agriculture news in Marathi national agri export conference on 17 January in pune Maharashtra | Agrowon

पुण्यात १७ जानेवारीला राष्ट्रीय कृषी निर्यात परिषद

टीम अॅग्रोवन
मंगळवार, 14 जानेवारी 2020

पुणे: फळे, फुले, भाजीपाला निर्यातीला चालना देण्यासाठी पुण्यात १७ जानेवारीला राष्ट्रीय परिषदेचे आयोजन करण्यात आलेले आहे. यात शेतकरी, शेतकरी गट शेतकरी उत्पादक कंपन्यादेखील सहभागी होऊ शकतील, अशी माहिती एमसीसीआयएचे महासंचालक प्रशांत गिरबाने व कृषी व्यवसाय समितीचे चेअरमन उमेशचंद्र सरंगी यांनी दिली. 

पुणे: फळे, फुले, भाजीपाला निर्यातीला चालना देण्यासाठी पुण्यात १७ जानेवारीला राष्ट्रीय परिषदेचे आयोजन करण्यात आलेले आहे. यात शेतकरी, शेतकरी गट शेतकरी उत्पादक कंपन्यादेखील सहभागी होऊ शकतील, अशी माहिती एमसीसीआयएचे महासंचालक प्रशांत गिरबाने व कृषी व्यवसाय समितीचे चेअरमन उमेशचंद्र सरंगी यांनी दिली. 

सेनापती बापट रोडवरील महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्स इंडस्ट्रिज अॅन्ड अॅग्रिकल्चरच्या (एमसीसीआयए) पाचव्या मजल्यावर बजाज गॅलरीत सकाळी साडेनऊ ते सायंकाळी सहा दरम्यान ही परिषद होईल. कृषी व फलोत्पादन निर्यातीमधील आधुनिक कल, नवा पुढाकार व संधी याची माहिती या वेळी शेतकऱ्यांना मिळणार आहे.

शेतकरी, प्रयोगशील शेतकरी, निर्यातदार शेतकरी, कृषी निर्यातदार, उद्योजक, निर्यातदार कंपन्या, तज्ज्ञ्, अभ्यासक तसेच शासकीय अधिकारी सहभागी होत आहेत. कृषी निर्यातीमधील संधी व आव्हाने, कापणीतील काळजी, साठवण, पायाभूत सुविधा, निर्यातक्षम रोपे, प्रमाणिकरण, वाहतूक, मानकांच्या कार्यपध्दती, निर्यातीचे नियम, कीटकनाशकांचे निकष, रेसिड्यू समस्या, नवे पॅकिंग तंत्र, जीआयएस मानांकन, कीडमुक्त क्षेत्राचे प्रमाणपत्र तसेच इतर महत्त्वाच्या विषयावर परिषदेत चर्चा होईल.
 
श्री. गिरबाने म्हणाले, “जागतिक व्यापार विषयावर स्वतंत्र प्रशिक्षण वर्ग, कोल्डचेन याविषयावर परिसंवाद अलीकडेच घेतला गेला. आता मात्र केवळ राज्याची कृषी व निर्यात क्षेत्र डोळ्यासमोर ठेवून ही परिषद होते आहे. यात आम्ही काही शेतकऱ्यांना त्यांचे अनुभव सांगण्याची संधी देखील देत आहोत.” राष्ट्रीय कृषी निर्यात परिषद राज्याच्या कृषी निर्यातीला चालना देणारी ठरणार असल्याचे श्री. सरंगी यांनी स्पष्ट केले.

“राज्यातील फळे, भाजीपाला निर्यातदार शेतकरी व शेतकरी उत्पादक कंपन्या, पॅकहाउसचालक, निर्यातदार, प्रयोगशाळा, प्रमाणिकरण संस्था याशिवाय शास्त्रज्ञ, बॅंका आणि निर्यातसंबंधी सरकारी अधिकारी या परिषदेच्या निमित्ताने एकाच व्यासपीठावर उपलब्ध होतील,” असेही ते म्हणाले. 

