वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठातील कोरडवाहू शेती संशोधन प्रकल्‍पास राष्‍ट्रीय पुरस्‍कार

वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठातील कोरडवाहू शेती संशोधन प्रकल्‍पास राष्‍ट्रीय पुरस्‍कार
वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठातील कोरडवाहू शेती संशोधन प्रकल्‍पास राष्‍ट्रीय पुरस्‍कार

परभणी : वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठातील अखिल भारतीय समन्‍वयित कोरडवाहू शेती संशोधन प्रकल्‍पाला नवी दिल्‍ली येथील भारतीय कृषी संशोधन परिषदतर्फे देण्यात येणारा २०१८ चा वसंतराव नाईक राष्‍ट्रीय पुरस्‍कार जाहीर करण्‍यात आला आहे.

येत्या १६ जुलै रोजी नवी दिल्ली येथे या पुरस्काराचे वितरण होईल.  अखिल भारतीय समन्‍वयित कोरडवाहू शेती संशोधन प्रकल्‍पाच्‍या उल्‍लेखनीय संशोधनकार्य, तंत्रज्ञान विकास, त्‍यांचा शेतकऱ्यांमधील प्रचार आणि प्रसार आदी कार्याची दखल घेऊन परिषदेने हा पुरस्कार जाहीर केला.

कुलगुरू डॉ. अशोक ढवण यांनी पुरस्‍काराबद्दल संशोधन प्रकल्‍पाच्‍या शास्‍त्रज्ञांचा सत्‍कार केला. या वेळी संशोधन संचालक डॉ. दत्तप्रसाद वासकर, शिक्षण संचालक डॉ. प्रदीप इंगोले, कुलसचिव रणजित पाटील, डॉ. अशोक जाधव, पुरस्‍कार प्राप्‍त शास्‍त्रज्ञ डॉ. भगवान आसेवार, डॉ. मदन पेंडके, डॉ. आनंद गोरे, डॉ. मेघा जगताप, डॉ. पपिता गौरखेडे आदी उपस्थित होते. डॉ. ढवण म्‍हणाले, ‘‘नाईक यांच्‍या नावाचा वारसा लाभलेल्‍या या कृषी विद्यापीठास त्‍यांच्‍याच नावाचा प्रतिष्ठित राष्‍ट्रीय पुरस्‍कार जाहीर झाला, हे गौरवास्पद आहे.’’

प्रकल्‍पाचे कार्य

कोरडवाहू शेती संशोधन प्रकल्पातंर्गंत शेततळे, पाण्‍याचा पुर्नवापर, विहीर, कूपनलिका पुनर्भरण, सोयाबीन पेरणीसाठी रुंद वरंबा सरी पद्धती (बीबीएफ), मूलस्‍थानी जलसंधारण पद्धती, आंतरपीक पद्धती, आपात्कालीन पीक नियोजन, हवामान बदलानुरूप कोरडवाहू शेती संशोधनाचा समावेश आहे. त्याच्या प्रसारासाठी मोबाईल अॅप विकसित करण्‍यात आले. प्रकल्‍पाद्वारे मराठवाड्यासाठी आपत्कालीन पीक नियोजन आराखडा तयार करण्‍यात आला. 

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com