नाशिक-पुणे लोहमार्गासाठी जमिनी देणार नाही : शेतकऱ्यांचा निर्धार

नाशिक-पुणे लोहमार्गासाठी जमिनी देणार नाही
नाशिक-पुणे लोहमार्गासाठी जमिनी देणार नाही

नाशिक : आमचा उदरनिर्वाह शेतीवर अवलंबून आहे. त्यात जमिनी अल्प आहेत. जर नाशिक पुणे लोहमार्गात जमिनी गेल्या तर आम्ही उद्ध्वस्त होऊ. तरुण शेतकरी बेरोजगार होतील, अशी भूमिका घेत नानेगाव व परिसरातील शेतकऱ्यांनी कडाडून विरोध करत हा प्रकल्प होऊ देणार नाही. नाशिक- पुणे लोहमार्गासाठी कदापि जमिनी देणार नाही, असा निर्धार ग्रामस्थांनी झालेल्या बैठकीत केला. 

प्रकल्पाला विरोध करण्यासाठी गावकऱ्यांनी पुन्हा एकदा बैठकीचे आयोजन गावातील मारुती मंदिरात केले होते. खासदार हेमंत गोडसे व प्रकल्प सर्वेक्षण अधिकाऱ्यांच्या मुख्य उपस्थितीत बैठक झाली. यापूर्वी ग्रामस्थांनी मोजणीला विरोध केला होता. तसेच ग्रामसभा घेऊन प्रकल्प होऊ नये, यासाठी जिल्हाधिकारी राधाकृष्णन बी यांना निवेदन दिले होते. सुरवातीला प्रकल्पाच्या अधिकाऱ्यांनी या रेल्वेमार्गासाठी ५० मीटर रुंदीचे जमीन अधिग्रहण करण्यात येणार आहे. एकलहरे मार्गे जाणाऱ्या मार्गात १६ वळणे आहेत तर नानेगाव मार्गे जाणाऱ्या मार्गात दोनच वळणे आहेत, अशी माहिती सांगितली. त्यावर संतप्त ग्रामस्थांनी तुम्ही आम्हाला कुठलीही माहिती न देता सर्वे कसे केले? पूर्वीचा मार्ग का बदलला? असा सवाल शेतकऱ्यांनी अधिकाऱ्यांना केला. या प्रकल्पात गावातील ४० हेक्टर क्षेत्र जात असल्याने गावांचे विभाजन होणार आहे. त्यासाठी हा प्रकल्प मान्य नसून कुठल्याही परिस्थितीत जमिनी देणार नाही, अशी परखड भूमिका शेतकऱ्यांनी मांडली. 

तसेच नानेगाव, बेलत गव्हाण, संसरी तसेच वडगांव येथून रेल्वेमार्ग होऊ देणार नाही असा इशारा दिला. शेतकऱ्यांना न्याय मिळवून देण्यासाठी आपण शेतकऱ्यांसोबत आहोत. याबाबत रेल्वेमंत्र्यांची भेट घेणार असल्याची माहिती खासदार हेमंत गोडसे यांनी दिली. या बैठकीत परिसरातील शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते. माजी सरपंच ज्ञानेश्वर शिंदे, सुनील आडके यांनी आपले मत मांडले.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com