परिषदेसाठी सशुल्क नाव नोंदणीकरिता शेतकरी, निर्यातदार, उद्योजक, व्यवसायिक व विद्यार्थ्यांनी  kiranj@mcciapune.com तसेच ०२०२५७०९००० किंवा ०९१७२१०८६०४  या क्रमांकावर संपर्क साधावा, असे आवाहन करण्यात आले आहे. 

कृषी निर्यातीवर प्रदर्शनाचे आयोजन 
कृषी विभाग, राष्ट्रीय फलोत्पादन अभियान, अपेडा, वाणिज्य मंत्रालय, महाराष्ट्र कृषी उद्योग विकास महांडळ आणि नाबार्ड यांना भागीदार म्हणून परिषदेत निमंत्रित करण्यात आले आहे. कृषी निर्यातीची माहिती देणारे अभ्यासपूर्ण प्रदर्शनाचेही आयोजन करण्यात आले आहे.


इतर अॅग्रो विशेष
चक्रीवादळ अलिबागजवळ १ ते ३च्या दरम्यान...पुणे : अरबी समुद्रात महाराष्ट्राच्या किनाऱ्यालगत...
दीडपट 'एमएसपी' म्हणजे निव्वळ धूळफेक :...पुणे: मोदी सरकारने खरिपासाठी जाहीर केलेल्या किमान...
टोळधाडीवर दोन दिवसात नियंत्रण मिळविणार नागपूर ः पूर्व विदर्भातील जिल्ह्यांमध्ये गेल्या...
‘निसर्ग’ चक्रीवादळ आज अलिबागजवळ धडकणार पुणे : अरबी समुद्रात महाराष्ट्र, कर्नाटकच्या...
मॉन्सून कर्नाटकात आज धडकणारपुणे : नैर्ऋत्य मोसमी वारे (मॉन्सून) सोमवारी (ता....
बॅंकांसाठी आठ-अ, फेरफार उतारे थेट...पुणे: सातबारा संगणकीकरण उपक्रमाला लॉकडाउनमुळे...
कोकण, मध्य महाराष्ट्र, मराठवाड्यात पाऊस पुणे: अरबी समुद्रात तयार झालेल्या ‘निसर्ग’...
‘निसर्ग’चक्रीवादळाची तीव्रता वाढली;...पुणे : अरबी समुद्रात महाराष्ट्र, कर्नाटकच्या...
अल्पमुदतीच्या कृषिकर्ज फेडीस...नवी दिल्ली : तीन लाखांपर्यंतच्या अल्पमुदतीच्या...
हमीभाव जाहीर : कपाशीत २६०, सोयाबीनमध्ये...नवी दिल्ली : केंद्र सरकारने खरीप २०२०-२१करिताचे...
महाराष्ट्राच्या किनाऱ्यालगत ‘निसर्ग’...पुणे  : अरबी समुद्रात महाराष्ट्र,...
देशात यंदा १०२ टक्के पावसाची शक्यता :...पुणे  : नैर्ऋत्य मोसमी वाऱ्यांच्या (मॉन्सून...
पूर्वमोसमी पावसाच्या हजेरीने मॉन्सूनची...पुणे  : नैर्ऋत्य मोसमी वाऱ्यांनी (मॉन्सून)...
केरळचा बहुतांश भाग मॉन्सूनने व्यापलापुणे  : महाराष्ट्रासह देशभरातील शेतकऱ्यांना...
टोळधाड नियंत्रणासाठी हेलिकॉप्टर अन्...नागपूर ः विदर्भात अग्निशमन यंत्राच्या माध्यमातून...
निर्यातक्षम उत्पादन, बाजारपेठांचा शोध...नाशिक जिल्ह्यातील नैताळे (ता.निफाड) येथील...
राईसमिल, पोहे निर्मितीतून व्यवसायवृद्धीवेहेळे (ता. चिपळूण, जि. रत्नागिरी) येथे शंकर जाधव...
देशात यंदा सर्वसाधारण मॉन्सून; १०२...नवी दिल्ली : देशात यंदा सर्वसामान्य मॉन्सून आणि...