅग, २२...अमरावती : जिल्ह्यात सोयाबीन बियाणे उगवणीबाबत १...
नगर जिल्ह्यात एक लाख १७ हजार हेक्टरवर...नगर  ः जिल्ह्यात यंदा जुलैच्या पहिल्याच...
पुणे बाजार समितीसह उपबाजार ...पुणे  ः ‘कोरोना’च्या फैलावामुळे शहरातील...
सातारा जिल्ह्यात खरिपाच्या ८२.८५ टक्के...सातारा  ः पावसाचा काहीसा जोर वाढल्याने...
नगर : मक्‍याला हमीभावापेक्षा कमी दर...नगर ः रब्बी हंगामामध्ये शासनाच्या किमान आधारभूत...
कोल्हापूर बाजार समिती नोकर भरतीविरोधात...कोल्हापूर: येथील कृषी उत्पन्न बाजार समितीत...
जळगावमधील सिंचन प्रकल्पांची कामे...जळगाव  ः जिल्ह्यात तापी व गिरणा नदीवर...
मराठा समाजाला विश्वासात घेणार : अशोक...मुंबई : मराठा आरक्षणाच्या न्यायालयीन लढाईत राज्य...
खानदेशात दुबार पेरणीसाठी ताग, बाजरी,...जळगाव  ः खानदेशात दुबार पेरणी आटोपली आहे....
बॅंकांनी पीककर्ज प्रकरणे तत्काळ मार्गी...वर्धा  ः जिल्ह्यात पात्र शेतकऱ्यांपैकी एकही...
पुण्यात शेतमाल पुरवठा देखील बंद पुणे: कोरोनाची उफाळून आलेली साथ रोखण्यासाठी...
निकृष्ट बियाणेप्रकरणी सर्व कंपन्यांवर...नगर: जिल्ह्यात गेल्या एक महिन्याच्या कालावधीत...
देशाच्या सूत निर्यातीत मोठी घट जळगाव ः कोरोना व इतर संकटांमध्ये देशातील सूत...
गोंदिया जिल्ह्यात युरियाची टंचाईगोंदिया  ः पावसामुळे धान रोवणीला वेग आल्याने...
रत्नागिरी जिल्ह्यात भात, नाचणी पिकासाठी...रत्नागिरी  : रत्नागिरी जिल्ह्यात भात, नाचणी...