agriculture news in marathi, nation conference on water management from today, pune, maharashtra | Agrowon

शाश्वत पाणी व्यवस्थापनावर आजपासून पुण्यात राष्ट्रीय परिषद
टीम अॅग्रोवन
बुधवार, 6 नोव्हेंबर 2019

पुणे  ः जलशक्ती मंत्रालयाच्या राष्ट्रीय जल विज्ञान प्रकल्पाअंतर्गत शाश्वत पाणी व्यवस्थापन या विषयावर आजपासून (बुधवार) दुसऱ्या राष्ट्रीय परिषदेचे आयोजन करण्यात आले आहे. ही परिषद शुक्रवारपर्यंत (ता. ८) पुण्यातील नगर रोडवरील हॉटेल हयात रिजेंसी येथे होईल. 

पुणे  ः जलशक्ती मंत्रालयाच्या राष्ट्रीय जल विज्ञान प्रकल्पाअंतर्गत शाश्वत पाणी व्यवस्थापन या विषयावर आजपासून (बुधवार) दुसऱ्या राष्ट्रीय परिषदेचे आयोजन करण्यात आले आहे. ही परिषद शुक्रवारपर्यंत (ता. ८) पुण्यातील नगर रोडवरील हॉटेल हयात रिजेंसी येथे होईल. 

या परिषदेचे उद्घाटन आज सकाळी १० वाजता जलशक्ती मंत्रालयाचे केंद्रीय मंत्री गजेंद्रसिंग शेखावत यांच्या हस्ते होणार आहे. राष्ट्रीय जलविज्ञान प्रकल्पाचे वरिष्ठ सहआयुक्त राकेश कश्यप, दिपक कुमार, जलसंपदा विभागाचे राजेंद्र पवार, महाराष्ट्र अभियांत्रिकी संशोधन संस्थेचे महासंचालक एन. व्ही. शिंदे, जलसंपदा विभागाचे मुख्य अभियंता व्हि.जी. रजपूत, राजेंद्र मोहिते, जल विज्ञान प्रकल्पाचे मुख्य अभियंता श. द. भगत, जागतिक बॅंक तसेच सिंचन व निचराविषयक कमिशनचे तज्ज्ञ, तसेच विविध देशांतील तज्ज्ञ या परिषदेत सहभागी होणार आहे.  

परिषदेचा समारोप गुरुवारी (ता. ७) होणार असून, या वेळी जलशक्ती मंत्रालयाचे राज्यमंत्री रतनलाल कटारिया उपस्थित राहणार आहे. परिषदेत १२ तांत्रिक सत्र आयोजित करण्यात आले असून, यामध्ये तज्ज्ञ अनुभवकथन करणार आहेत. या व्यतिरिक्त जलसंधारणाच्या उत्कृष्ट पद्धतीवर आधारित एक सत्र आयोजित करण्यात आले आहे. जलस्रोत संवर्धन क्षेत्रात उत्कृष्ट कामगिरी केलेल्या विविध सरकारी संस्था आणि स्वयंसेवी संस्था यात अनुभव कथन करणार आहेत. याशिवाय प्रतिष्ठित संस्थांच्या संशोधकांसाठी एक पोस्टर स्पर्धा आयोजित करण्यात आली आहे. 

इतर ताज्या घडामोडी
कलिंगडांच्या जनुकीय प्रदेशांचा घेतला...आंतरराष्ट्रीय संशोधकांचा गट कलिंगडाच्या सात...
औरंगाबाद जिल्ह्यात मका खरेदीसाठी दहा...औरंगाबाद : मक्याला किमान आधारभूत किंमत मिळावी,...
सांगली जिल्ह्यात यंदा पावसाची ‘रेकॉर्ड...सांगली : जिल्ह्यात गेल्या २० वर्षातील सर्वाधिक...
युरिया ब्रिकेटची पन्हाळा तालुक्यात शंभर...कोल्हापूर : कृषी तंत्रज्ञान व्यवस्थापन...
परभणीत साडेचार लाख हेक्टरवर पिके वायापरभणी : ऑक्टोबर महिन्यातील अतिवृष्टीमुळे...
शिरपूर उपबाजारात सोयाबीनची आवक वाढलीशिरपूर, जि. वाशीम  : सलग सुरू असलेला पाऊस...
पणन संचालकपदी कोणाची वर्णी लागणार?पुणे ः शेतमाल विपणनच्या ३०७ बाजार समित्या, ९००...
धक्कादायक ! कांदा नुकसानीच्या...नाशिक  : चालू वर्षी दुष्काळामुळे होरपळून...
अमरावती : रब्बी हंगाम क्षेत्रात होणार...अमरावती ः मॉन्सूनोत्तर पाऊस खरीप पिकांच्या मुळावर...
‘भातकुली’वर पाणीटंचाईचे सावटअमरावती  ः सुरुवातीला उघडीप त्यानंतर...
पुणे विभागात रब्बीचा चार लाख हेक्टरवर...पुणे  ः ऑक्टोबर, नोव्हेंबर महिन्यांत...
साताऱ्यात राष्ट्रीयीकृत बँकांकडून...सातारा ः अतिपावसाने शेती क्षेत्राचे कोट्यवधींचे...
पुणे बाजार समितीत ‘ई-नाम’ची अंमलबजावणी...पुणे :  शेतीमालाच्या ऑनलाइन लिलावांतून...
माण तालुक्यात पीक पंचनाम्यांमध्ये...दहिवडी, जि. सातारा  : पावसाने जोरदार तडाखा...
राज्यात अखेर राष्ट्रपती राजवटमुंबई ः चौदाव्या विधानसभेसाठी कोणत्याच...
स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या ऊस...कोल्हापूर  : यंदाच्या प्रतिकूल परिस्थितीच्या...
विमा प्रतिनिधी शोधताना शेतकऱ्यांची दमछाकयवतमाळ ः मॉन्सूनोत्तर पावसाने झालेल्या...
‘बुलबुल’ प्रभावित शेतकऱ्यांना मदत जाहीरभुवनेश्‍वर, ओडिशा:  राज्याला बुलबुल...
तण निर्मूलनातून तण व्यवस्थापनाकडेवास्तविक तण विज्ञानाचा संबंध विविध कृषी शाखांशी...
जळगावात कोबी १८०० ते ३००० रुपये...जळगाव : कृषी उत्पन्न बाजार समितीत मंगळवारी (...