agriculture news in Marathi national agriculture seminar from 30 January in Kaneri Math Maharashtra | Agrowon

कणेरी मठात ३० पासून राष्ट्रीय कृषी संमेलन

टीम अॅग्रोवन
मंगळवार, 21 जानेवारी 2020

कोल्हापूर : कणेरी (ता. करवीर) येथील सिद्धगिरी कृषी विज्ञान केंद्रात ३० जानेवारी ते १ फेब्रुवारी अखेर राष्ट्रीय शेतकरी संमेलन होणार आहे. यामध्ये देशभरातील प्रयोगशील शेतकऱ्यांबरोबरच देशातील विविध संस्थांचे, विद्यापीठाचे कुलगुरू व पदाधिकारी उपस्थित राहणार आहेत. कणेरी मठाचे प्रमुख काडसिद्धेश्‍वर स्वामी यांनी ही माहिती दिली. 

कोल्हापूर : कणेरी (ता. करवीर) येथील सिद्धगिरी कृषी विज्ञान केंद्रात ३० जानेवारी ते १ फेब्रुवारी अखेर राष्ट्रीय शेतकरी संमेलन होणार आहे. यामध्ये देशभरातील प्रयोगशील शेतकऱ्यांबरोबरच देशातील विविध संस्थांचे, विद्यापीठाचे कुलगुरू व पदाधिकारी उपस्थित राहणार आहेत. कणेरी मठाचे प्रमुख काडसिद्धेश्‍वर स्वामी यांनी ही माहिती दिली. 

केंद्र शासनाच्या कृषी व शेतकरी कल्याण मंत्रालय, भारतीय कृषी अनुसंधान संस्था, दिल्ली, कृषी प्रोद्योगिकी अनुप्रयोग अनुसंधान संस्थान पुणे, कृषी विभाग, व श्री सिद्धगिरी कृषी विज्ञान केंद्राच्या मार्फत ही संमेलन होणार आहे. ‘‘समृद्ध शेतीसाठी शेतकरी नवकल्पना’’ हा आशय मध्यवर्ती धरून या तीनदिवसीय संमेलनात चर्चा होईल. देशभरातील शंभरहून अधिक शेतकरी यात सहभागी होतील.

आपले प्रयोग लोकांसमोर मांडणार आहेत. देशी गाय आधारित ग्रामीण अर्थव्यवस्था शाश्‍वत शेतीसाठी पर्यायी शेती प्रणाली, शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढविण्यासाठी तांत्रिक पर्याय आणि व्यावहारिकता, उद्योजकता विकास आणि प्रोत्साहन यासाठी शेती व शेतीपूरक व्यवसाय आदी विषयांवर या संमेलनात ऊहापोह होईल.

भारतीय कृषी अनुसंधानचे उपसंचालक डॉ. ए. के. सिंग, राष्ट्रीय कामधेनू आयोगाचे अध्यक्ष डॉ. वल्लभभाई कथिरिया, उदयपूर विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. एन. एस. राठोर, धारवाड विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. एम. बी. चेट्टी,  राहुरी विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. के. पी. विश्‍वनाथा, भारतीय कृषी अनुसंधान संस्थानचे  डॉ. एस. ए. पाटील, सहसंचालक डॉ. ज. प्र. शर्मा, केंद्रीय कृषी मंत्रालयाचे अतिरिक्त आयुक्त डॉ. या. रा. मीना, डॉ. लाखन सिंग, आदींसह कृषी विभागाचे विविध पदाधिकारी या संमेलनात सहभागी होणार आहेत. 

संमेलनात सहभागी होणाऱ्या शेतकऱ्यांसाठी निवास, भोजन व्यवस्था मोफत करण्यात येणार आहे. शेतकऱ्यांनी संमेलनात सहभागी होण्यासाठी kvkkolhapur२@gmail.com या संकेतस्थळावर नोंदणी करावी, असे आवाहन मठाच्या वतीने करण्यात आले आहे.


इतर अॅग्रो विशेष
संघर्ष येथील संपणार कधी? शेती कसत असताना शेतकऱ्यांना येणाऱ्या अडचणी, करावा...
`ज्ञानेश्‍वरी'त दडलंय कृषी विज्ञान कां सु क्षेत्री बीज घातले।  ते आपुलिया परी...
निर्यातबंदी उठविल्याचे कांदा बाजारात...नाशिक : केंद्रीय अन्न व नागरी पुरवठा मंत्री...
साडेआठशे कोटींची एफआरपी थकलीपुणे: राज्यातील साखर कारखान्यांनी ऊस उत्पादक...
‘जानुबाई’, ‘केशवराज’ संस्था ठरल्या...पुणे: पाणीवापर संस्थांच्या माध्यमातून प्रभावी...
साम टीव्ही न्यूज महाराष्ट्रात ‘नंबर १’मुंबई ः सर्वोत्तम न्यूज चॅनेल्सच्या स्पर्धेत ‘...
कृषी परिषदेने विद्यापीठांसाठी नेमले...पुणे : महाराष्ट्र राज्य कृषी शिक्षण व संशोधन...
विदर्भात वादळी पावसाची शक्यतापुणे: पावसाला पोषक हवामान होत असल्याने विदर्भ,...
शेतकऱ्यांना खते, बियाणे अन् महिलांना...शुद्ध पाणीपुरवठा, गावाअंतर्गत सिमेंट रस्ते,...
सांगलीत तूर खरेदी ठप्पसांगली ः जिल्ह्यात हेक्टरी २५७ किलोच तूर खरेदी...
राज्यात गारठा वाढलापुणे  : उत्तरेकडून थंड वाऱ्यांचे प्रवाह...
चीनला द्राक्ष निर्यात सुरूसांगली ः जिल्ह्यात गेल्या वर्षी झालेल्या...
‘लिंकिंग’बाबत कंपन्यांना नोटिसापुणे  : रासायनिक खतांच्या बाजारपेठेत होत...
बाजार समित्यांच्या निवडणुका होणार...मुंबई  ः राज्यातील कृषी उत्पन्न बाजार...
भाजीपाला शेतीतून पेलल्या साऱ्या...लग्नानंतर अवघ्या तीन वर्षातच पतीच्या निधनामुळे...
कांद्यावरील निर्यातबंदी हटविली;...नवी दिल्ली : चार महिन्यापूर्वी कांद्यावर...
सूक्ष्म सिंचन योजनेचा सात वर्षानंतर...अकोला ः सूक्ष्म सिंचनाचा लाभ घेणाऱ्या शेतकऱ्यांना...
कोल्हापुरातील गूळ हंगाम अंतिम टप्प्यातकोल्हापूर : यंदाचा गूळ हंगाम अंतिम टप्प्यात येत...
पाणीवापराचे तंत्र समजून निर्यातक्षम...सिंचन व्यवस्थापन हा प्रयोगशील व प्रगतिशील शेतीतील...
सकाळी गारठा, तर दुपारी चटकापुणे : राज्यात कमाल तापमानातील वाढीबरोबरच किमान...