नाशिकच्या कांदा व्यापाऱ्याला दोन कोटींना गंडा

नाशिकच्या कांदा व्यापाऱ्याला दोन कोटींना गंडा
नाशिकच्या कांदा व्यापाऱ्याला दोन कोटींना गंडा

नाशिक : गुडगाव येथील कांदा व्यापाऱ्यासोबत नाशिक जिल्ह्यातील लाखलगाव येथील कांदा व्यापाऱ्याने अडीच कोटी रुपयांच्या कांद्याचा व्यवहार केला. या व्यवहारात कांदा खरेदी केलेल्या व्यापाऱ्याने सुरवातीस ५० लाख रुपयांचा परतावा केला. मात्र बाकी असलेले पैसे मिळत नसल्याने दोन कोटी रुपयांना गंडा घातल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. 

या प्रकरणी पोलिसांनी दिलेली माहिती अशी, लाखलगाव येथे राहणारे मुनाफ अब्दुल सौदागर यांनी आडगाव पोलिस ठाण्यात फसवणूक झाल्याची फिर्याद दिली आहे. त्यानुसार सईद के वारसी या व्यापाऱ्यासोबत व्यवहार करत कांदा पाठवला. मात्र, या व्यापाऱ्याने खोटे नाव धारण केले आहे. त्याचे पासपोर्ट वरील नाव अली हुसेन असे असल्याचे समजते. आपल्या खोट्या नावाने व्यवहार करून त्याने के. एस. व्हेजिटेबल अँड गुडस कंपनीत गुडगाव येथे व्यवस्थापक असल्याचे सांगून विश्वास संपादन केला. 

मागील वर्षी डिसेंबर ते एप्रिल २०१९ या कालावधीत दिल्ली व पश्चिम बंगाल येथे सुमारे ७७ ट्रक कांदा भरून पाठविला. या अडीच कोटी रुपयांच्या व्यवहारात त्याने ५० लाख रुपये दिले. त्यामुळे या व्यवहारात त्याने पत निर्माण केली. मात्र, उर्वरित व्यवहारात या कांदा मालाची कुठलीही रक्कम गुडगावच्या अली हुसेन याच्याकडून न मिळाल्याने वारंवार संपर्क केला. मात्र, त्यास प्रतिसाद मिळाला नाही. अलीकडच्या काळात त्याने फोन बंद करून संपर्क तोडल्याने आपली फसवणूक झाल्याचे लक्षात आले. असे फसवणूक झालेल्या व्यापाऱ्याने फिर्यादीत म्हटले आहे. पाठविलेल्या कांद्याची रक्कम परत वारंवार संपर्क करूनही पैसे परत मिळत नसल्याने फसवणुकीचा भादवि ४०२, ४२० अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत पोलिस उपनिरीक्षक बलराम पालकर पुढील तपास करत आहे.

शेतमाल विक्रीत फसवणुकीचे चौथे प्रकरण  चालू वर्षी द्राक्ष निर्यातदार व व्यापाऱ्यांनी द्राक्षाच्या व्यवहारात कोटी रुपयांची फसवणूक केल्याची तीन प्रकरणे पोलिसांकडे आली आहेत. मात्र, कांद्याच्या व्यवहारात व्यापाऱ्याला व्यापाऱ्याने फसविल्याचे हे प्रकरण असून यामध्ये दोन कोटी रुपयांची फसवणूक झाल्याचे उघड झाले आहे. जिल्ह्यातील फसवणुकीचे हे चौथे प्रकरण समोर आले आहे.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com