नाशिक जिल्हा परिषद अध्यक्षपदासाठी हालचालींना वेग

नाशिक जिल्हा परिषद अध्यक्षपदासाठी हालचालींना वेग
नाशिक जिल्हा परिषद अध्यक्षपदासाठी हालचालींना वेग

नाशिक : जिल्हा परिषदेच्या अध्यक्ष व पदाधिकाऱ्यांच्या कालावधी संपत आला असताना पुढील पदाधिकारी निवडीसाठी सदस्यांच्या हालचाली गतिमान झाल्या आहेत. याच अनुषंगाने शिवसेना, काँग्रेस, राष्ट्रवादी यांच्या नेत्यांच्या भेट सुरू आहेत. राज्यात असलेली महाविकास आघाडीची पुनरावृत्ती नाशिकमध्ये होणार, असल्याने भाजपचे सर्व डाव संपल्याचे चित्र आहे. शिवसेनेकडे अध्यक्षपद असल्याने राष्ट्रवादी अध्यक्षपद मिळवण्यासाठी इच्छुक असल्याचे बोलले जात आहे. तर या सत्तेत कॉंग्रेसलाही वाटा मिळावा, ही काँग्रेस नेत्यांनी आपली भूमिका मांडली आहे.  जिल्हा परिषदेतील सदस्यांच्या संख्याबळावरच अध्यक्ष, उपाध्यक्ष व विषय समित्यांच्या सभापतींचे वाटप केले जाणार आहे. मात्र, कोणत्या पक्षाला कोणत्या विषय समित्या मिळणार? याबाबत कोणतीही घोषणा झालेली नाही.  शिवसेना अध्यक्षपदासाठी पुन्हा आपली आखणी करत आहे. शिवसेनेच्या गोटातून बाळासाहेब क्षीरसागर, रमेश बोरसे, उषा दराडे, भास्कर गावीत यांच्या नावे चर्चेत येत आहे. त्यानुसार थेट पक्ष श्रेष्ठी पर्यंत आपली इच्छा व्यक्त केली आहे. त्यात राष्ट्रवादी चे सदस्यही मागे नाहीत. मात्र, संख्याबळ तुलनात्मक कमी असल्याने संधीचा विचार होणे अवघड आहे. मात्र, उपाध्यक्ष पद मिळण्याची शक्यता व्यक्त करण्यात येत आहे. यासाठी संजय बनकर, महेंद्रकुमार काले, उदय जाधव यांची नावे आघाडीवर असल्याचे सूत्रांनी सांगितले.  काँग्रेसच्या वाट्याला काय येते? याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. मात्र, उपाध्यक्ष पदासाठी काँग्रेस आग्रही आहे. यासाठी अश्विनी आहेर, यशवंत गवळी यांची नावे घेतली जात असून, त्यातही समाजकल्याण सभापतिपद पक्षाकडे राहिल्यास यशवंत गवळी यांची वर्णी लागू शकते. गवळी हे गेल्या २५ वर्षांपासून जिल्हा परिषदेचे सदस्य आहेत. काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष तथा महसूलमंत्री बाळासाहेब थोरात हे याबाबत अंतिम निर्णय घेणार असल्याचे समजते.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com